पोस्ट्स

वीरधरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वीर धरणातून आज १५ हजार १३१२ क्युसेक्सने विसर्ग होणार

इमेज
 वीर धरणातून आज १५ हजार १३१२ क्युसेक्सने विसर्ग होणार.  वीर धरण ९७.८३ टक्के भरले : आता नीरा दुथडी वाहणार. नीर : नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही परिणामी शनिवारी दुपारी भाटघर धरण ५३.९३ टक्के, नीरा देवधर ४६.५३ टक्के, वीर धरण ९७.८३ टक्के, तर गुंजवणी धरण ७३.५१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाच्या चार दरवाजे एक फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.          शुक्रवारी सकाळ पासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ व...

वीर धरणातून पुढील २४ तासात पाणी सोडणार

इमेज
 वीर धरणातून पुढील २४ तासात पाणी सोडणार वीर धरणात ८२.५६ टके पाणीसाठा नीरा : १४       पुरंदर व खंडाळा तालुक्याच्या सिमेवरुन वाहत असलेल्य नीरा नदिवरील वीर धरणात मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ९.५० टीएमसी क्षमता असलेल्या वीर धरणात गुरवारी सकाळ पर्यंत ७.७६ टीएमसी म्हणजे ८२.५६ टक्के भरल्याने आता पुढिल २४ तासांत केंव्हाही धरणातून पाणी सोडण्याची सुचाना धरण प्रशासनाने केली आहे.       धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. १४/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.३२ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ७.७६ टीएमसी झाला असून धरण ८२.५३% इतके भरले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संततधार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात विसर्ग सुटण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आव्हान धरण प्रशासनाने केले आहे.