Type Here to Get Search Results !

नीरा येथे भर चौकात ऊसाने भरलेली ट्रॉली झाली पलटी.ट्रकचे किरकोळ नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही.

 नीरा येथे भर चौकात ऊसाने भरलेली ट्रॉली झाली पलटी.ट्रकचे किरकोळ नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही.



  नीरा दि.१



        पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आंबेडकर चौकात भरधाव वेगाने ऊस घेऊन निघालेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र शेजारून जाणाऱ्या ट्रकवर ऊस पडल्याने ट्रकचे नुकसान झाले आहे.



        नीरा येथील आंबेडकर चौकात आज दिनांक १ एप्रिल रोजी जेजुरी येथून ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. शरयू कारखान्यासाठी हा ऊस नेला जात होता. ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असल्याने ट्रॉलीला झोला बसल्याने दोन पैकी एक ट्रॉली जागेवरच पलटी झाली.त्यावेळी मोरगाव बाजूकडून आलेल्या ट्रकवर यातील ऊस पडला आणि ट्रकचे नुकसान झाले. आठ दिवसात लोकवस्तीत उसाची ट्रॉली पलटी होण्याची ही दुसरी घटना आहे.या पूर्वी जेजुरी येथील मुख्य असणाऱ्या शिवाजी चौकात ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली होती. तर ट्रॅक्टर दुकानात शिरल्याने दुकानाचेही मोठे नुकसान झाले होते.दरम्यान अशा प्रकारे ऊस वाहतूक करताना सुरक्षा नियमांची अम्मल बजावनी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ व अमोल साबळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies