महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा बारामती ( पुणे) महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी देते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केले आहे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत. त्यामुळे पुढील काळात असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं असा इशारा हाके यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके हे शनिवारी रात्री पुरंदर तालुक्यातील निरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. हाके यांनी यावेळी अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटि...