पोस्ट्स

दिंद्रुड (बीड) :आईचे शिवणकाम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आईचे शिवणकाम, वडिलांच्या शेतातील कष्टाचे चीज झालं; स्वयंअध्ययन करून पोरग MPSC पास

इमेज
  दिंद्रुड (बीड) :   माझ्या मुलांना उच्च शिक्षण द्यायच आहे , त्यांना अधिकारी करायचे आहे हे स्वप्न मनी बाळगत आईने दिवसरात्र शिवणकाम तर वडिलांनी शेतात काबाडकष्ट केले. या कष्टाचे आता चीज झाले असून त्यांच्या मुलाने सचिन व्‍यंकटी वनवे याने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता स्वयंअध्ययन करत थेट मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी सचिनची नेमणूक झाली आहे. चोपनवाडी येथील व्‍यंकटी वनवे हे शेतकरी आहेत. कोरडवाहू शेती जोपासताना नाकी नऊ येत असताना आपल्या तीन मुलांना कसे शिकवायचे या विवंचनेत होते. पत्नी शांताने त्यांना साथ देत शेती सोबतच शिवणकाम काम करत संसाराला पाठबळ दिले. हलाखीच्या परिस्थितीत सचिनचे इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण चोपनवाडी येथे झाले. परगावी शिक्षणासाठी जाण्यास खर्च झेपत नसल्याने आपल्या मामाकडे वडवणी येथील महाराणी ताराबाई विद्यालयात सचिनने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासात चाणाक्ष व हुशार असलेल्या सचिनला मामांनी पुढे अहमदपूर येथे शिक्षणासाठी पाठवले. अहमदपूर येथे शिक्षण घेत असताना सचिनने शिकवणी घेणे सुरु केले. य...