Monday, October 31, 2022

सासवड येथे खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकारांचे आमरण उपोषण सुरू

 न्याय मागण्यासाठी आता पत्रकारांनाही करावा लागतेय संघर्ष

सासवड येथे खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकारांचे आमरण उपोषण सुरू



     

सासवड दि.१


          पुरंदर तालुक्यातील नीरा औट पोस्टच्या खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकारांचे उपोषण करण्यास सुरवात केलीय.आज सोमवारी सकाळी पत्रकार संघटनेचे भरत निगडे हे उपोषण सुरू केलंय. पोलिसांनी हडप केलेल्या लोकवर्गणीची व वाहतूक कोंडीच्या बातम्या लिहल्या प्रकरणी खोटा तक्रारी अर्ज दाखल करून चौकशीसाठी बोलावून पत्रकार भरत निगडे यांना एक लाख रुपयांच्या खंडणीची पोलिसांनी मागणी केली.ती देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्यांना मारहाण केली.निगडे यांनी तक्रार दिली असता पोलिसांनी ती तक्रार घेतली नाही व त्यांच्या विरोधात खोटा गुन्हाही दाखल केला. त्यामुळे निगडे यांनी आज पासून उपोषण सुरू केलंय.

       पोलिसांच्या चुकीच्या कमाबद्दल निगडे यांनी वृत्तपत्रातून पोल खोल केली होती याचा राग घेऊन पोलिसांनी  

खोटा तक्रारी अर्ज दाखल करून घेऊन निगडे यांना चौकशीच्या नावाखाली पोलीस चौकीत बोलावून प्रकरण मिटविण्यासाठी एक लाखाच्या खंडणीची मागणी केली होती.निगडे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांना धक्का बुक्की करण्यात आली. यानंतर निगडे यांनी जेजुरी पोलिसात याबाबत तक्रार दिली होती.मात्र पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे व्यथित होऊन निगडे यांनी आज पासून सासवड येथील उपविभागीय कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Saturday, October 29, 2022

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन

 


 सासवड दिनांक. ३०



    अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर तालुक्यातून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले याबाबत शनिवार (दिनांक 29) रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक पारपडली या बैठकीत मोटरसायकल रॅली काढण्याचं जाहीर करण्यात आले 


 पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३.नोव्हेंबर रोजी सासवड ते लोणावळा अशी ही मोटार सायकर रॅली कढण्यात येणार आहे .आज सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गणेश जगताप ,तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरूगे , व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.



पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण

 पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण




पुरंदर :  दि.२९ 


       पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पोलीस दुरर्क्षेत्रातील पोलिसांनी पत्रकार भरत निगडे यांना  चौकशीसाठी बोलून कथित प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हे नोंद करू असा इशारा देत पत्रकार संघटनेच्या राहुल शिंदे व भरत निगडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. एवढे होऊनही कथित प्रकरणाचा गुन्हा तब्बल दोन महिन्यांनी दाखल करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला. खंडणी वसूल करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी करूनही वरिष्ठांनी गुन्हे नोंद न केल्याने व्यथित होऊन शिंदे, निगडे व इतरजणांनी सोमवार ता.३१ पासून सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 


            पत्रकार व पोलीस हे कायद्याचे रक्षक असून लोकशाहीचे स्तंभ आहेत. मात्र, पोलिसांच्या हातातील अतिरिक्त अधिकारांमुळे पत्रकारांची गळचेपी नित्याची झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरत निगडे यांनी नीरा शहरातील वाहतूक कोंडी बाबत काही महिन्यांपूर्वी बातमी दिली होती. या वेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी एका खाजगी व्यक्तीची बेकायदा नेमणूक केली होती. पोलिसांनी प्रत्यक्ष काम न करता, आपल्या कर्तव्यात कसूर करून तिऱ्हाईत व्यक्तीकडून वाहतूक नियंत्रित करण्याचा केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत न होता प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. निगडे यांनी दिलेल्या बातमीनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधित तक्रारदाराने केली. याला पोलिसांनी खतपाणी घालून प्रकरण जातिवाचक बनविल्याचा आरोप निरेतील विविध संघटना करीत आहेत. 

सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर यांनी तक्रार अर्जाची चौकशी करायची आहे, असे म्हणून निगडे यांना पोलीस चौकीत बोलून घेतले. त्यावेळी संदिप मोकाशी, निलेश जाधव यांनी निगडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी प तक्रारदार पोलीस दुरक्षेत्रात होते. प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये द्या. अशी मागणी पोलिसांनी केली. यानंतर निगडे यांनी आम्ही लिहलेली बातमी चुकीची नाही. ती बरोबर आहे, चुकीची असेल तर खुशाल गुन्हा दाखल करा असे म्हटले. यानंतर पोलिसांनी त्यांना शिवीगाळ व धक्का बुक्की केली. त्यानंतर राजेंद्र भापकर, हरिश्चंद्र करे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली. 


       यानंतर निगडे जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद न घेता केवळ तक्रारी अर्ज दाखल करून घेतला. या उलट पोलिसांनी निगडे व शिंदे यांच्यावरच गुन्हे नोंद करीत कायद्याचा दुरुपयोग केल्याची चर्चा आता रंगत आहे. 


     यापूर्वी अनेक प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी तसेच घटनास्थळीचे घेतलेले साक्षीदार तेच ते आहेत. आपले म्हणणे कोर्टात सादर करण्यासाठी पैशाची मागणी करणे, पैसे न दिल्यास 'से' वेळेवर न देणे, अवैध धंद्यांची पाठराखण करणे या व अन्य अनेक प्रकरणात आता पोलिसांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

  

   'नीरा आणि परिसरात पोलीस अनेक वेळा त्यांच्या कर्तव्यात कसूर करतात. परिसरातील अनेक बेकायदा कामांना पोलीस मुक संमती देतात. त्यामुळे नीरा परिसरात गुन्हेगारी वाढते आहे. पोलिसांच्या अनेक कृष्ण कृत्याची पोल खोल आम्ही केली आहे. त्यामुळे पोलीस आमच्यावर दबाव टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. पत्रकार म्हणून आम्ही रोख ठोक लिखाण करू नये म्हणून दबाव टाकला जातो. त्यांचे वरिष्ठ अधिकारीही त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे न्यायासाठी आत उपोषण शिवाय पर्याय राहिला नाही." 


भरत निगडे : पत्रकार

ऊस दराबाबत आंदोलन चिघळले : आंदोलकांनी आडवली ऊस वाहतूक करणारी वाहने

 ऊस दराबाबत आंदोलन चिघळले : आंदोलकांनी आडवली ऊस वाहतूक करणारी वाहने



शिरोळ : ऊस दरासाठी सुरू असलेले शिरोळ तालुक्यातील आंदोलन चिघळले असून, भरलेली ऊस वाहने रोखत असताना आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.वाहने आडवीत असताना काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या उसाचे नुकसान होऊ नये, वाहनातील ऊस साखर कारखान्याकडे गाळपास जावा, अशी भूमिका आंदोलकांच्या समोर घेतल्याने पोलिस संरक्षणात वाहने कारखान्याकडे रवाना करण्यात आली.

शिरटी फाटा येथे अडविली वाहने


आंदोलन अंकुशच्या वतीने गेली चार दिवस 'ऊस दर जाहीर करा, मगच ऊस गाळप करावा' अशी भूमिका घेत ऊसतोड व ऊस वाहतूक बंद करण्याचे आंदोलन सुरू केले होते. याकरिता सकाळी शिरोळमधील शिरटी फाटा येथे सर्व साखर कारखान्याकडे जाणारी उसाने भरलेली वाहने रोखून धरली होती.. या ठिकाणी धनाजी चुडमुंगे व आंदोलन अंकुशचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ठाम भूमिका घेत साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता आरएसएफ फॉर्मुलानुसार मिळावा, मगच ऊस तोडी द्याव्यात अशी मागणी केली.


वाहने अडविताच पोलिसांचा हस्तक्षेप


आंदोलनस्थळी उपस्थित असणारे ऊस उत्पादक शेतकरी व वाहन मालकांनी आमचा ऊस वाळत आहे. आमचे नुकसान होत आहे. तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही भरलेले उसाची वाहने कारखान्याकडे गाळपास जावीत अशी भूमिका आंदोलकांच्या समोर मांडली. आंदोलक वाहने सोडत नसल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहने कारखान्याकडे पाठवण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलन वाहनांच्या समोर येत असल्याचे पाहून धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


आंदोलन दडपण्याचा प्रयत्न


आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर साखर कारखानदार व भांडवलदारांनी दडपशाही मार्गाने पोलिसांना हाताशी धरून हे आंदोलन मोडीत काढण्याच्या दृष्टीने काही कारण नसताना आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असा आरोप आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या घटनेचा निषेध करीत त्यांनी शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.


यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अमोल गावडे, अक्षय पाटील, कृष्णात देशमुख, आनंदा भातमारे, आप्पासो कदम, शशिकांत काळे, महेश वठारे, प्रभाकर , बंडगर, सागर सावंत, गणेश सावंत, शिवाजी पाटील, बंटी माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिरोळचे माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, दत्त नागरी पतसंस्थेचे संचालक शिवाजीराव जाधव, अगरचे माजी सरपंच दिलीप चव्हाण, मोहन कांबळे, प्रकाश कोरे यांनी शेतकरी व वाहन मालकांच्या वतीने भूमिका मांडली.

पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती

पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त 
 पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती





मुंबई: पोलीस भरतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी १ नोव्हेंबरपासून भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली   आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

आज (दि.२९) स्थगिती देण्यात आली आहे .भरती बाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासकीय कारणामुळे पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. गेली ३ वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी अपात्र ठरणार होते. भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरतील तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

Friday, October 28, 2022

मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी

 मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन

मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी 



पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे..

 मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती - जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणारया पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे..

"मी अँकर" हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.. पिंपरी चिंचवड येथील शंकरराव गावडे कामगार भवनात होणारया या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, अरूण नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, अनिल बडघुले यांनी केलं आहे..

जेऊर येथे युवकांनी दिले हरणाला जीवदान

 जेऊर येथे  युवकांनी दिले हरणाला  जीवदान



नीरा दि.२८


   पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे युवकांनी व छोट्या मुलांनी एका हरणाला  जीवदान दिले आहे. कुत्र्याच्या तावडीतून हरणाची सुटका करण्यात या मुलांना यश आले आहे.या हरणाला आता वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार  आहे.



      आज शुक्रवार दिनांक 28 रोजी  जेऊर येथील प्रज्वल प्रकाश जाधव श्रावणी विजय जाधव,  श्रावण विजय जाधव,

 व विजय जाधव हे शेतात काम करीत होते.यावेळी जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या हरणाचा आवाज त्यांना आला .त्यांनी आवाजाच्या दिशेने पहिले असता दोन कुत्री त्या हरणाला मारत असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.यानंतर  त्यांनी वनविभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली आहे या हरणाला ते वनविभागाच्या ताब्यात देणार आहेत.या युवकांनी दाखवलेल्या धाडस बद्दल त्यांचं ग्रामस्थांनी कौतुक केलय...

Thursday, October 27, 2022

भांडण बापाशी जीव घेतला चिमुकल्याचा , पूणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!!

भांडण बापाशी जीव घेतला चिमुकल्याचा , पूणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!!

       चार वर्षांच्या मुलावर ; थेट ट्रॅक्टरच अंगावर घातला आणि चिमुरड्याचा केला खुन




पुणे

इंदापूर तालुक्यात एका चार वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या चार वर्षांच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला आणि त्याचा खून करण्यात आला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं कळतंय. इंदापूर तालुक्यातील सरसेवाडी गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजलीय.

अबुजर जब्बार शेख असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. जमीन व्यवहाराच्या भांडणातून हा प्रकार घडला. वडिलांसोबत असलेल्या भांडणाचा वचपा त्याच्या निष्पाप मुलावर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरसेवाडी गावच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला.

यात अबुजरचा मृत्यू झाला.इंदापरू पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हाचा गुन्हा दाखल करुन घेतला. तसंच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराचा खळबळजनक घटनाक्रमाचा खुलासाही केला आहे. सरसेवाडी जाधव पाटी इथं राहणारे 36 वर्षीय जब्बार गफूर शेख यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रारीनुसार जयप्रकार नरहरी देवकाते याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. जयप्रकाश देवकाते याने जब्बार गफूर शेख यांच्या मुलगा अबुजर शेख (वय 4 वर्ष 2 महिने) याच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच 12 एफ 1248 होता.

आधीच असलेल्या जमीन व्यवहाराच्या भांडणातून जयप्रकाश याने आपल्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप जब्बार यांनी केलाय. अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्यानं त्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्या डोक्याला, तोंडाला आणि उजव्या कानाजवळ गंभीर मार बसला होता. गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ट्रॅक्टर मुलाच्या अंगावर घातल्यानंतर जयप्रकाश ट्रॅक्टर शेतातच सोडून पळून गेला होता. इंदापूर पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे. सध्या त्याची कसून तौकशी केली जाते आहे. अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी चौक खडकपुरा इथं सध्या राहायला आहे. तो मूळचा सरसेवाडी जाधव वस्तीतीलच असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

बापरे !!!!! अंत्यसंस्काराला घेऊन जात असताना "हा" तरुण अचानक तिरडीवरुनच उठला

बापरे !!!!! अंत्यसंस्काराला घेऊन जात असताना "हा" तरुण अचानक तिरडीवरुनच उठला ; स्वतःला मृत घोषित करून जिवंत असल्याचा केला स्टंट




अकोला 

पातूर तालुक्यातील विव्हरा येथील गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला. हा अघोरी कृत्याचा प्रकार चान्नी पोलिसांनी फेटाळून लावला आहे. या घटनेत सदर युवकाचा मृत्यूच झाला नव्हता. तो जिवंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं पोलीस म्हणतायत.

या युवकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो शारीरिक दृष्टीने सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील विव्हरा या गावात एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरली. त्याची अंत्यविधीची तयारी सुरू झाली. त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. त्या युवकाची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली.

मग अचानक त्या तरुणाला जाग आली. तो तिरडीवरुन उठून बसला. प्रशांत मेसरे असं तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेत या घटनेत मागची सत्यता समोर आणली. संबंधितांची चौकशी केली.

डॉक्टरांनी मृत घोषित न करता किंवा मृत्यू झाल्याचा कुठलाच पुरावा नसतानाही प्रशांत मेसरे मृत झाला असल्याचे का सांगितले गेले. या घटनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मृत व्यक्ती जिवंत करुन दाखवा आणि 25 लाख घेऊन जा” असे आव्हान अनिसचे प्रदेश प्रवक्ता पुरषोत्तम आवारे यांनी केले आहे. प्रशांत मेसरे हा होमगार्डमध्ये आहे. या युवकाची तब्येत बरी नव्हती. त्याला बुलढाणा जिल्हातल्या खामगाव येथे चक्कर आला होता. तेव्हा त्याला खामगाव येथील रुग्णालयात दाखविण्यात आले.

त्याची तब्बेत ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरने पोलिसांना दिली. या घटनेत भोंदूबाबाची चर्चाही रंगत आहे. मात्र अंगात कुठल्याही प्रकारची दैवीशक्ती नाही. केवळ लोकांमध्ये अफवा व भीती निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले. असा दावा पोलिसांनी केलाय.

जेजुरी मोरगाव मार्गावर भीषण अपघात, कारने धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू


जेजुरी मोरगाव मार्गावर भीषण अपघात, कारने धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू




बारामती

तालुक्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर अर्बन क्रूजर कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या तिघांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

दशरथ साहेबराव पिसाळ (62), अतुल गंगाराम राऊत (22) आणि  नंदा राऊत अशी मृतांची नावं आहेत.पिसाळ हे रस्त्यावरून जात होते. तर राऊत कुटुंबीय दुचाकीवरून प्रवास करत होते.याचदरम्यान तिघांना कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. नंदा राऊत या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेले दशरश पिसाळ माळवाडी येथील फोंडवाडाचे रहिवाशी होते. तर राऊत कुटुंबीय करावागज येथे राहत होते. क्रूजर बारामतीहून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. तर दुचाकी पुण्याहून बारमतीकडे रवाना झाली होती.

फोंडवाडाजवळ कारने दुचाकील धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघात झालेली कार पोलिसांनी जप्त केली. परंतु, कारचालक फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

धक्कादायक !!!! “आनंदाचा शिधा" तून तेल गायब, शंभर रुपयांची कीट पडतेय दोनशेला

 धक्कादायक !!!! “आनंदाचा शिधा" तून तेल गायब, शंभर रुपयांची कीट पडतेय दोनशेला





औरंगाबाद

सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने 'आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा केली. मात्र 'आनंदाचा शिधा' सुरवातीपासूनच वादात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. आधी 'आनंदाचा शिधा'च्या पिशव्यांवर स्टिकर लावण्याचे काम सुरु असल्याने वाटपास उशीर झाल्याचा आरोप झाला.

त्यातच आता 'आनंदाचा शिधा' पाकिटातून तेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज दिवाळीच्या दिवशी देखील औरंगाबाद जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप केला जातोय. मात्र यामध्ये केवळ तीनच वस्तू दिल्या जात आहे. सद्या अनेक ठिकाणी रवा, साखर आणि चना डाळ या पाकिटातून दिल्या जात असून, गोड तेलाचा पुडा मात्र गायब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण तालुक्यासह इतर ठिकाणी देखील तेल मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे रेशन दुकानदारांना डाळ रवा आणि साखरच द्यावी लागते, यासाठी 75 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 125 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तेल विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना आनंदाची शिधा 200 रुपयांना पडत आहे.नागरिकांना वाटपासाठी आलेल्या ‘आनंदाचा शिधा'च्या कीटमध्ये तीनच पदार्थ आले असून, तेल गायब आहे. त्यामुळे रेशन दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक तेलबाबत विचारत आहे. पण वरूनच तेल आले नसल्याचे प्रत्येक ग्राहकांना समजून सांगताना दुकानदारांची दमछाक होत आहे.

तर अनेक ठिकाणी तुम्हीच तेल वाटप करत नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांवर होत असल्याने, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहे.

त्यामुळे अशात सरकारने घोषणा केलेल्या 'आनंदाचा शिधा वाटपाच्या निर्णमुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता सरकारची 'आनंदाचा शिधा 100 एवेजी 200 रुपयांना पडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे


मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी

 मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी 

उपमुख्यमंञी फडणवीस खा.सुप्रियाताई सुळे यांना निमंत्रण :  तर मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा 

    


मुंबई--

मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19, व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या ची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाची निमंत्रण दिले पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांनाही समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यां मध्ये आल्या आहेत राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.



मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ करत आहे व सर्व व्यवस्था व नियोजन हे अंतिम टप्प्यात असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह या अधिवेशनाचा आढावा नुकताच घेतला व काही सूचना केल्या व पुढील नियोजनाबद्दलही सर्वांची चर्चा केली या अधिवेशनाचे निमंत्रण विविध मान्यवराला देण्यात आले असून परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना दिले तर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना दिले अनेक मान्यवर या अधिवेशनात उपस्थित राहणार असून पत्रकारांच्या विविध विषयावर या अधिवेशनात चर्चासत्र उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत व अधिवेशन भव्य दिव्य होत असून पिंपरी चिंचवड पत्रकार संघ हा उत्साहाने या अधिवेशनाची जोरदारपणे तयारी करत आहे या अधिवेशनास राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित रहावे व हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे



Monday, October 24, 2022

नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल

 


नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल ; 

 पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरच एक्स्प्रेस थांबवण्याची मागणी 



नीरा: 


           नीरा (ता.पुरंदर) रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबई, नागपूर, गोंदियाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म नसलेल्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांंचे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, नीरा रेल्वेस्थानकावर पूर्वीप्रमाणेच जुन्याच प्लॅटफॉर्मवरच गाड्या थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.


        नीरा स्थानकातून पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूरकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या दिवाळीमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. नीरा- पुणे लोहमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २०) रात्री बारा पासून रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस (गाडी नं. ११०३०) तसेच गोंदिया, नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस (गाडी नं. ११०२२) नीरा रेल्वे स्थानकांत तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना एक नंबरचा प्लॅटफॉर्मवर उतरून रेल्वेरूळ ओलांडून तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर उभ्या असलेल्या प्रवासी रेल्वेगाडीत बसण्याकरिता मोठी धावपळ करावी लागत आहे. 


       रेल्वे प्रशासनाने नीरा रेल्वेस्थानकात पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्यांचा प्लॅटफॉर्म बदलल्याने लहान मुल, वृद्ध, आजारी प्रवाशांची मोठी धावपळ होत असून, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरत आहे.    


       दरम्यान, रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे नीरा रेल्वे स्थानकातील जुन्या प्लॅटफॉर्म वर म्हणजेच नंबर एक वरच जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. नीरा ते पुणे यादरम्यान रेल्वेलाइनचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचे नीरा रेल्वे स्टेशन मास्टर महेश मीना यांनी सांगितले.

*******************************************

      पुणे ते नीरापर्यंत लोहमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने नीरा रेल्वेस्थानकातील तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर पुणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवीत आहेत. रेल्वेगाडीकडे जाण्यासाठी प्रवाशांनी नीरा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरून ये-जा करावी लागते.

  मनोज झंवर (जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल, पुणे विभाग) 

***********************************************

    पुणे-मिरज रेल्वे लाईनचे दुपदरीकरण व विद्युती करताना सर्व स्थानकांत नव्याने प्लॅटफॉर्म बंधन्यात आले. अगदी वाल्हा, दौंडज, राजेवाडी, आंबळे याठिकाणी ही आता दोन उंच प्लॅटफॉर्म आहेत. पण सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या नीरा रेल्वे स्थानकात मात्र अद्याप दुसरा प्लॅटफॉर्मच नसल्याचे बहुदा पुणे विभागीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहितीच नसावे, त्यामुळे काल परवा पाहणी दौरा करुनही ही चुक त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे पुणे रेल्वे डिव्हिजनल कार्यालय हे नीरा रेल्वे स्थानकातील दुसऱ्या प्लॅटफॉर्म बाबत अनिभिज्ञच असावे, असा समज आता नीरेकरांनी करुन घेतला आहे.

Friday, October 21, 2022

ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती



 रंगाबाद : शिवसेनेच्या औरंगाबाद मध्य, पश्चिम आणि पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुखपदी किशन तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली.

अखेर तनवाणींचा हट्ट मातोश्रीने पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून जिल्हाप्रमुखपद मिळाल्याने आता तरी तनवाणी सक्रीय होतील का ? असेही बोलले जात आहे.

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना पक्षाने कोणताही पक्षाने कोणतेही पद दिले नव्हते. शिवसेनेत आल्यानंतर जिल्हाप्रमुख पद देऊ असा शब्द त्यांना देण्यात आला होता. मात्र, पक्षाने त्यांना त्यांची कदर केली नव्हती. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेले. शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्षाला त्यांची आठवण आली. अडीच महिन्यापूर्वी त्यांना शिवसेनेच्या औरंगाबाद महानगरप्रमुख स्वतंत्र कारभार असलेले पद देण्यात आले होते.

परंतु, या पदावर ते समाधानी नव्हते याविषयी त्यांनी नाराजी ही व्यक्त केल्याची चर्चा होती . परिणामी स्वतंत्र भार असूनही ते शिवसेनेत फारसे सक्रिय झाले नव्हते. त्यांनी जिल्हाप्रमुख पद पाहिजे यासाठी मातोश्री कडे हट्ट लावून धरला होता. अखेर मातोश्रींनी त्यांचा हट्ट पुरविला. गुरुवारी त्यांची औरंगाबाद मध्य, पूर्व, आणि पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे आता तीन जिल्हाप्रमुख झाले आहेत. अंबादास दानवे, राजू राठोड आणि किशनचंद तनवाणी असे तिघे जिल्ह्यात काम करतील.

पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...!

 

पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...!



बारामती तालुक्यातील मुर्टी - मोरगाव रस्त्यावर सानिका हाॅटेल येथे मुर्टी गावच्या हद्दीतील ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आल्यामुळे बुधवारी रात्री बारा वाजता एक दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.

मात्र, पुरातून पोहून बाहेर निघत तो रांजणगाव गाठत बायकोला भेटला.

सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील तरुण सागर अरविंद पाटील (वय २९) हा कऱ्हाडवरून सातारा, नीरा, मोरगावमार्गे रांजणगाव येथे कामाला असणाऱ्या प्रिया सागर पाटील यांना दिवाळीसाठी घरी घेऊन जाण्यासाठी जात असताना मोरगाव - मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्तीशेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला होता. याच दरम्यान सागर पाटील हा दुचाकी या पाण्यातून घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने 'पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आतमध्ये जाऊ नकोस', असे सांगितले. मात्र, सागर पाटील हे न ऐकता पुढे गेला असता, हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दिली.

या घटनेची माहिती समजताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून मुर्टी येथील गावातील तरुणांच्या मदतीने या दुचाकीचा व वाहून गेलेल्या सागर पाटीलचा शोध सुरू केला. एका झाडाला अडकलेली त्याची गाडी सापडली, मात्र त्याचा तपास लागला नाही.

गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता हा तरुण सांगली तालुक्यातील कडेपूरचा असल्याचे समजले. कडेपूरच्या स्थानिक पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क साधला असता, तो पुराच्या पाण्यातून पोहून बाहेर निघाला आणि त्याच्या बायकोजवळ रांजणगाव येथे पोहोचला असल्याचे समजले. एकीकडे त्याच्या धाडसाचे कौतुक होत असले तरी यामध्ये ग्रामस्थ आणि प्रशासनाची मात्र दमछाक झाली आहे.

माझी बायको रांजणगाव येथे कामाला आहे. तिला दिवाळीसाठी आणायला काल सायंकाळी कऱ्हाड येथून उशिरा निघालो. रात्री बारा वाजता मुर्टीच्या ओढ्यात अचानक पाणी वाढल्याने मी पुराच्या पाण्यात वाहत गेलो. मला पोहता येत होते, एका झाडाचा आधार घेत बाहेर निघालो आणि एका ट्रकला हात करून रांजणगाव येथे पोहोचलो.

अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच

 

अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच



सेलिब्रिटी मंडळी सहसा त्यांच्या खासगी आयुष्याला गुलदस्त्यातच ठेवतात. कोणत्याही नात्यामध्ये अमुक एका वळणावर आल्यानंतरच ते नात्याची ग्वाही देतात.

गंमत म्हणजे सेलिब्रिटी जोड्या विविध पार्टी आणि कार्यक्रमांमध्येच नकळतपणे त्यांच्या खासगी आयुष्याचे संकेत देत असतात. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल, की  रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही त्यांच्या नात्यावर अशाच एका सोहळ्यादरम्यान कबुली दिली होती. अगदी ऋतिक आणि सबा आझादही  याला अपवाद नाहीत. यातच आता आणखी एका जोडीचं नाव जोडलं जाऊ शकतं.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा  याच्या घरी दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी या जोडीनं हजेरी लावली आणि त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. मुख्य म्हणजे या पार्टीआधीपासूनच त्यांच्या नात्याची चर्चा झाली. इतकंच काय, तर एकमेकांच्या नावांवरून त्यांना छेडलंही गेलं. आता अखेर हे सेलिब्रिटी कपल पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आलं.

हे Couple म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर  आणि अभिनेत्री अनन्या पांडे काहींच्या मते त्यांचा चित्रपट येत असावा म्हणून ही स्टंटबाजी. पण, प्रत्यक्षात तसं नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य आणि अनन्याच्या लग्नाच्याही चर्चा सुरु आहेत.

मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब युक्रेनला :युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती

मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब

 युक्रेनला युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती



मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेले कित्येक महिने सुरू असलेल्या युद्धाचे इतर सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत.

आता रशियाची राजधानी असलेल्या मास्को शहरांमध्ये रस्त्यावरून पुरुष अदृष्य झाले आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये जबरदस्तीने लष्करात सामील करण्याच्या भीतीने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळले आहे तर अनेक पुरूषांनी रशियाला लागून असलेल्या देशांमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मॉस्को शहराची लोकसंख्या एक कोटी वीस लाख एवढी प्रचंड आहे पण सध्या मात्र मॉस्कोतील रस्ते निर्जन दिसत आहेत. शहरातील हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये कोणत्या प्रकारची गर्दी नाही दुकानांमध्ये सुद्धा तुरळकच गर्दी दिसत आहे, त्यामध्ये महिलांची गर्दी जास्त आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात जबरदस्तीने सहभागी करून घेण्याची शक्यता असल्याने अनेक पुरूषांनी देशही सोडला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख पुरुषांनी मास्को सोडून कजाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.

शेजारी असलेला कजाकिस्तानमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसा या प्रक्रियेची गरज नसल्याने अनेकांनी तो मार्ग स्वीकारला आहे. अनेक रशियन पुरुष जॉर्जिया अर्मेनिया अझरबैजान आणि इतर पश्चिम युरोपीय देशांमध्ये रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुरुषांचे हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारण रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांनी जर देशात मार्शल लॉची घोषणा केली तर सर्व सीमा सील केल्या जातील व त्यानंतर कोणालाही देश सोडून जातात येणार नाही. याची कल्पना असल्याने आत्तापासूनच अनेकांनी रशिया सोडून जाण्यास प्रारंभ केला आहे.

मॉस्को शहरात अनेक दैनिकसाठी छायाचित्रकार म्हणून काम करणारी 33 वर्षीय स्वतीलना हिने दिलेल्या माहितीप्रमाणे राजधानी मॉस्को नव्हे तर राज्यातील अनेक शहरे जणू काही फक्त महिलांची शहरे बनली आहेत. रेल्वे असोत बसेस असोत किंवा मॉल असोत सर्वत्र फक्त महिलाच दिसत असून पुरुषांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.

Friday, October 14, 2022

पिंपळे येथे ओढ्याच्या पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह

 पिंपळे येथे ओढ्याच्या पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह



सासवड दि.१५

 

  पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथे एक मानवी मृत देह आढळून आला आहे.याबाबत स्थानिक लोकांनी सासवड पोलिसात माहिती दिली आहे. हा मृत देह महिलेचा असावा असा अंदाज स्थानिक लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे 

 आज शनिवारी सकाळी वीर सासवड रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांना पिंपळे येथे पोमान नगर कमानीच्या समोर पाण्या मध्ये एक मानवी मृत देह असल्याचे लोकांना दिसले आहे.यानंतर या ठिकाणीं लोकांची गर्दी जमली आहे. स्थानिक लोकांनी या बाबतची माहिती सासवड पोलिसात दिली आहे. हा मृत देह अडचणीत असल्याने अद्याप तिथे कोणीही गेले नाही. या बाबत पोलिस घटना स्थळी जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.दोन दिवसा पूर्वी एक वेडसर महिला या भागात फिरत होती. कदाचित तिचा तो मृत देह असावा असा अंदाज स्थानिक लोकांनी व्यक्त केलाय 


अजित पवार यांचे शरद पवार यांच्या समोरील धडाकेबाज भाषण

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला

 एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला



जळगाव : दि.१३


      शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना खोचक टोला लगावला आहे.


गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणत आमचा पक्ष हा वाणी, ब्रह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येने खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही. मात्र खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही, असे देखील महाजन यांनी म्हटले आहे.


       पुढे बोलताना महाजन यांनी एकनाथ खडसेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. खडसेंनी एक लक्षात घ्यावं माणूस हा केवळ जाती, धर्मामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि नेतृत्वक्षमतेमुळे मोठा होतो. कुणीही सांगेल, अवघा महाराष्ट्र सांगेल की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता काय आहे ती ? खडसेंना 'खूप वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण जनतेला ते वाटायला हवंना. त्यामुळे खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावे असे महाजन यांनी म्हटले आहे.


Thursday, October 13, 2022

पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५०,०००/- दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

 पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार  ५०,०००/-                      दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास 


 

मुंबई : दि.१३

हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना 50,000 हजारांचा दंड आणि पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्याला ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, पत्रकाराला धमकी देणाऱ्याला आतमध्ये तुरुंगात पाठवण्यात येईल.पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही

सीएम योगी म्हणाले की, पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि मदत करा आणि पत्रकारांशी आदराने बोला, नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.


गैरवर्तन करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर एफआयआर नोंदवला जाईल, अन्यथा एसएसपीवर कारवाई केली जाईल.

पत्रकार जमावाचा भाग नाहीत.

हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत.

पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाही.

पोलिस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.

काटजू म्हणाले, “जसा एखादा वकील आपल्या अशिलाच्या हत्येचा खटला न्यायालयात लढतो, तसा तो खुनी होत नाही. तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात पण ते गर्दीचा भाग नसतात. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.

यासंदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृह सचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलिस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

*पत्रकारांवर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.

पत्रकारांसोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाईल, जो घटनेच्या कलम 19A मध्ये देण्यात आला आहे आणि घटनेच्या या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलिस किंवा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल*.

डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल- एस.एम.देशमुख

 डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल-  एस.एम.देशमुख



अहमदनगर - दि.१२


            डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासार्हता मिळविली तर या माध्यमाला लोकमान्यता देखील मिळू शकेल असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला.. त्यावेळी देशमुख बोलत होते.. यावेळी नगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अफताब मन्सूरभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली.. कार्यक्रमास परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते..

एस.एम देशमुख यांनी डिजिटल मिडिया परिषदेच्या स्थापनेपासून मागची भूमिका विस्तारानं मांडली.. ते म्हणाले, डिजिटल मिडियाने माध्यमातील मोठा अवकाश व्यापला आहे.. राज्यात पाच हजारपेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स आणि पोर्टल कार्यरत आहेत.. या माध्यमात वीस हजारांवर पत्रकार काम करीत असून त्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत.. डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळत नाहीत, अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जात नाहीत.. त्यांना पत्रकार म्हणूनच मान्यता दिली जात नाही.. या आणि अन्य प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडविण्याचा प्रयत्न डिजिटल मिडिया परिषद करणार आहे.. मात्र हे सारं करतानाच डिजिटल मिडियाला लोकमान्यता मिळवायची असेल तर या माध्यमाला विश्वासार्हता कमवावी लागेल.. डिजिटल मिडियात आलेली बातमी केवळ सत्य आणि सत्यच असते याची खात्री जोपर्यंत लोकांना होत नाही तोपर्यंत ते या माध्यमावर विश्वास ठेवणार नाहीत असे देशमुख यांनी स्पष्ट केले..नगरच्या देदीप्यमान पत्रकारितेच्या इतिहासाचा एस.एम.देशमुख यांनी गौरवपूर्ण भाषेत उल्लेख करताना डिजिटल मिडियातील पत्रकार देखील ही परंपरा पुढे चालू ठेवतील असा विश्वास व्यक्त केला.नगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष म्हणून अफताब शेख यांची नियुक्ती करण्यात आली.. त्यांनी जिल्ह्यात फिरून सदस्य नोंदणी करून जिल्हा कार्यकारिणी तयार करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.. यावेळी एस.एम.देशमुख आणि शरद पाबळे यांच्या हस्ते अफताब यांचा सत्कार करण्यात आला.. शरद पाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले..

कार्यक्रमांस परिषदेचे मन्सूरभाई, तसेच ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम आणि डिजिटल मिडिया चे पन्नासवर पत्रकार उपस्थित होते..राज्यातील अन्य जिल्ह्यात देखील लवकरच डिजिटल मिडिया शाखा सुरू करण्यात येत असल्याचे शरद पाबळे यांनी यावेळी सांगितले..


कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली

 कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली 



 नीरा दि.१२


   पुरंदर तालुक्यातील कडेपठार डोंगरावर पिंगोरी आणि दौंडज या गावांच्या क्षेत्रात आज पहाटे जोरदार पाऊस झालाय.त्यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे जेऊर आणि पिसुर्टी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय.त्यामुळे पिसुर्टी गावाचा संपर्क तुटला असून हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी व शालेय मुलांना अडचण निर्माण झाली आहे.पिसुर्टी येथील अनेक मुले माध्यमिक शिक्षणासाठी जेऊर येथील शाळेत  जातात त्यांना  या पुरा मुळे शाळेत जात आले नाही त्यातच आता शाळेत परीक्षा सुरू आहेत.

  तालुक्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय.त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे.आज पहाटे झालेल्या या पावसामुळे पिंगोरी, दौंडज, वाल्हे,या भागातील.शेतीला देखील फटका बसला आहे. दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी  पिसुर्टीकर ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान तालुक्यात पावसाचा जोर आज दिवसभर आजूनही तसाच आहे.


Tuesday, October 11, 2022

बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले. सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प

 बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले.

सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प




नीरा : 

       सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील  बुवासाहेब ओढ्याच्या तकलादू पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले आहे. काल मंगळवारी सायंकाळी नीरा परिसराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण कमी झाले, तरी संततधार सुरूच होती. त्यामुळे राख, गुळूंचे या परिसरातील ओढ्यांतून पाणी वाहून ते पाणी बुवासाहेब ओढ्याला आले. त्यामुळे रात्री बारानंतर या तकलादू पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक सकाळी साडे दहा 


वाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे नीरा - बारामती व सातारा - नगर या मार्गावर वाहनांच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत. 


     गेली दीड वर्षापासून नीरा शहराच्या नजीक बारामती पुरंदरच्या शिवेवरील बुवासाहेब ओढ्याच्या पुलाचे काम संतगतीने सुरू आहे. हे काम सुरू असल्याने ठेकेदाराने ओढ्यातून फक्त तीन सांमेटच्या नळ्या टाकून तकलादु पुल तयार केला आहे. या तकलादू पुलावरून मागील महिन्यात सलग चार दिवस पाणी वाहिले होते. त्यावेळी या तकलादू पुलाचे नुकसान झाले होते. ठेकेदाराने पुन्हा फक्त मुरूम भरून तात्पुरती सोय केली होती. मात्र, मंगळवार रात्री झालेल्या पावसाने या पुलावरून पुन्हा पाणी वाहून गेले. त्यामुळे तो तकलादू पुल प्रवाहाच्या दोन्ही बाजूने खचला असून, भरावा एक ते दोन फुटाने वाहून गेला आहे. आता या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोकेदायक असल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुचाकी मात्र यावरून जात आहेत. 


      सध्या शाळा महाविद्यालयांच्या परिक्षेचा हंगाम आहे. नीरा व पुरंदरच्या खेडेगावातून बारामतीच्या पूर्व भागातील शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांची दररोज येत असतात. शाळेच्या बस व शिक्षक मोठ्या प्रमाणावर या पुलावरून दररोज ये - जा करत असतात मागील महिन्यात सलग चार दिवस व आज पुन्हा ऐन परीक्षेच्या तोंडावर हा पुल बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत शाळा प्रशासनाने मात्र कोणतीही कारणे चालणार नाही, शाळेत वेळेवर यावेच लागेल, असे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फर्मान काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तब्बल बारा किलोमीटरचा वळसा घालून गुळूंचे - थोपटेवाडी या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. हा मार्गही वाहतुकीसाठी धोकेदायक आहे.

Sunday, October 9, 2022

राजस्थान मधील कराटे स्पर्धेत नीरा येथील विद्यार्थ्यांनी मारली बाजी

 राजस्थान मधील कराटे स्पर्धेत नीरा येथील विद्यार्थ्यांनी मारली बाजी

  सहा सुवर्ण,दहा रौप्य तर सहा कांस्य पदकांची केली कमाई 



नीरा दि.१०


       राजस्थान मधील जयपुर  या ठिकाणी झालेल्या खुल्या भव्य  राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत  नीरा(ता.पुरंदर) येथील आयडियल के. के .बी च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नाव राजस्थान या ठिकाणी गाजवले आठ आणि नऊ आक्टोबरला  झालेल्या नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये, आयडियल तायक्वांदो कराटे कीक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रच्या विद्यार्थ्यांनी विविध वजन गटात ६ सुवर्ण,१० रौप्य  व ६ कांस्य पदकाची कमाई केली 

  यामध्ये शुभ्रा भुजबळ , शोहिब मुल्ला ,सक्षम मोरे, सूर्या शिंदे, आदित्य पवार, पृथ्वीराज ढमाळ यांनी सुवर्ण पदक मिळविले.हर्षद कोंडे ,उमंग अग्रवाल ,महेश पवार, ऐश्वर्या पाध्ये,शुभम मोरे ,कृतिका घाटे, जिया शेख, यश कापरे, साहिद मुल्ला, ओम भोसले यांनी कांस्य पदक मिळविले.तर  सई पवार ,आदर्श पवार ,सानिया शेख, अथर्व कोलते,सोहन हजारे ,अभिषेक लकडे, याना कांस्य पदक मिळाले.संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ग्रँडमास्टर श्री संजय सोनावणे आणि अभिनंदन केले. 

कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला

 कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला 



नीरा  : 

       नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. ९) सोमेश्वरनगर येथे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यापूर्वी कालव्याचे पाणी बंद पाईपलाईनने द्या, अशी मागणी करणारी मंडळी आता विरोध करण्याची नौटंकी करून जनतेची दिशाभूल करत आहेत असा घणाघात पवार यांनी केला. शेतकऱयांचा पाठिंबा असेल तरच अस्तरीकरण करणार असल्याचेही ते म्हणाले. 


सोमेश्वरनगर येथे शेतकरी मेळाव्यात पवार यांनी कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून जोरदार घणाघात केला. यंदा वीर धरणातून ४० टीएमसी पाणी वाहून गेले. निरा खोऱयातील चार धरणांची क्षमता ४८ टीएमसीची आहे. त्यातील ४० टीएमसी पाणी वाहून जाते. त्यामुळे शेततळे व इतर पर्यांयाचा विचार व्हावा, असे पवार म्हणाले. निरा डावा कालव्याची वहन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. सध्या कालवा ६५० क्युसेक वेगाने वाहतो. ही क्षमता ११०० ते १२०० क्युसेकवर जाणे गरजेचे आहे. त्यासाठी कालव्याचा पाझर, गळती कमी करावी लागेल. तालुक्यात अस्तरीकरणाला विरोध आणि पाठींबा असे चित्र आहे. अस्तरीकरणासंबंधी बळजबरी करणार नाही. शेतकरी, मतदारांचे हित साधले जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली. 


परंतु यापूर्वी बंद पाईपलाईनमधून कालव्याचे पाणी द्या अशी मागणी करणारेच आता विरोध करत दिशाभूल करत असल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. बोलायला काही नाही त्यामुळे विरोधक हा मुद्दा काढत आहेत. 


कालव्याच्या वळणावर मोठी गळती होत आहे. त्यामुळे शेतकऱयांची परवानगी असेल तर कागद न टाकता अस्तरीकरण केले जाईल. यापूर्वीही दगड, फरशांचे अस्तरीकरण होते. आता अस्तरीकरण करायचे झाले तर विहिरी, बोअरवेल यांना त्याचा फटका बसणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. सध्या कालव्याचे मजबुतीकरण केले जात आहे. बारामतीत तीन हत्ती चौकातील पुलाजवळ कालव्याची वहन क्षमता अवघी ४८० क्युसेकवर होती. आता तेथून ९५० क्युसेकने पाणी जावू शकते. त्यामुळे इंदापूरच्या शेतकऱयांनाही योग्य रितीने पाणी मिळू शकणार आहे. शेटफळ तलाव भरणे शक्य होणार आहे. हेड टू टेल सगळ्यांनाच पाणी मिळावे, अशी आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले. 


१३५ वर्षांपूर्वीचा हा कालवा मातीच्या भरावाचा आहे. १५२ किमी लांबीचा कालवा पुरंदरमध्ये १७ किमी, बारामतीत ८४ किमी तर इंदापूर तालक्यातून ५१ किमी वाहतो. कालवा दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. कालवा फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे आत्ता काम करायचे नाही तर मग कधी करणार असा सवाल त्यांनी केला. 


…तर धुरळा झाला असता 


आम्ही प्रयत्न केले नसते तर निरा डावा कालव्याचे कमी झालेले पाणी पुन्हा मिळाले नसते. उन्हाळ्यात कालव्याला पाणीच आले नसते. महाविकास आघाडी सरकारच्या रुपाने सत्तेत आल्यावर फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्याचे नुकसान नको आणि पुरंदर, बारामती, इंदापूरलाही फटका नको अशा पद्धतीने मध्यम मार्ग आम्ही काढला. धरणे पुणे जिल्ह्यात असल्याने आम्हालाही पाणी मिळावे यासाठी कायदा केला. फक्त कायदा करून थांबलो नाही तर प्राधिकरणाची, कॅबिनेटची त्याला मंजूरी घेतली. त्यामुळे भविष्यात आता पाणी वाटपाचा निर्णय कोणीही एकतर्फी घेवू शकणार नाही. कायदा केला नसता तर आज पिकांचा धुरळा झालेला दिसला असता असेही पवार म्हणाले.

एस.एम.देशमुख यांनी घेतला :अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

 एस.एम.देशमुख यांनी घेतला :अधिवेशनाच्या तयारीचा आढावा 



पिंपरी - चिंचवड : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज पिंपरी चिंचवडला भेट देऊन अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला..पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन अधिवेशनाची तयारी सुरू असल्याबद्दल देशमुख यांनी समाधान व्यक्त केले..

यावेळी बोलताना अरूण नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी मराठी पत्रकार परिषदेने विश्वास दाखवत अधिवेशनाची जबाबदारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघावर सोपविल्याबददल एस.एम देशमुख यांचे आभार मानले..

परिषदेचं हे अधिवेशन परिषदेच्या नियमानुसार आणि धयेयधोरणानुसार तसेच परिषदेच्या प्रतिष्ठेला साजेशा पध्दतीने साजरे केले जाईल असा विश्वास नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी व्यक्त केला..

अधिवेशन सर्वसमावेशक व्हावे यासाठी संघाच्या सर्व सदस्यांची मतं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी दर शनिवारी सर्व सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली.. आर्थिक व्यवहार पारदर्शक राहावेत यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असून त्या संबंधीचे अहवाल नियमितपणे परिषदेला दिले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.. अधिवेशनानंतर शिल्लक राहिलेला निधी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ, आणि मराठी पत्रकार परिषदेला समान हिस्सात दिला जाईल असेही नाना कांबळे यांनी स्पष्ट केले..

पिंपरी - चिंचवड पत्रकार संघाच्या या भूमिकेचं स्वागत करीत एस.एम देशमुख यांनी राज्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं.. पिंपरी चिंचवडचं अधिवेशन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरेल असा विश्वास देखील एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला..

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे संघटक सुनील वाळुंज, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण शिर्के, अविनाश आदक, राजू वारभूवन, आदि उपस्थित होते..

Saturday, October 8, 2022

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार.

 मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार. 



अधिवेशनासाठी राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन 


पिंपरी : 

        राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन १९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी म्हणून आयोजित केलेल्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण अधिवेशनाचे तयारी व इतर बाबींची माहिती घेतली, तसेच या अधिवेशनासाठी म्हणून राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये हे अधिवेशन होत असल्याने हा पिंपरी चिंचवड शहराचा गौरव आहे असे उद्गार यावेळी काढले. 


        अधिवेशन कोठे होत आहे, त्या स्थळाबाबतची माहिती, पत्रकारांच्या निवास व्यवस्थेबाबतची माहिती तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती अजित पवार यांनी यावेळी घेतली. या बैठकीस आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, योगेश बहल, संजोग वाघेरे पाटील, नाना काटे, मयूर कलाटे, मंगलाताई कदम, संतोष बारणे, मायाताई बारणे, माई काटे, राजाभाऊ बनसोडे, प्रशांत शितोळे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.

पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले ज्येष्ठ पत्रकार व अधिवेशन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे, राज्य पत्रकार परिषदेचे निरीक्षक श्रीराम कुमठेकर व श्रावणी कामत तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बेकायदेशीर डुक्कर पालणामुळे सासवडकर नागरिक हैराण.

 सासवड येथील बेकायदेशीर डुक्कर पालना बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन



 कर्कश्श आवाज, दुर्गंधी व घाणीमुळे नागरिक त्रस्त


 सासवड ( ता पुरंदर ) येथील वीर बाजी पासलकर शाळेच्या शेजारील  लोकवस्तीमध्ये बेकायदेशीर डुक्कर पालन करण्यात आले आहे. याबाबत सर्व कैकाडी समाजाच्या वतीने सासवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना निवेदन देण्यात आले

          लोकवस्तीत केलेल्या डुक्कर पालनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दिवसा व रात्री  कर्कश्श आवाजामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परीसरात दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथे अनेक आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. 

          आत्तापर्यंत अनेक विनंती अर्ज सासवड नगरपालिकांना देण्यात आले आहेत परंतु आजतागायत कसलीही कारवाई करण्यात आली नाही यासाठी समस्त कैकाडी समाज यांच्यावतीने पुन्हा एकदा बेकायदेशीर डुक्कर पालन बंद व्हावे म्हणून सासवड नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे. 

      या लोकवस्तीतील बेकायदेशीर डुक्कर पालन बंद करण्यात यावे यासाठी अनेक वेळा सासवड नगरपरिषदला संपर्क साधला, निवेदन देण्यात आले परंतु कसलीही दखल घेण्यात आली नाही असे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल माने यांनी यावेळी सांगितले

Friday, October 7, 2022

नीरा येथील अमर झेंडे यांना मिळाला महाराष्ट्र शासनाचा "कलादर्पण २०२२" पुरस्कार

 नीरा येथील अमर झेंडे यांना मिळाला महाराष्ट्र शासनाचा "कलादर्पण २०२२" पुरस्कार



नीरा दि.८


   पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राहणारे रंगभूषाकार अमर झेंडे यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने दिला जाणारा २०२२ चा कलादर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांनी मिळवलेल्या या पुरस्काराबद्दल निरेतिल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केलय.


     नीरा येथे राहणारे रंगभूषाकार आमार झेंडे हे अनेक दिवसा पासून चित्रपटासाठी रंगभूषाकाराचे काम करतात. विषेता ऐतिहासिक चित्रपटासाठी त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय ठरले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला खा.अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेला "शिवप्रताप गरुडझेप" या चित्रपटासाठी मेकअप आर्टीस्ट म्हणून त्यांनी काम केलंय.त्यांच्या या कामाचं खा.अमोल कोल्हे यांनी सुद्धा केलंय. त्यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच सांस्कृतिक कार्यमंत्रालय यांच्या कडून कलादर्पण पुरस्कार' २०२२ देण्यात आला आहे. अमर झेंडे यांचं निरेतील लोकांकडून कौतुक होतंय. निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख भरत निगडे ,पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषदेचे उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी त्यांचं आभिनंदन केलय. त्याच बरोबर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .



रविवारी वाल्ह्यात महर्षी वाल्मिक जयंती

 रविवारी वाल्ह्यात महर्षी वाल्मिक जयंती.  




    जेजुरी -- रामदास लांघी. 



     सालाबाद प्रमाणे गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून जेजुरीनजिक वाल्हे, तालुका- पुरदर, जि. पुणे येथील महर्षी वाल्मिक ऋषींच्या संजीवनी समाधी स्थळी ठाणे येथील महानगर पालिकेचे माजी महापौर व माजी आमदार स्वर्गीय अनंतरावजी तरे साहेब यांच्या पुढाकाराने साजरी होत होती. गतवर्षी त्यांचे कोरोनाकाळात देहावसान झाले आहे. 

       नेहमी तरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जयंतीचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी असलेले पंचक्रोशितले अनेक समाज कार्यकर्ते झटून कार्यक्रम यशस्वी पार पाडत होते. तेही यावेळी नाउमेदच झाले होते. 

          परंतू या वेळी स्वर्गीय अनंतरावजी तरे साहेब यांचे चिरंजीव जयेश अनंत तरे यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. 

       या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक आदिवासी समाज कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने येऊन हजेरी लावत असतात. स्नानिक ग्रामस्थांचेही बऱ्यापैकी सहकार्य असते. असा कार्यक्रम रविवार दिनांक 9 आक्टोबर 2022 रोजी वाल्हे येथील महर्षी वाल्मिक ऋषींच्या संजीवन समाधीस्थळी नेहमीप्रमाणे होणार असल्याचे संयोजकांनी पत्रकारांना माहीती दिली आहे. 

       मदन भोई, डी. एम्. कोळी, विजयरावजी दरेकर, नारायणतात्या वांभिरे, अरविंद चिव्हे, प्रल्हाद कदम, बाळासाहेब धुमाळ यांची उपस्थीती आवर्जुन असतेच.   




🏮🏮🏮🏮🏮🏮

Monday, October 3, 2022

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे काम रद्द. रस्ता वाहतुकीसाठी खुला

 पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे काम रद्द. रस्ता वाहतुकीसाठी खुला


दसऱ्याला गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४० किलोमीटरचा वळसा टळला 



 नीरा दि.३


      पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वेगेट आज सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून बुधवारी सकाळी सात पर्यंत रेल्वेच्या कामासंदर्भात बंद राहणार होते. ऐन सणासुदीच्या काळात हा रस्ता बंद होणार असल्याने लोकांना याचा त्रास होणार होता याबाबत बातमी माध्यमातून प्रशसिद्द करण्यात आली होती. याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने परवाणगी नकारल्याने हे काम आज रद्द झाले असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४०किलोमीटरचा वळसा टळला आहे. 


     मागील सहा महिन्यात पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामुळे पिसुर्टी येथील २७ नंबरचे गेट पाच वेळा बंद ठेवण्यात आला होते. पंढरपूरच्या एकादशीच्या आधी दोन दिवस तसेच गणेशोत्सवा आधी दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा वळसा घालून यावे जावे लागत होते. यावेळीही रेल्वे प्रशासनाने पुन्हा दसऱ्याचा मुहूर्त साधून दसऱ्याआधी दोन दिवस पालखी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र माध्यमांनी रविवारी याबाबत सडेतोड वृत्त दिल्याने स्थानिक प्रशासनाने रेल्वेला हे काम करण्यास परवानगी न दिल्याने, आज सोमवारी सकाळी सात पासून सुरू होणारे काम सुरू न करता पुढील काळात या कामाचे नियोजन केल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे. 

Sunday, October 2, 2022

नीरा मोरगाव मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात एकजण जखमी : खडीवरू घसरली मोटरसायकल

 नीरा मोरगाव मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात एकजण जखमी : खडीवरू घसरली मोटरसायकल

नीरा दि.२



पुरंदर बारामतीच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा मोरगाव मार्गावर नीरा-गुळुंचे दरम्यान जगताप वस्ती येथे रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.

   या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने बारीक खाडीचा वापर केलाय. यावरून वाहने घसरन्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आज रविवारी गुळुंचे येथील मधुकर शंकर कांबळे वय वर्षे ६० हे नीरा येथून गुळुंचे येथे जात होते.ते त्यांच्या एमएच १२ सीझेड ४५३ या दुचाकीवरून घरी जाताना जगतापवस्ती येथे रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरल्याने हा अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना नीरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच दिवसात दोन चारचाकी कार पलटी होऊन तीन जण जखमी झाले होते.त्यानंतर अजूनही या रस्त्यावर खडी असल्याने असे अपघात होत आहेत.

Saturday, October 1, 2022

मोबाईल फोन हरवल्यास काय कराल ?

 मोबाईल फोन हरवल्यास काय कराल ?




   तुमचा फोन जर का हरवला तर तुम्ही सगळ्यात आधी काय करायला? काय करायला पाहिजे तीन गोष्टी करणे फार महत्त्वाचे आहे. 

 सुरवातीला म्हणजे फोन तुमच्याकडे फोन असतानाच फोन मधील फाईंड माय फोन ही ऍक्टिवेट करा. यामुळे तुमचा मोबाईल गुगल आकाऊंटव्दारे तुम्ही पाहू शकता. फोन हरवल्याचे लक्षात आल्यास त्यांनतर तुम्ही तुमचे सिम. लगेच डीऍक्टिव्हेट करा.त्यानंतर तुम्ही तुमचे गुगलचे अकाउंट आणि इतर बँकिंग अकाउंट किंवा अन्य अकाउंटचे पासवर्ड चेंज करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईल बद्दल एफ आय आर नोंदवा. कारण अशा मोबाईलचा वापर गुन्हेगारी क्षेत्रात होऊ शकतो. यातून अनेक चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो. याचा आरोप आपल्यावर यायचा नसेल तर मोबाईल चोरीला गेला किंवा गहाळ झाला तर एफ.आय.आर.अवश्य नोंदवा त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल.

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट पुन्हा ४८ तास राहणार बंद,

 पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट पुन्हा ४८ तास राहणार बंद, 


दसऱ्या निमित्त गावी जाणाऱ्यांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.  



नीरा : १

     पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा ते जेजुरी दरम्यान पिसुर्टी येथे असणारे रेल्वे गेट दि. ०३ ते दि.०५ या काळात वाहतुकीसाठी ४८ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दि.०२ ते दि.०५ हा काळ नवरात्रीतील शेवटचे तीन दिवस व दसरा हा महत्त्वाचा सण असुन त्या आधी दोन दिवस हा मार्ग बंद ठेवल्याने सातारा जिल्ह्यातील व स्थानीकांनी या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 


   पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर पिसुर्टी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी सोमवार दि. ०३ आक्टोंबर सकाळी ७ वाजल्यापासून ते बुधवार दि. ०५ आक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव - जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. 


चौकट १)

   पुढील आठवडा हा नवरात्रीतील महत्त्वाचे शेवटचे दोन दिवस आहेत, तर बुधवार दि. ०५ रोजी दसरा हा महत्त्वाचा सण आहे. या तीन चार दिवसांत प्रवाशी मोठ्या संख्येने ये जा करतात. या मार्गावरून पुढील या तीन दिवसांत पुणे, मुंबई, नाशिक व राज्यभरातून चाकरमानी आपल्या मुळगावी दसरा सण साजला करण्यासाठी जात असयात. मात्र जेजुरी ते नीरा दरम्यानचा पालखी मार्ग रेल्वेने बंद ठेवल्याने या प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे युऊन पुढिल प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा या मार्गावरील प्रवाशांना पडणार आहे. 

************************************

    या सहा महिन्यात पिसुर्टी रेल्वेगेटचे काम तब्बल पाच वेळा केल्याने पालखी महामार्ग बंद ठेवावा लागला आहे. आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस, तसेच गणेशोत्सवाच्या आधी दोन दिवस व आता दसरा सणा आधी दोन दिवस हा पालखी मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवल्याने फक्त सणासुदीच्या मुहूर्तावरच अशी कामे करण्याचा मानस रेल्वे विभागाने केल्याची चर्चा आहे.

************************************

   "गेली सहा महिन्यात पिसुर्टी रेल्वे गेट पाच वेळा बंद केले आहे. पुणे पंढरपूर पालखी महामार्ग हा रस्ता नँशनल हायवेकडे वर्ग झालेले सात वर्षांहून अधी काळ झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता नीरा शहराला बायपास रस्ता पिसुर्टी, जेऊर या गावांच्या हद्दीतील शेतातून गेला आहे. मात्र आताच्या मार्गावरुनच संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे गेटच्या जागी उड्डाणपूल करावा अशी मागणी आम्ही खा.सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पुणे रेल्वे विभागाकडे करणार आहोत."


कांचन निगडे

प्रदेश सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही : रामदास तांबे.

 



यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही : रामदास तांबे.



नीरा  १


       स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे. तसेच यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व  जलनिसारण  विभागाचे सहाय्यक अभियंता रामदास तांबे यांनी केले. 


      पुरंदर ऑफिसर्स चारिटेबल फाउंडेशन पुणे. यांच्या वर्धापन दिनानिमित जेऊर येथील आचार्य अत्रे

विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जेऊर या विद्यालयातील आयोजित केलेल्या व्यक्तिमत्व विकास -मी कसा घडलो? या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अनंत तांबे सरपंच


शोभा तांबे, उपसरपंच तेजस जाधव, माऊली धुमाळ, पोलीस पाटील कुंडलिक तांबे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धुमाळ, नारायण तांबे, प्रतीक धुमाळ, संभाजी ठोंबरे, पोपट जाधव मेघनाथ तांबे, घनश्याम तांबे, सेवानिवृत शिक्षक चोरगे गुरुजी, मोतीराम तांबे, विठ्ठल चोरमले, सोमनाथ तांबे, संतोष किरवे, जनार्दन तांबे, महादेव बरकडे, भगवान तांबे, नानासो बरकडे, विठ्ठल बरकडे, दादा खोमणे, दीपक तांबे, तानाजी तांबे विद्यालयाचे मुख्याध्यापक जालिंदर जगताप सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मी कसा घडलो? या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पर्यंतचा शालेय जीवनाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्याच्या अंगी आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा नम्रता अत्यंत आवश्यक आहे. केवळ परीक्षे पुरता अभ्यास न करता  आजूबाजूला वर्तमान काळात ज्या ज्या घटना घडत आहेत याकडे बारकाईने लक्ष देऊन आपलं सामान्यज्ञान वाढवावे, यासाठी कोणतेही वर्तमानपत्र दररोज वाचणे आवश्यक आहे. इंग्रजी विषयाचा बाऊ न करता त्याचा चांगला सराव केल्यास तुम्हाला तो सोपा जाईल. तसेच मोबाईलचा वापर विशिष्ट मर्यादेपर्यंत केल्यास तो उपयुक्त ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामधील भारतीय नागरिकांच्या सर्व जबाबदाऱ्या अंगी बाणवून भारताचा सुज्ञ नागरिक बनण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. परमेश्वराने आपल्याला शरीर दिले आहे ते सदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, शिस्तबद्धपणा, अंगी बाणवणे आवश्यक आहे. असे तांबे यांनी सांगितले, 

    या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व शाळा समितीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक चौरंगनाथ कामये यांनी केले व आभार माधव गाडेकर यांनी मानले.


Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...