ओबीसी बाबत शरद पवारांचे मोदींना आव्हान: म्हणाले एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे?

 ओबीसी बाबत शरद पवारांचे मोदींना आव्हान: म्हणाले एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे? 



  मुंबई दि.२५


      ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यामुळे याला मोठे उधाण आले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करण्यात यावी असं म्हटल आहे. 'एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे' असं पवार यांनी म्हटलंय.


मुंबईतील ' वाय. बी. चव्हाण' सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा पारपडला यावेळी पवार बोलत होते. पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपलाही सुनावले. शरद पवार यांनी म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या लोकसंख्या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आज ओबीसी जनगणनेची मागणी होते आहे. एकदा देशाला कळू द्या ओबीसी संख्या या भारत देशामध्ये किती आहे ?हीच मागणी बिहारमधील मुख्यमंत्र्यांनी देखील केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र केंद्रातील सरकार हे ओबीसी जनगणना होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघाचे भैय्याजी जोशी यांनी ओबीसी जनगणना मान्य नसल्याचे सांगितले आहे.ओबीसींची जनगणना झाल्यास देशात अस्वस्थता निर्माण होईल असे त्यांनी म्हटले होते. 


     पवार म्हणाले 'आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या नक्की करणार'


   ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपची महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू आहे.याचा समाचारही पवार यांनी आपल्या भाषणात घेतला. भाजपचे नेते सांगतात महा विकास आघडीने धोका दिला. पण माझा सवाल आहे मागच्या पाच वर्षात तुम्ही झोपला होता का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?