पोस्ट्स

रेल्वे पोलीस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जेजुरी नजीकच्या भोरवाडी फाट्यावर टेम्पो थेट रेल्वे रुळावर झाला पलटी

इमेज
 जेजुरी नजीकच्या भोरवाडी फाट्यावर टेम्पो थेट रेल्वे रुळावर झाला पलटी   नीरा दि. 24    वाहतुकीसाठी धोकेदायक असलेल्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज बुधवारी सकाळी जेजुरी नजीक भोरवाडी फटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक टेम्पो थेट पुणे मिरज लोहमार्गावर जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी अथवा मृत्यू झाला नाही.        प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी औद्योगिक वसाहत सोडल्यानंतर भोरवाडी फाट्यापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा एकेरी होतो. याच दरम्यान भरधाव टेम्पो जेजुरीकडून नीरा बाजूकडे भरधाव निघाला होता. चारपदरी रस्ता अचानक एकेरी झाल्याने टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. वेगात असलेल्या टेम्पो थेट रस्त्याच्या डाव्या बाजूने दगड गोट्यातून रस्त्याच्या लगत असणाऱ्या पुणे मिरज रेल्वे लाईन वर जाऊन पलटी झाला. या टेम्पोमध्ये ब्रिटानिया कंपनीचे बिस्किटचे बॉक्स होते. मोठ्या उंचीवरून हा टेम्पो खाली पडला.सुदैवाने टेम्पो चालक मात्र सुखरूप बाहेर आला. तो किरकोळ जखमी आ...