मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार.
अधिवेशनासाठी राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन
पिंपरी :
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन १९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी म्हणून आयोजित केलेल्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण अधिवेशनाचे तयारी व इतर बाबींची माहिती घेतली, तसेच या अधिवेशनासाठी म्हणून राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये हे अधिवेशन होत असल्याने हा पिंपरी चिंचवड शहराचा गौरव आहे असे उद्गार यावेळी काढले.
अधिवेशन कोठे होत आहे, त्या स्थळाबाबतची माहिती, पत्रकारांच्या निवास व्यवस्थेबाबतची माहिती तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती अजित पवार यांनी यावेळी घेतली. या बैठकीस आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, योगेश बहल, संजोग वाघेरे पाटील, नाना काटे, मयूर कलाटे, मंगलाताई कदम, संतोष बारणे, मायाताई बारणे, माई काटे, राजाभाऊ बनसोडे, प्रशांत शितोळे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.
पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले ज्येष्ठ पत्रकार व अधिवेशन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे, राज्य पत्रकार परिषदेचे निरीक्षक श्रीराम कुमठेकर व श्रावणी कामत तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.