Posts

Showing posts with the label देवेंद्र फडणवीस राजभवनावर;

सर्वात मोठी बातमी ! महिला नेत्यांनी गृहखात्यावर बोट ठेवताच, देवेंद्र फडणवीस राजभवनावर; राज्यपालांशी चर्चा काय?

Image
  मुं बई:   गेल्या काही दिवसांपासून सत्तेतील राजकीय नेत्यांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यामुळे महिलांचा अवमान होत आहे. तसेच गृहखात्याकडून अशा नेत्यांना समज देण्याऐवजी एकप्रकारे बळच दिलं जात असल्याने महिला नेत्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. आज विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही भावना बोलून दाखवतानाच गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तसातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात यावेळी चर्चा करण्यात झाल्याचं सांगितलं जातं. राज्यपालांकडून यावेळी फडणवीस यांना काही सूचना करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान , महिला ख...