पोस्ट्स

बेलसर येथे महिलांसाठी मोफत विमा पॉलिसी वितरण व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
 बेलसर येथे महिलांसाठी मोफत विमा पॉलिसी वितरण व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद बेलसर, ता. पुरंदर : शारदा महिला संघाच्या विश्वस्त सचिव आदरणीय सौ. सुनंदाताई पवार यांच्या सामाजिक बांधिलकीतून व महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेतून बेलसर येथे महिलांसाठी मोफत विमा पॉलिसी वितरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या सामाजिक व आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी या सरकारी विमा कंपनीच्या माध्यमातून शारदा महिला संघाच्या महिला सभासदांसाठी मोफत वैयक्तिक अपघात विमा तसेच मेडिक्लेम विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत विमा पॉलिसींचे वितरण करण्यात आले. तसेच ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि शारदा महिला संघ, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखरेची (Sugar) तपासणी, प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यासह गरजेनुसार मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले. सौ. सु...

"वारकऱ्यांच्या सेवेतून समाजसेवेचा वसा; इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम"

इमेज
 "वारकऱ्यांच्या सेवेतून समाजसेवेचा वसा; इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम" "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥" — संत तुकाराम महाराज इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे  संत सोपानकाका महाराज व संतराज महाराज पालखी सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने समाजसेवेचा आदर्श घालून देत वारकऱ्यांना दहा हजार बिस्किट पुड्यांचे वाटप केले. हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालखी मार्गावर सेवाभाव, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमाचा शुभारंभ प्रतिष्ठानचे विश्वस्त शंकरराव रणसिंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या हस्ते झाला. यावेळी उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालखी सोहळ्याच्या स्वागतावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभंग व भजनांच्या सुरावटींनी वाता...

अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब

अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब  पुरंदर | दिवे :        संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी दिवे घाटातून मार्गक्रमण करतात. हा सोहळा निश्चित तारखेला होतो, हे माहिती असतानाही दिवे घाटातील रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. अपूर्ण रस्त्यामुळे पालखीला घाट पार करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला आणि यामुळे वारकरी, भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.         "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड गजरात माऊलींच्या पालखीने सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. ऐतिहासिक दिवे घाटातून पालखीचे आगमन उत्साहात झाले असले, तरी अपूर्ण रस्ता, खडी, धूळ आणि अरुंद झालेला मार्ग यामुळे पालखीच्या हालचाली संथ झाल्या. लाखो वारकऱ्यांना चालताना मोठी कसरत करावी लागली.        वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया द...

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा.योगेश खरात यांचा सत्कार

इमेज
 पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा.योगेश खरात यांचा सत्कार इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.योगेश मारुती खरात यांनी डॉ.भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 'इम्पॅक्ट ऑफ फूड डिलिव्हरी स्टार्टअप्स ऑन हॉटेल इंडस्ट्री इन पुणे विषयावर संशोधन प्रबंध सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली. या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रा. खरात यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,डॉ. प्रशांत शिंदे,डॉ.विलास बुवा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,खजिनदार वीरबाला पाटील,विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त राही रणसिंग,विश्वस्त शंकर रणसिंग यांनी प्रा.खरात...

वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला

इमेज
  वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला शासकीय कामात अडथळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण, पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलिसांत गुन्हा जेजुरी | प्रतिनिधी पिसर्वे (ता. पुरंदर) येथील साईलिला हॉटेलवर सुरू असलेल्या वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महावितरणचे प्रधानतंत्रज्ञ विक्रम किसनराव तुपे (वय ४१, रा. खंडोबानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप अंकुश कोलते, सचिन कांतीलाल कोलते, गणेश कोलते, वैभव कोलते आणि अरुण अंकुश कोलते (सर्व रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, दि. २ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पिसर्वे येथील साईलिला हॉटेलमध्ये वीजचोरीची तपासणी व कारवाई करीत होते. यावेळी त्यांनी संबंधितांना शासकीय ओळखपत्र दाखवून कारवाईबाबत माहिती दिली. मात्र, आर...

पत्रकारांना धमकी प्रकरणी राज्यभर निषेध आंदोलन; "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा"ची ठाम मागणी

इमेज
पत्रकारांना धमकी प्रकरणी राज्यभर निषेध आंदोलन;  "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा"ची ठाम मागणी  मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अवमानकारक भाषा वापरणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. "माफी मान्य नाही, गुन्हा दाखल करा" या स्पष्ट भूमिकेसह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर निषेध आंदोलने करण्यात आली.  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पत्रकारांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.  आंदोलनादरम्यान पत्रकारांनी "पत्रकारांचा अपमान सहन करणार नाही", "पत्रकारांवर हल्ला खपवून घेणार नाही", "पत्रकार एकता जिंदाबाद" आणि "माफी नाही, कारवाई हवीच" अशा जोरदार घोषणा देत संबंधित खासदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाई कधी? बी.एम. काळे माफीने गुन्हा धुतला जात नाही; पुरंदर तालुका पत्रकार संघाची आक्रमक भूमिका

इमेज
पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाई कधी? बी.एम. काळे माफीने गुन्हा धुतला जात नाही; पुरंदर तालुका पत्रकार संघाची आक्रमक भूमिका  सासवड :       लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाच "मारून टाकीन" अशी धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर केवळ निषेधाच्या घोषणा करून भागणार नाही, तर कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे, असे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बी.एम. काळे यांनी व्यक्त केले      अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मिडिया परिषद पुणे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सासवड पोलीस स्टेशनचे निरिक्षक संतोष घोळवे यांना निवेदन देऊन भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.  यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक बी.एम. काळे, डिजिटल मिडिया परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भरत निगडे, राज्य सरचिटणीस राहुल शिंदे, दत्ता भोंगळे, पुरंदर तालुका पत्...

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; मुक्ताई वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस

इमेज
 वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; मुक्ताई वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस      पिंगोरी, ता. पुरंदर : आजच्या काळात वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च, पार्ट्या आणि दिखाव्याला फाटा देत वाल्हे येथील युवक चैतन्य चव्हाण यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पिंगोरी येथील मुक्ताई वसतिगृहात विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप केले. पिंगोरी येथे उद्योजक लक्ष्मण कदम व त्यांच्या पत्नी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परंतु शिक्षण घेण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून मुक्ताई वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासह शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची व्यवस्था करण्यात येत असून त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडत नाही. सध्या या वसतिगृहात सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत चैतन्य चव्हाण यांनी आपला वाढदिवस याच विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे ...

मंजूर विहीर पूर्ण; निधी मात्र अडकला, शेतकरी कर्जबाजारी

इमेज
 मंजूर विहीर पूर्ण; निधी मात्र अडकला, शेतकरी कर्जबाजारी मनरेगा योजनेतील अनागोंदीचा फटका; जवळार्जुन येथील शेतकऱ्याची व्यथा   नीरा    पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावातील शेतकरी सुरेश रामचंद्र टेकवडे यांना मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरीचा निधी अद्याप मिळालेला नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळूनही निधी अडकल्याने आणि आवश्यक मस्टर न भरल्याने शेतकऱ्याला कर्जाचा मोठा बोजा सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, गट क्रमांक २९४ मधील वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ३० मे २०२५ रोजी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी ४ लाख ९९ हजार ९६४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून काम सुरू करण्यास सांगितल्याचे शेतकरी सुरेश टेकवडे यांनी सांगितले. टेकवडे यांनी कर्ज काढून स्वतःच्या खर्चातून विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही त्यांना मंजूर निधी मिळालेला नाही. मनरेगा योजनेअंतर्गत आवश्यक असलेले मस्टर अद...

१५ गंभीर गुन्ह्यांतील फरार दिग्या शेंडकर एटीएसच्या जाळ्यात

इमेज
१५ गंभीर गुन्ह्यांतील फरार दिग्या शेंडकर एटीएसच्या जाळ्यात   पुरंदर  23      सराईत गुन्हेगार दिग्या शेंडकर जेरबंद सासवड : जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगार दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेंडकर याला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सासवड येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिगंबर शेंडकर हा जेजुरी, सासवड आणि शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये बेलसर येथील सूरज जाधव यांना ट्रान्सफॉर्मर बंद न केल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये सोनोरी येथील हॉटेल व्यावसायिक राहुल काळे यांच्या हॉटेलमध्ये घुसून मालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत काउंटरमधील ३२ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. याच प्रकरणात त्याने यापूर्वी अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याच महिन्यात शि...

सासवडच्या वाघडोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इमेज
 सासवडच्या वाघडोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण    सासवड ता. ९ : सासवड शहरालगतच्या वाघडोंगर परिसरात सोमवारी (दि.८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच सकाळ - सायंकाळ व्यायाम व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाघडोंगर परिसर हा सासवड शहरातील नागरिकांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो. दररोज अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी येथे फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, सोमवारी बिबट्याचे थेट दर्शन झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत होते. त्यातच बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः शेतकरी, महिला आण...

भोरच्या इंगवलीत उभारणार स्व. दादा कोंडके यांचे भव्य स्मारक

इमेज
 भोरच्या इंगवलीत उभारणार स्व. दादा कोंडके यांचे भव्य स्मारक  भोर    भोर तालुक्यातील इंगवली येथे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व निर्माते स्वर्गीय दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी इंगवली येथे भेट देत स्मारकासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्मारकाच्या आराखड्याबाबत व संकल्पनेबाबत चर्चा केली. दादा कोंडके यांच्या कार्याचा गौरव जपणारे आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असे स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. "महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरेल असे स्वर्गीय दादा कोंडके यांचे भव्य स्मारक इंगवली येथे उभारण्यात येईल," असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. पाहणी दौऱ्यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, उपजिल्हाधिकारी विक्रम बांदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत उपस्थिती लावली. या स्मारकामुळे दादा कोंडके यांच्या आठ...

सासवडमध्ये ११ जूनला ‘सुंदर माझी शाळा’ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा

इमेज
 सासवडमध्ये ११ जून रोजी ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा’ अभियानाचा भव्य राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील ४,०३२ शाळांचा सहभाग; ४.९५ लाख रुपयांच्या पुरस्कारांचे वितरण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती    सासवड प्रतिनिधी : सहकारमहर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त संत सोपानकाका सहकारी बँकेच्या सौजन्याने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागातील ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा’ या अभियानाचा भव्य राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अभियानात पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील एकूण ४,०३२ माध्यमिक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १,२००, सोलापूर ७३०, सातारा ६९५, सांगली ६०७ आणि कोल्हापूर जिल्...

पुरंदर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर विशेष ग्रामसभांमधून आरक्षण सोडत; प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती.

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर  विशेष ग्रामसभांमधून आरक्षण सोडत; प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती. पुरंदर :        पुरंदर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७६ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी १२ जून २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या ग्रामसभांसाठी महसूल, कृषी व पंचायत समिती प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक ग्रामसभेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे.       पुरंदरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विक्रम राजपूत यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षणाची सोडत काढून संबंधित परिशिष्टे भरून १३ जूनपर्यंत कार्यालयात जमा करण्याचे न...

पुरंदर तालुक्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १३ हजार ५०० रुपयांच्या तपासण्या मोफत; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
पुरंदर तालुक्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  १३ हजार ५०० रुपयांच्या तपासण्या मोफत; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन  पुरंदर :        भाजपा पुरंदर तालुका पूर्व मंडलाच्या वतीने शनिवार, ३० मे २०२६ रोजी नीरा शिवतक्रार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्याचे महामंत्री राजेशजी पांडे यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.        सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तब्बल १३ हजार ५०० रुपयांच्या आरोग्य तपासण्यांचा लाभ नागरिकांना विनामूल्य मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.          या शिबिरामध्ये रक्तातील सर्व घटक तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कोलेस...

*शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक*

इमेज
 *शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक* _बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नियुक्तीपत्रे देत तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा; टोळीतील आरोपी जेरबंद_ बारामती दि.२६      शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता.बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने 'गट-क अधिपरिचारिका' पदावर शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतरांची ओळख करून घेतली. त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार...

पती पाठोपाठ पत्नीचीही पीएचडी

इमेज
 पती पाठोपाठ पत्नीचीही पीएचडी...... पाहुणेवाडी ता. बारामतीच्या कन्या प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे यांची पीएच.डी. पदवी प्रदान  आष्टी, जि. बीड येथील  अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना "आत्मकथा लेखन की चुनौतियाँ और स्त्री प्रश्न ( दलित स्त्री आत्मकथाकारों के विशेष संदर्भ में ) " या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे यांनी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. मुळच्या बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीच्या असलेल्या प्रा. शुभांगी खुडे यांचे पती आणि सोमेश्वरनगर (ता. बारामती ) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. पोपट जाधव यांनाही मागील आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिंदी विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे. एकाच आठवड्यात एकाच विषयात आणि एकाच संशोधन केंद्रात जाधव पती पत्नी यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याने या पती-पत्नीचे मित्र, नातेवाईक, सहकारी आणि समाजातील सर्व स्थर...

“१७ वर्षे मृत्यूचा महामार्ग… आणि सरकारला टोलची घाई!” मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू; पत्रकारांचा संताप उसळला, सरकारवर निष्काळजीपणाचा घणाघात

इमेज
“१७ वर्षे मृत्यूचा महामार्ग… आणि सरकारला टोलची घाई!”  मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू; पत्रकारांचा संताप उसळला, सरकारवर निष्काळजीपणाचा घणाघात  खारपाडा :          मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हजारो नागरिकांचे जीव गेले, लाखो प्रवासी त्रस्त झाले आणि कोकणाचा विकास अक्षरशः खिळून राहिला. मात्र एवढ्या गंभीर वास्तवाकडे डोळेझाक करत सरकारने अपूर्ण महामार्गावरच टोलवसुली सुरू केल्याने संतापाची लाट उसळली आहे. “रस्ता पूर्ण नाही, पण टोल मात्र पूर्ण!” अशा शब्दांत पत्रकारांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेत खारपाडा येथे उग्र आंदोलन छेडले. तब्बल २० वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकारांनी आता सरकारला थेट इशारा दिला आहे.         अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात ३०० हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते. काळे शर्ट, काळ्या टोप्या आणि सरकारविरोधी फलक हातात घेत पत्रकार रस्त्यावर उतरले तेव्हा स्...

पत्रकारितेतील गुणवंतांना गौरवाचा मान; अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून पुरस्कारांसाठी नावे मागविण्याचे आवाहन

इमेज
पत्रकारितेतील गुणवंतांना गौरवाचा मान; अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून पुरस्कारांसाठी नावे मागविण्याचे आवाहन  मुंबई :        मुंबईत मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, विविध पुरस्कारांसाठी पात्र पत्रकारांची नावे ५ मेपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.       अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दरवर्षी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर पत्रकारांचा सन्मान विविध पुरस्कारांनी केला जातो. यंदाही या परंपरेनुसार पुरस्कार वितरण सोहळा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.          या पुरस्कार सोहळ्यासाठी पात्र पत्रकारांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. परिषदेच्या वतीने २५ हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. तसेच काह...

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध; श्रीकांत बोरावके अध्यक्ष, अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष

इमेज
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध; श्रीकांत बोरावके अध्यक्ष, अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष  आळंदी :          अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई तथा पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड या संघाची द्विवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके तर कार्याध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत एकूण २५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून पत्रकार बांधवांकडून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.           अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल शिंदे तर सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भरत निगडे यांनी निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.          ही निवडणूक आळंदी-मोशी रोडवरील डूडूळगाव येथील दीप बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार प...