पोस्ट्स

मुंबई : आईवडिलांना वाटलं होतं की मुलगा पोलीस बनेल.पण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वडील एसटी महामंडळात, आई भाजी विकते, मुलाला पोलीस व्हायचं होतं, पण.

इमेज
  मुं बई :   वडील एसटी महामंडळात कामाला. आई भाजी विकायचं काम करते. आईवडिलांना वाटलं होतं की मुलगा पोलीस बनेल. मुलगाही पोलीस भरतीसाठी ( Maharashtra Police Recruitment 2022 ) मेहनत घेत होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. 22 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं एका क्षणात मृत्यू झाला. पोलीस भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. ही घटना वसईमध्ये घडली. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव हृतिक महेंद्र मेहेर असं आहे. तो 22 वर्षांचा होता. 22 वर्षीय हृतिक मेहेर हा दुपारी 4 वाजता धावायला म्हणून रानगाव इथं किनाऱ्यावर गेला होता. पण 5 वाजण्याच्या सुमारास तो बेशुद्ध अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. हृतिक मेहेर या तरुणाचं बीकॉम पर्यंत शिक्षण झालं होतं. पोलीस दलात भरती होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो तयारीही करत होता. पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या एका अॅकेडमीतही त्याने प्रवेश घेतला होता. नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करण्यासाठी हृतिक किना...