पुरंदर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर विशेष ग्रामसभांमधून आरक्षण सोडत; प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती.
पुरंदर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
विशेष ग्रामसभांमधून आरक्षण सोडत; प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती.
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७६ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी १२ जून २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या ग्रामसभांसाठी महसूल, कृषी व पंचायत समिती प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक ग्रामसभेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे.
पुरंदरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विक्रम राजपूत यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षणाची सोडत काढून संबंधित परिशिष्टे भरून १३ जूनपर्यंत कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे गट तयार करण्यात आले असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे दोन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता पहिल्या ग्रामपंचायतीत तर दुपारी ३ वाजता दुसऱ्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार आहे.
* ग्रामपंचायतनिहाय कार्यक्रम
* श्री. सुहास कांबळे (मंडल अधिकारी, सासवड)
दिवे – सकाळी ११ वा.
चांबळी – दुपारी ३ वा.
* श्री. जितेंद्र पाटील (मंडल अधिकारी, भिवडी)
पुर–पोखर – सकाळी ११ वा.
भिवडी – दुपारी ३ वा.
* श्री. बसवंत बनसोडे (मंडल अधिकारी, पारिंचे)
पारिंचे – सकाळी ११ वा.
सटलवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. बापूसाहेब देवकर (मंडळ अधिकारी, शिवरी)
शिवरी – सकाळी ११ वा.
तक्रारवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. डी. सी. शेळकंदे (मंडल अधिकारी, कुंभारवळण)
वाघापूर – सकाळी ११ वा.
कुंभारवळण – दुपारी ३ वा.
* श्री. संजय बडदे (मंडल अधिकारी, जेजुरी)
देवमळा – सकाळी ११ वा.
धालेवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. संदीप लोळे (सहायक महसूल अधिकारी)
बोपगाव – सकाळी ११ वा.
आस्करवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. सतिश उचाळे (सहायक महसूल अधिकारी)
राजेवाडी – सकाळी ११ वा.
आंबळे – दुपारी ३ वा.
* श्री. प्रकाश धनेपकर (सहायक महसूल अधिकारी)
बेलसर – सकाळी ११ वा.
खळद – दुपारी ३ वा.
* श्री. संतोष शिंदे (सहायक महसूल अधिकारी)
पारगाव – सकाळी ११ वा.
गुर्होळी – दुपारी ३ वा.
* श्रीमती सुनीता वणवे (सहायक महसूल अधिकारी)
राख – सकाळी ११ वा.
पांडेश्वर – दुपारी ३ वा.
* श्री. सागर काटकर (सहायक महसूल अधिकारी)
देवडी – सकाळी ११ वा.
केतकावळे – दुपारी ३ वा.
* श्री. मयूर कचरे (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
रिसे – सकाळी ११ वा.
पिसे – दुपारी ३ वा.
* श्री. अनिल दुर्गुडे (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
नाझरे सुपे – सकाळी ११ वा.
नाझरे क.प. – दुपारी ३ वा.
* श्री. चक्रकांत धायगुडे (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
जवळार्जुन – सकाळी ११ वा.
टेकवडी – दुपारी ३ वा.
* श्री. प्रवीण अडसूळ (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
हरणी – सकाळी ११ वा.
लपतळवाडी – दुपारी ३ वा.
श्री. प्रमोद खेडेकर (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
मांढर – सकाळी ११ वा.
हरगुडे – दुपारी ३ वा.
* श्री. जयंत वाघोले (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
खानवडी – सकाळी ११ वा.
वाळूंज – दुपारी ३ वा.
* श्री. रविंद्र खसे (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
पिंपरे खुर्द – सकाळी ११ वा.
पिसुर्टी – दुपारी ३ वा.
* श्री. मुसळे एस.टी. (उपअभियंता, पंचायत समिती)
कोळविहिरे – सकाळी ११ वा.
पिंपरी – दुपारी ३ वा.
* श्री. शिंदे आर. एस. (वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती)
पिंपळे – सकाळी ११ वा.
बोऱ्हाळवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. सुभाष सुरवसे (शाखा अभियंता)
कोडीत खुर्द – सकाळी ११ वा.
कोडीत बु. – दुपारी ३ वा.
* श्री. संतोष नलवडे (शाखा अभियंता)
सोमुर्डी – सकाळी ११ वा.
गराडे – दुपारी ३ वा.
* श्री. परेश भिंगारे (शाखा अभियंता)
निळुंज – सकाळी ११ वा.
साकुर्डे – दुपारी ३ वा.
* श्री. विक्रांत माने (स्थापत्य अभियंता सहाय्यक)
सुपे खुर्द – सकाळी ११ वा.
पानवडी – दुपारी ३ वा.
* श्री. भगवान बस्वदे (स्थापत्य अभियंता सहाय्यक)
तोंडल – सकाळी ११ वा.
माहूर – दुपारी ३ वा.
* श्री. शिवाजी दोलताडे (स्थापत्य अभियंता सहाय्यक)
हिवरे – सकाळी ११ वा.
थापेवाडी-वारवडी – दुपारी ३ वा.
* श्री. दशरथ ढवळे (कृषी अधिकारी)
आंबोडी – सकाळी ११ वा.
झेंडेवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. महेंद्र गिरमे (कृषी विस्तार अधिकारी)
पोंढे – सकाळी ११ वा.
मावडी सुपे – दुपारी ३ वा.
* श्री. ताटे एस.बी. (कृषी विस्तार अधिकारी)
मांडकी – सकाळी ११ वा.
नीरा शिवतकर – दुपारी ३ वा.
* श्री. निकेतन धापटे (कृषी विस्तार अधिकारी)
पिसर्वे – सकाळी ११ वा.
मावडी क.प. – दुपारी ३ वा.
* कु. ए. जी. वाघ (कनिष्ठ अभियंता)
भिवरी – सकाळी ११ वा.
सोनोरी – दुपारी ३ वा.
* श्री. व्ही. आर. ढोक (अभियंता)
काळदरी – सकाळी ११ वा.
धनकवडी – दुपारी ३ वा.
* श्री. एम. व्ही. गिरीगोसावी (अभियंता)
जेऊर – सकाळी ११ वा.
दौंडज – दुपारी ३ वा.
* श्री. अभिजित जेधे (विस्तार अधिकारी)
नायगाव – सकाळी ११ वा.
नावळी – दुपारी ३ वा.
* श्री. स्नेहल धायगुडे (तालुका कृषी अधिकारी कार्यालय)
खेंगरेवाडी/शिंदेवाडी – सकाळी ११ वा.
* पांगारे – दुपारी ३ वा.
* श्री. अविनाश घेगरे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी)
चिव्हेवाडी – सकाळी ११ वा.
घोरपडेवस्ती/मिसाळवाडी – दुपारी ३ वा.
* श्री. बाळकृष्ण काकडे (विस्तार अधिकारी)
दवणेवाडी – सकाळी ११ वा.
नवलेवाडी – दुपारी ३ वा.
प्रशासनाने सर्व ग्रामस्थ, इच्छुक नागरिक व लोकप्रतिनिधींना संबंधित ग्रामसभांना उपस्थित राहून आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याचे आवाहन केले आहे. ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली असून आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणूक तयारीला आणखी गती मिळणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा