जेजुरी येथील सिंह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाईची आरपीआयची मागणी

जेजुरी येथील सिंह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाईची आरपीआयची मागणी हॉस्पिटल अनाधिकृत, असल्याचे म्हणत री. पा. इ करणार मुख्याधिकारी कार्याल्यासमोर हलगी नाद आंदोलन जेजुरी : महाराष्टाचे कुलदैवत म्हणून जेजुरी सर्वत्र सुपरिचित आहे. याठिकाणी बहुवीध प्रांतातून, प्रदेशातून लोक वास्तव्यास आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने येथे देशाच्या काना कोपऱ्यातून येऊन लोक उदर निर्वाह करीत आहेत. तशाच काहींशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी संपादन नं करता, कोणत्या तरी डॉक्टर च्या हाता खाली कंपाउंडर म्हणून शिकलेल्या व जुजबी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने मल्हार नगरीत दवाखाना नव्हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेजुरी येथे सिंह मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने पुणे -पंढरपूर पालखी महामार्गा लगत हॉस्पिटल सुरु आहे. पूर्वी छोट्या स्वरूपात जुन्या जेजुरी येथे एका खोलीत हे सुरु होते. आत्ता मात्र एखाद्या मल्टि नॅशनल हॉस्पिटलला लाजवेल अशा स्वरूपात हे हॉस्पिटल सुरु आहे. या...