ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त

मुं बई : धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. आठवडाभरात त्यांनी ही कारवाई केली आहे. आरोपींकडून ट्राॅमाडाॅलच्या एक किलो वजनाच्या ३ हजार ८४० गोळ्या , एनट्राझेपामच्या १०.०८ किलो वजनाच्या १३ हजार ५०० गोळ्या , उच्च प्रतीचा १९ किलो गांजा , ०१ हजार १५० हायड्रोपोनिक विड जप्त करत ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करीतील प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. एनीसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आठवडाभर मोहीम राबविली. एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटने मुंबईहून यूएसएला कुरिअर पार्सलद्वारे ट्राॅमाडॉल गोळ्यांची अवैध तस्करी करण्याची योजना आखली असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने मुंबईतील एका कुरिअर कार्यालयावर १० नोव्हेंबरला छापेमारी करून ट्राॅमाडाॅलच्या गोळ्या जप्त केल्या. पुढे एनसीबीने धुळ्याहून मुंबईला ड्रग्ज वाहतूक करण्याचा कट रचणाऱ्या आंतरराज्यीय गांज...