Posts

Showing posts with the label बातमी लिहून तयार;

नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know...

Image
  तं त्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. कारण या उंबरठ्यापल्याड पडणारं प्रत्येक पाऊल हे नवं आणि अविश्वसनीय गोष्टी साध्य करुन दाखवणारं असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इंटरनेट विश्वात सध्या चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT हे चॅटबॉट त्यातीलच एक पाऊल आहे. OpenAI कंपनीनं ChatGPT हे AI- बॅक्ड चॅटबॉट विकसीत केलं आहे. OpenAI च्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक चाचणीसाठी ते उपलब्ध आहे आणि युझर्स त्याची वैशिष्ट्य अगदी विनामूल्य वापरून पाहू शकतात. आता या चॅटबॉटची अनुभूती घेतलेले बरेच जण ChatGPT मध्ये Google Search ची जागा घेण्याची ताकद असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. ChatGPT हे तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा एकादं कार्य काही सेकंदात अगदी विनासायास उपलब्ध करुन देतं. मग ते गणिताचं कोडं असो एखाद्या विषयाची माहिती असो किंवा मग अगदी तुम्हाला हवा असलेला निबंध. ChatGPT एका सेकंदात भरभर तुमचं काम उरकून टाकतं. आता इतर तंत्रज्ञानाप्रमाणं ChatGPT ही देखील काही परिपूर्ण व्यवस्था नाही. कारण मानवानं घडवलेल...