अडकविणे, लटकविणे हे आमचे काम नाही, माेदींचा विराेधकांना टाेला; पहिल्या हरित विमानतळाचे राष्ट्रार्पण

इ टानगर : अरुणाचल प्रदेशातील नवीन डोनी पोलो या देशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . आदिवासी पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. राज्याची राजधानी इटानगरपासून १५ किलोमीटरवरील हॉलोंगी येथे असलेले हे विमानतळ व्यावसायिक उड्डाणांद्वारे सीमावर्ती राज्याला इतर भारतीय शहरांशी तर हेलिकॉप्टर सेवेद्वारे राज्याच्या इतर भागांशी जोडेल. मोदी यांनी पश्चिम कामेंग जिल्ह्यातील ६०० मेगावॅटचा कामेंग जलविद्युत प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केला. प्रकल्प ८० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रात ८४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. त्यातून अरुणाचलच्या गरजेहून अधिक वीज तयार हाेईल. आम्ही निवडणुकीसाठी नाही विकासासाठी काम करतो २०१९ मध्ये मी या विमानतळाची पायाभरणी केली होती. तेव्हा ही निवडणूक खेळी असल्याचा दावा टीकाकारांनी केला होता. आज निवडणूक नसताना आम्ही हे विमानतळ सुरू करत आहोत. ही त्यांच्यासाठी सणसणीत चपराक आहे. आधीच्या सरकारांना केवळ निवडणुका जिंकायच्या होत्या. आम्ही फक्त देशाच्या विकासासाठी काम करत...