पोस्ट्स

महिलांबाबत Navy नं घेतला महत्त्वाचा निर्णय;; लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोठी बातमी! महिलांबाबत Navy नं घेतला महत्त्वाचा निर्णय; University Entry Schemeसाठी करता येणार अर्ज

इमेज
  मुंबई , 17 नोव्हेंबर:   भारतीय नौदलाने महिलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे . सैन्यदलात महिलांच्या प्रवेशासाठी आणखी एक बंद दरवाजा उघडण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश घेता येत होता. नौदलाने नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम महिलांसाठीही सुरू केली आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ महिलाही घेऊ शकतील आणि त्या इंडियन नेव्हीमध्ये नोकरीही मिळवू शकतील. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. आता नौदलाच्या काही विभागांमध्ये नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमद्वारे महिलाही नोकरीसाठी अर्ज करू शकतात , असं या संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्राने सांगितलं. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून नेव्हीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस ( X) केडर , आयटी , इंजिनीअरिंग व इलेक्ट्रिकल शाखांमध्ये महिलांसाठी नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे , असं सरकारने हायकोर्टात सांगितलं. ' महिलांशी भेदभाव का ?'  अॅटर्नी जनरल कुश कालरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सैन्य भरतीत महिलांबाबत भेद...