पोस्ट्स

पुणे शहर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून: पती फरार

इमेज
 चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून: पती फरार पुणे दि.२३   - टाकळी हाजी ता. शिरूर येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी दि. २२ रोजी रात्री एका महिलेचा खून करण्यात आला आहे. ललिता महादेव काळे अस मयत महिलेच नाव आहे. तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने निघृन वार करून खून केला आहे. म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये शेजारी शेजारी पाच कुटुंब राहत आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता.          त्यांचे दोघांचे कायमच भांडण होत होते, काल गुरुवारी दि. २२ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली तेव्हा दोघांचे भांडण झाले होते, आणि त्यावेळी तो तिला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे. असे ललिताची बहीण चांदणी हिने सांगितले असून शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी...

पालखीच्या मार्गातील हे व्यवसाय राहणार बंद

इमेज
 पालखीच्या मार्गातील मांस विक्रीची दुकाने व  मद्यालये  राहणार बंद  नीरा दि.२२        संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दरम्यान पालखी महामार्गावरील मांसाहारी  हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे ग ज्या गावातून पालखी सोहळा जाणार  आहे त्या गावातील मांसाहारी हॉटेल मद्यालये मच्छीमार्केट  व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. दिनाक २१ मार्च ते २४ जून या दरम्यान पालखी सोहळा मार्गातील मुक्कामाच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमात असतात त्यावेळी तिथे मांस विक्रीची दुकाने, मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने, मच्छीमार्केट,  मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज  संस्थान कमिटी व श्री.संत तुकाराम महाराज संस्थानाने विनंती केली होती. त्याला अनुसरून  दोन्ही पालख्यामध्ये भाविकांची संख्या मोठी असल्याने पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने,मच्छीमार्केट,माद्यालये ही पालखी सोहळा पुढे जाई पर्यंत बंद देवण्याबाबत व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ...

चंदुकाकांची परंपरा कुटुंबाने पुढे चालविली.                   

इमेज
  चंदुकाकांची परंपरा कुटुंबाने पुढे चालविली: स रदार कुलतारसिंग संधवान     चंदुकाका जगताप स्मृती छाया स्मारकाचे  लोकार्पण .     सासवड दि.१३                                                 सहकार रत्न स्व.चंदूकाका जगताप यांच्या विकासाची आणि जनसेवेची परंपरा त्यांच्या कुटुंबाने पुढे चालविली. या कुटुंबाला उज्वल भवितव्य आहे. चंदूकाकांच्या कर्तृत्वाची धमक, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी  32 किमी वरून पिण्याचे पाणी आणून फार मोठे काम केले आहे,अशा शब्दांत पंजाबचे विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतार सिंग संधवान यांनी चंदुकाका जगताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.                                                          दिवंगत लोकनेते सहकाररत्न चंदूकाका जगताप यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त शनिवा...

आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची मिरवणूक

इमेज
 आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची मिरवणूक आळंदी दि.१३ : येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी रथ आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी रथ ओढणा-या बैलजोडीचा यावर्षी पांडुरंग वरखडे तानाजी वरखडे यांना मिळाला असून त्यांनी रथ ओढण्यास आणलेल्या बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे माऊली मंदिर अशी मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी बैलजोडीचे स्वागत पूजा करून केले.   माऊलींचे मंदिर महाद्वारात ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख  विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक नंदकुमार कुऱ्हाडे विलास घुंडरे, डी. डी. भोसले पाटील, रामदास भोसले, तुषार घुंडरे, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर रायकर, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, मयुर घुंडरे,प्रमोद कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे, संदेश तापकीर, नितीन घुंडरे, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड, माऊली वहिले, हनुमंत घुंडरे, माऊली गुळुंजकर, गोविंद कुऱ...

आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे

इमेज
 आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे  भाजप मोटार सायकल रॅलीचे नीरा येथे उत्साहात स्वागत नीरा दि.१२    केंद्र सरकारने आठ वर्षाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .जाणतेसाठी उपयुक्त अशी अनेक कामे केली.ही कामे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवीत.त्याचा लाभ आणि त्याची माहिती जनतेला मिळायला हवी, म्हणून आजा भाजपाच्यावतीने दिवे ते नीरा असे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे आणि नीरा येथे रॅली च्या समारोपाच्या वेळी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने केलेली कामे आम्ही लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचे ते म्हणाले. पुरंदर तालुक्यात आज (दि.१२)  रोजी पुरंदर भाजपाच्यावतीने मोटार सायकल  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील दिवे ते नीरा अशा मार्गावर पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम  जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला सासवड, जेजुर, वाल्हा, नीरा या प्रमुख शहरा बरोबरच अनेक गावातून या रॅलीचे स्वागत करण्यात...

शिवतारे यांच्या स्वीय सहाय्यका कडून पत्रकारांची बदनामी

इमेज
 शिवतारे यांच्या स्वीय सहाय्यका कडून पत्रकारांची बदनामी  सासवड पोलिसात फिर्याद दाखल सासवड दि.८    माजी मंत्री शिवतारे यांचा स्वीय सहाय्यक म्हणून तालुक्याला परिचित असणारे माणिक निंबाळकर यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात पत्रकाराची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पत्रकार निलेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी ही पाऊले उचलल्याचे पोलिसांच्या या भूमिकेचे पत्रकार संघटनांनी स्वागत केले आहे.    पत्रकार म्हटले की वास्तवाता आणि पारदर्शक लिखाण यांमुळे समाजातील अनेक बडे प्रस्थ पत्रकारांचे शत्रू बनत असतात. पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी शिवतारे यांच्या भोंगळ कारभाराच्या बाबत आवाज उठवल्याने त्यांचे स्वीय सहायक निंबाळकर यांनी जगताप यांच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर पत्रकार हरवले आहेत , जागतिक कीर्तीचे नोबेल पुरस्काराचे पत्रकार !, पुरंदर भूषण पत्रकार अशा उपमा देत निलेश जगताप व प्रदीप जगताप यांच्या नावानिशी व फोटोसाहित पोस्ट व्हायरल केल्याने जगताप यांनी पोलिसांकडे दाद मागितली. यावर माणिक निंबाळकर यांच्यावर भारतीय दंडविध...

पालखी मार्गातील बहुतांश कामे १० तारखे पर्यंत पूर्ण होतील. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती

इमेज
 पालखी मार्गातील बहुतांश कामे १० तारखे पर्यंत पूर्ण होतील. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती सासवडच्या पुलाच कामही युद्ध पातळीवर पूर्ण करणार      नीरा दि. ८               संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील आपेक्षीत अशी सर्व कामे १० तारखे पूर्वीच पूर्ण होतील असा विश्वास जिल्हाअधिकारी राजेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.त्याच बरोबर सासवड येथील कऱ्हा नदीवरील पुल देखील पालखी पूर्वीच पूर्ण होईल आणि या पुलाचा उपयोग वारकरी यावर्षी करतील असा विश्वास त्यांनी नीरा येथे पत्रकारांसी बोलताना व्यक्त केला आहे.        पुणे जिल्ह्यातील हडपसर ते नीरा दरम्यानच्या पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी आज पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केली. तालुक्यातील सासवड, जेजुरी, वाल्हे, पिंपरे खुर्द व नीरा येथील पालखी तळाची व तालुक्यातील पालखी मार्गातील कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.यानंतर पिंपरे येथील शासकीय विश्रमगृहात ते थांबले असताना पालखी मार्गातील अडथळ्या बाबत व अपुऱ्या कामाबद्दल पत्रकारा...

एसटीच्या शटल सेवेचं ग्रामीण भागातील वाल्हे,पिसूर्टी येथे उत्स्फूर्त स्वागत

इमेज
 एसटीच्या शटल सेवेचं ग्रामीण भागातील वाल्हे,पिसूर्टी येथे उत्स्फूर्त स्वागत  वाल्हे दि.८           तालुक्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या एसटीच्या शटल सेवेचे वाल्हा आणि पिसूर्टी या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले आहे. चालक व वाहक यांचा सत्कार करून लोकांनी पुन्हा एकदा आपला एस टी बद्दल असलेला जिव्हाळा व्यक्त केला आहे.     पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एसटीने आता नव्याने शटल सेवा सुरू केली आहे. निरा ते स्वारगेट अशी दर एक तासाला ही शटल धावणार आहे. तालुक्यात ग्रामीण भागात पीएमपीएलने बस सेवा सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला होता. सासवड आगारातून आता पीएमपीएल प्रमाणेच निरा - स्वारगेट व स्वारगेट - निरा अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचे स्वागत पुरंदर तालुक्यातील वाल्हे आणि पिसुर्टी या गावां मध्ये करण्यात आले.     ही एसटी बस वाल्हे येथील बस थांब्यावर आल्या नंतर, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांच्या हास्ते, वाहतूक नियंत्रण गायकवाड, वाहक गणेश भुजबळ व चालक फाळके यांचा शाल, नारळ, हार, देऊन व पेढे भरवून स्वागत करण्य...

पालखीतळा समोरील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर : उपसरपंच राजेश काकडे यांची माहिती

इमेज
  पालखीतळा समोरील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर : उपसरपंच राजेश काकडे यांची माहिती   नीरा दि.७     नीरा ( ता. पुरंदर) येथील पालखीतळाच्या समोरील खड्डा बुजवून तो रस्ता चांगला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संजय जगताप यांच्या पुढाकाराने एक कोटीचा निधी मंजूर झाला असून येत्या २२ तारखे पूर्वी तो रस्ता पूर्ण होईल अशी माहिती निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे.   नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक ७ जून रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे ,उपसरपंच राजेश काकडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाले की, नीरा शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देत आहेत. ग्रामपंचायतीने पाठ पुरावा केल्यानंतरच कामे मंजुर होत असतात.कोणीही मी पत्र दिलं म्हणून काम झालं म्हणून ठीमकी मिळवण्याची गरज नाही.कारण या कामांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मगणीं केली तेव्हाच ती कामे मंजूर होत असतात.   नीरा- शिवत...

सासवड शहरातील गुंड अतिश दळवी यास 2 वर्षाकरिता केले पुणे जिल्ह्यातून तडीपार’’

इमेज
 सासवड शहरातील गुंड अतिश दळवी यास दोन वर्षाकरिता केले पुणे जिल्ह्यातून तडीपार’’  सासवड दि.६           सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुंड अतिश दळवी, यास पुणे पोलिसांनी दोन वर्षा साठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आले आहे. याबाबतची माहिती सासवड पोलिसांनी दिली आहे.   गेले पाच वर्शापासुन गुंड अतिश दळवी हा गुंडगिरी करून सासवड शरात व परीसरात वेगवेगळया प्रकारे दहशत माजवत असल्याने तसेच त्याचे वर्तनात कसलाही बदल होत नसल्याने सार्वजनिक शांततेचा भंग होवुन सार्वजनीक मालमत्ता व लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्याचे दिसुन येत असल्याने त्याचे गुन्हेगारी कृत्यास आळा बसविण्यासाठी, तसेच सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासातुन प्रतिबंध व्हावा म्हणुन उप.विभागिय पोलीस अधीकारी भोर विभाग सासवड. धनंजय पाटील यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब घोलप सासवड पोलीस स्टेशन यांनी गुंड अतिश दळवी यास पुणे शहर व पुणे जिल्हयातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव दौंड पुरंदरचे उपविभिय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड, यांचेकडे सादर केला होता. त्याची सुनावणी झाल्यानंतर प्रमोद ग...

धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार.

इमेज
 चंदननगर येथे धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार.     पुणे दि.२८          पुण्यातील चंदननगर येथे एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.  पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही पीडित मुलगी गर्भवती राहिली असल्याने  हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.       विशाल पिराजी शिखरे  अस अटक करण्यात आलेल्या वीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो खराडी परिसरातील रहिवासी आहे. हा आरोपी ओळखीचा असून पिडीतेच्या घरी  त्याच येणे जाणे होतं. आरोपीने ओळखीतून या पिडीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकारची कुणाला माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी  या पिडीत मुलीला दिली. या पीडित मुलीची वैद्यकीय त...

सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप

इमेज
 सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप पुणे दि.२७     राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत. तर त्या सर्व टोळीचा प्रमुख असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातूनच ते काहीही बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत.' ना घर का ना घाट का' अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य बिघाडलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोकेदायक आहे. त्यामुळे त्यांनी घरी जावे घरातील माय माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहत असेल दोन घास खावे. आणि मानसिक आजारावर उपचार करून आराम करावा.असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.      चंद्रकांत पाटील यांची जीभ पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्या वर घसली होती. मासानात जा असा शब्द त्यांच्या तोंडातून निघाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा मानसिक दिवाळखोरीच...

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

इमेज
 पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक पुणे दि.२६    पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आणि व्यवसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी किडीने चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून अविनाश भोसले यांचा शोध ते घेत होते. इडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत  भोसले यांची चौकशी केली होती. गेल्या काही दिवसापासून भोसले यांच्या घरी छापे टाकण्यात आले  होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर काय कारवाई करणार हे येणाऱ्या  काळातच समोरील येईल.  ईडीने  गेल्या वर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सी बीआय कडून  त्याचा शोध घेतला जात होता. त्यांना आज (दि.२७) पुण्यात अटक करण्यात आली.  अविनाश भोसले यांच्यावर इडीने गेल्यावर्षी  कारवाई केली होती. भोसले यांची 40 कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती.  त्यांच्या व्यावसायिक भगिदरांवर  देखील छापे टाकण्यात आले होते.  डीएचएफएल लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्य...

महाराष्ट्र दिनी नीरा ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले कर्मचार्यांच्या हस्ते.

इमेज
 महाराष्ट्र दिनी  नीरा ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले कर्मचार्यांच्या हस्ते. नीरा दि.१  आज एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीचे वरीष्ठ लिपिक गणिभाई सय्यद व कनिष्ठ लिपिक सचिन ठोंबरे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.     पुणे जिल्ह्यासह पुरंदर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नीरा ग्रामपंचायतीत मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर सरपंचपदी तेजश्री काकडे, तर उपसरपंचपदी राजेश काकडे यांनी पदभार स्विकारला, त्यानंतर प्रत्येक राष्ट्रीय सणाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ध्वजारोहण करत असतं. आज रविवार दि.१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सकाळी आठ वाजता ग्रामपंचायतीचे जेष्ठ कर्मचारी गणिभाई सय्यद व सचिन ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजसस्थंभाचे पुजन करत ध्वजारोहण...

सासवड येथे दोन महिलांनी वकिलाच्या बॅग मधील ५० हजार लांबवले

इमेज
 सासवड  येथे दोन महिलांनी वकिलाच्या बॅग मधील ५० हजार  लांबवले सासवड दि.३०     पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पुणे जिल्हा बँकेत  पैसे काढायला गेलेल्या वकिलाला  येथे असणाऱ्या दोन अनोळखी महिलांनी चांगलीच हातचलाखी दाखवली आहे यामध्ये त्यांचे पन्नास हजार रुपये चोरीला गेले आहेत.या बाबत त्या वकिलाने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम   ३७९ व ३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे.     याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात वकील असलेले व खानवडी तालुका पुरंदर येथे राहणारे स्वप्नील एकनाथ होले यांनी फिर्याद दिली आहे.त्यानीं दिलेल्या फिर्यादी नुसार काल दिनांक 28 रोजी सासवड येथे जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी ७५ हजार रुपये काढून त्यांच्या बॅग मध्ये ठेवले होते.थोडावेळ ते त्यांच्या मित्र सोबत बोलत असताना संशयित दोन महिला त्यांच्या पाठीमागे  उभ्या होत्या .त्यातील एका महिलेने त्यांच्या बॅग मधील पन्नास हजाराचा बंडल काढून घेतला.याबाबाच सिसी टिव्ही पुटेजही त्यांना ...

जेऊर सोसायटीच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय

इमेज
 जेऊर  सोसायटीच्या  निवडणुकीत श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय  दि.२६ पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. असून या निवडणुकीत भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.               जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी दिनांक २५ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पारपडली. या निवडणूकित श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलने सत्ता कायम राखत १०० मतांच्या फरकाने १३ :० ने विजय प्राप्त केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री उत्तम धुमाळ यांच्यावर विश्वास ठेवत सभासदांनी चौथ्यांदा संस्थेची सत्ता दिल्याबद्दल संस्थेच्या सभासदांचे त्यांनी आभार मानले. 

पुरंदर तालुक्यातील एस.टी.चे चालक गोरख शेलार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

इमेज
 पुरंदर तालुक्यातील एस.टी.चे चालक गोरख शेलार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन  खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबीयांची परवड  आर्थिक मदतीचे आवाहन गराडे दि.१२ ( वार्ताहर)  पांगारे ( ता.पुरंदर) येथील रहिवासी एसटी मध्ये चालक म्हणून असणारे गोरख ज्ञानोबा शेलार ( वय ४९ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले एसटीच्या चालू असलेल्या संपामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे कुटुंबाची आर्थिक हेळसांड झालेली आहे शेलार कुटुंबास आर्थिक मदतीची गरज आहे समाजातील इच्छुक दानशूर व्यक्तींनी शेलार कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गुरव व संदिप जगताप यांनी केले आहे.      सविस्तर वृत्त असे की जेमतेम जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबातील शेलार हे 1996-97 साली  चालक म्हणून ST सेवेत चालक म्हणुन दाखल झाले.2011 रोजी कामावर असताना अर्धांग वायू झाला. त्यामध्ये ते ऑफिस मध्ये शिपाई म्हणून काम करत होते. कुटुंबात आई ,पत्नी ,3 मुली व एक मुलगा असा परिवार आहे.     तुटपुंज्या पगार घेऊन कुटुंब सांभाळून 3 मुलींना शिक्षण देऊन त...

नीरा येथे भर चौकात ऊसाने भरलेली ट्रॉली झाली पलटी.ट्रकचे किरकोळ नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही.

इमेज
 नीरा येथे भर चौकात ऊसाने भरलेली ट्रॉली झाली पलटी.ट्रकचे किरकोळ नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही.   नीरा दि.१         पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आंबेडकर चौकात भरधाव वेगाने ऊस घेऊन निघालेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र शेजारून जाणाऱ्या ट्रकवर ऊस पडल्याने ट्रकचे नुकसान झाले आहे.         नीरा येथील आंबेडकर चौकात आज दिनांक १ एप्रिल रोजी जेजुरी येथून ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. शरयू कारखान्यासाठी हा ऊस नेला जात होता. ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असल्याने ट्रॉलीला झोला बसल्याने दोन पैकी एक ट्रॉली जागेवरच पलटी झाली.त्यावेळी मोरगाव बाजूकडून आलेल्या ट्रकवर यातील ऊस पडला आणि ट्रकचे नुकसान झाले. आठ दिवसात लोकवस्तीत उसाची ट्रॉली पलटी होण्याची ही दुसरी घटना आहे.या पूर्वी जेजुरी येथील मुख्य असणाऱ्या शिवाजी चौकात ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली होती. तर ट्रॅक्टर दुकानात शिरल्याने दुकानाचेही मोठे नुकसान झाले होते.दरम्यान अशा प्रकारे ऊस वाहतूक करताना सुरक्षा नियमांची अम्मल बजावनी करावी अशी ...

जेजुरीतल थकीत घरपट्टी, पाणीपट्टीवर आता दरमहा दोन टक्के दंड आकाराला जाणार : नगरपरिषदेची माहिती.

इमेज
 जेजुरीतल थकीत  घरपट्टी, पाणीपट्टीवर  आता दरमहा दोन टक्के दंड आकाराला जाणार : नगरपरिषदेची माहिती.  जेजुरी दि.३०        पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगर परिषदेच्या वतीने एक एप्रिलपासून थकीत मिळकत करा वर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे  देण्यात आली आहे. याबाबतचे एक निवेदन नगरपरिषदेच्यावतीने प्रसिद्धीसाठी आज दिनांक ३० मार्च रोजी देण्यात आलंय    जेजुरी नगर परिषदेच्यावतीने वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे. मात्र अनेक मिळकतदार ही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी  व इतर कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र तरी देखील लोक घरपट्टी भरत नाहीत. काही लोकांचे तीन ते चार वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे दिनांक एक एप्रिल २०२२  पासून या थकित घरपट्टीचे रकमेवर दोन टक्के दरमहा दंड लावण्याचा निर्णय नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६० अ नुसार हा दंड आकारण्यात ये...

माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा..

इमेज
 माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा..  माळशिरस दि.२९   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरामध्ये र दिनांक 27 28 आणि 29 मार्च या दिवशी किरणोत्सव सोहळा रंगला होता, सूर्याची किरणे या तीन दिवशी थेट शंभू महादेवाच्या पिंडीवर पडत असल्याचा अनुभव येथील भक्तांनी याची डोळा याची देही अनुभवला       पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील, पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या भुलेश्वर महादेवाच्या मंदिरात दर वर्षी २७ मार्च २८ मार्च आणि २९ मार्च असा सलग तीन दिवस किरणोत्सव सोहळा होत असतो. गेल्या तीन वर्षांमध्ये हा योग भुलेश्वर भक्तांना पाहता आला नव्हता. कोरोणा या विषाणूजन्य आजारामुळे सलग तीन वर्ष न पाहता आलेला किरणोत्सव... या वर्षी सलग तीन दिवस उपस्थित राहून भुलेश्वर भक्तांनी पाहण्याचा आनंद घेतला... यावेळी 'हर हर महादेव' 'भुलेश्वर महाराज की जय', असा जयघोष करत भक्तगणांनी भुलेश्वराचे दर्शन घेतले.