Type Here to Get Search Results !

एकाच मांडवात दोघींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट, अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल

  


एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी
विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट आलं आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात  NCR दाखल झाला आहे.

याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर दोनमध्ये राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई येथील दोन जुळ्या आय टी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली. नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. कांदिवली इथं आय टी इंजिनियरिंग करून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणींनी अतुलशी एकाच वेळी एकाच मांडवात विवाह केला आहे. पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी लहानपणापासून दिसायला एकसारख्या आहेत. त्यांना एकमेकींचा इतका ओढा असून आजवर त्या दोघी एकाच पानात बसून जेवण करतात. त्यांना बालपणापासून मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पिंकी आणि रिंकी यांना एकत्र राहण्यासाठी एकच नवरा हवा होता. अखेर अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे 2 डिसेंबर रोजी हा अनोखा विवाह संपन्न झाला होता.

मूळचा माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या अतुल या तरुणाचा पाडगावकर कुटुंबाशी संबंध आला. या मुलींच्या वडिलांचे काही दिवसापूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या. पाडगावकर कुटुंबातील आई व दोन मुली आजारी पडल्यावर अतुल यांच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत. याचवेळी अतुलने पाडगावकर कुटुंबाची आजारपणात सुश्रुषा केल्यानं त्यांच्यातील जवळीक वाढली होती. अखेर 2 डिसेंबर रोजी अतुल अवताडे यांनी पिंकी आणि रिंकी पाडगावकर या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास 300 पाहुणेमंडळी लग्नासाठी गलांडे हॉटेलमध्ये जमले होते. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली होती.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies