वीर यात्रेत 5 लक्ष 15 हजाराच्या दागिन्यांची चोरी.सासवड पोलिसात फिर्याद दाखल.
वीर दि.२५
पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ म्बाहस्कोबा देवाची यात्रा सुरू आहे .या यात्रेत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पाच लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरल्या प्रकरणी बीड येथील काही लोकांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
वीर येथे राहणारे अतुल राजेंद्र वीर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिपक मच्छिंद्र जाधव रा.शास्त्रीनगर नाळवंडी चौक बीड ,शैलेंद्र सुरेश जाधव रा.बलभीमनगर बीड,संदीपान अंकुश जाधव रा.राजीवनगर बीड व इतर अनोळखी दोन इसम यानी दिनांक 24/02/2022 रोजी दुपारी 1:30वा.ते 2:00चे सुमारास श्रीनाथ म्हस्कोबा मंदीरात असताना
1,75,000/-रूपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन
50,000/- रूपये किंमतीची एक तोळा वजनाची विशाल सुनिल पवार रा.हांडेवाडी पुणे यांची सोन्याची चैन
50,000/-रूपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सुनिता अनिल पोटे रा.आनंदनगर ठाणे यांचे मनी मंगळसुत्र
75,000/-रूपये किंमतीची दिड तोळा वजनाचे ज्योती मारूती राऊत रा.चिखली पुणे यांचे सोन्याचे गंठण
50,000/- रूपये किंमतीची एक तोळा वजनाची प्रभावती सुरेश कवडे रा.लोणी काळभोर यांची सोन्याची चैन
25,000/- रूपये किंमतीची सुभद्रा एकनाथ कामथे रा.चांबळी ता.पुरंदर जि.पुणे यांचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे डोरले
90,000/- रूपये किंमतीचे जीवन गोविंद जगताप रा.उरूळी कांचन यांचे पावणे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन असा एकुण 5,15,000/- रुपयाचं मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौज.जाधव करीत आहेत.