पोस्ट्स

एकाच मांडवात दोघींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एकाच मांडवात दोघींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट, अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल

इमेज
    एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट आलं आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात  NCR दाखल झाला आहे. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर दोनमध्ये राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. नेमकं प्रकरण काय ? मुंबई येथील दोन जुळ्या आय टी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली. नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. कांदिवली इथं आय टी इंजिनियरिंग करून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणींनी अतु...