दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या स्थापनेची घोषणा, स्वतंत्र विभाग असणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य


 जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रालयासाठी 1 हजार 143 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसेच प्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांगावर आधारित दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांचे गूढ — नीरा शहरासमोरील नवी सामाजिक शोकांतिका