Sunday, June 30, 2024

धक्कादायक पुरंदरमध्ये अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे!

 धक्कादायक

पुरंदरमध्ये अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे!




पुरंदर : पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूला शेजारी दुचाकीवर जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे गावठी कट्टा आढळून आला आहे. पोलिसांनी विचारपूस केली असता हा गावठी कट्टा व मोटारसायकल मित्राची असुन त्यांच्याकडे अजुन एक अशाच प्रकारचा पिस्तुल असल्याचे सांगितल्याने दोघांन विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सोमेश भंगवतराव राउत यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलांकडे पिस्तूल आढळून आल्याची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटलेनुसार सोमेश राऊत हे शुक्रवार दि.२८ जून रोजी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जेजुरी गावचे हदीत जेजुरी रेल्वे ब्रिजजवळ विधीसंघर्षित अल्पवयीन बालक संग्राम दत्तात्रय चव्हाण वय १७ वर्षे रा.जवळाअर्जुन (ता. पुरंदर) हा त्याचे ताब्यात बेकायदा बिगरपरवाना २० हजार रूपये किंमतीचे एक सिल्वर रंगाचा लोखंडी, त्याचे हॅन्ड ग्रीपजवळ दोन्ही बाजुला लाल रंगाचे फायबर असलेला पिस्तुल बाळगताना आढळून आला. त्या पिस्तूलवर कोणत्याही कपंनीचा लोगो अथवा मार्क नाही. तसेच यामाहा कंपनीचे मोटारसायकल वरून जात होता. त्याचेकडे पिस्तुलबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्तुल हे माझा मित्र चैतन्य सखाराम खैरे रा. खैरवाडी (ता. पुरंदर) याने माझेकडे ठेवणेसाठी दिला असुन, त्याचेकडे आणखीन एक अशाच प्रकारचा पिस्तुल आहे. ही मोटारसायकल देखील त्याचीच असल्यचे सांगितले आहे. म्हणुन दोन विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालक नाव संग्राम दत्तात्रय चव्हाण वय १७ वर्षे रा. जवळाअर्जुन ता. पुरंदर व चैतन्य सखाराम खैरे रा.खैरवाडी ता.पुरंदर यांच्या विरूध्द कायदेषीर फिर्याद सोमेश राऊत यांनी दिली आहे. 

Monday, June 24, 2024

भारतातील युवा वर्गापर्यंत आदि गुरु शंकराचार्यांचे तत्वज्ञान पोहचविण्यासाठी पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची विशेष मोहीम

पुणे : ब्रिटीश संसदेतील 'युनायटेड किंग्डम' येथील 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका बहुसांस्कृतिक कार्यक्रमात 'सनातन धर्माचे महान शिक्षक, गुरु आणि तत्वज्ञ आदि गुरु शंकराचार्य' यांनी रचलेले आध्यात्मिक ग्रंथ असलेल्या 'दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य' या शृंखलेच्या सांगितीक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. आज पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे 'दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य' व आदि गुरु शंकराचार्य लिखित 'सौंदर्य लहरी'चे सादरीकरण - लोकार्पण आणि याविषयीची माहिती पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवालजी आणि कविता पौडवाल यांनी पत्रकारांना दिली. जगाला सनातन धर्माची ओळख करुन देणे हे अनुराधाजींचे ध्येय आहे, आजच्या तरुणाईपर्यंत आदि गुरु शंकराचार्य यांचे तत्वज्ञान पोहचविण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी आखली असून याची सुरुवात पुणे येथून करीत असल्याचे त्या म्हणाल्या. पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या 'वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य' या नवीन संगीत श्रृंखलेचे अनावरयाप्रसंगी करण्यात आले, आदिशंकराचार्यांच्या तत्वज्ञानामुळे आणि सनातन धर्माच्या शिकवणी मुळे वेदांच्या शुध्द शिकवणीचा उपयोग राजांसह अगदी सामान्य व्यक्तीला ही होतो. भारतातील सर्वोत्कृष्ट ज्ञान, हे परकीय आक्रमणकर्ते आणि सामान्य माणसापासून दूर जाऊ लागले होते व त्यातील अनेक भ्रामक कल्पनाही जनसामान्यांमध्ये रुजल्या होत्या, परिणामी समाज आपल्या ध्येयापासून भरकटू लागला होता. आदि शंकराचार्यांनी वेदामधील ज्ञान दिले ज्यामुळे भौतिक आणि अध्यात्मिक यश प्राप्त करणे शक्य होते. ते एक परंपरावादी होते, त्यांनी परंपरांना सौम्य केले नाही किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावला नाही पण त्याच बरोबर ते देव उपासक म्हणून मूळचा अभिमान राखून ठेवला. असे पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल सांगतात. या गोष्टी विषयी चर्चा करतांना अनुराधाजी म्हणाल्या "सनातन धर्माची अधिकतर वेळी चुकीची व्याख्या केली जाते. पण सत्य हे आहे की हे तत्वज्ञान कालातीत आणि वैश्विक तंत्वज्ञान आहे जे वैयक्तिक बलस्थाने, सुसंवाद आणि सर्वसमावेशक पध्दतीचा प्रसार करतात. त्यांची शिकवण ही मानसिक शांतता, अध्यात्मिक वाढ आणि सर्व प्राणिमात्रांच्या परस्पर संबंधांना महत्त्व देते. या मुल्यांचा प्रसार करुन त्यांची शिकवण ही जगभरांतील विविध संस्कृतींनी एकाच मंचावर एकत्र येऊन एकमेकांचा सन्मान आणि समजून घेण्यावर भर दिला जातो. जगभरांतील प्रेक्षकांसमोर शांतीचा आणि एकतेचा हा संदेश प्रसारीत करण्यासाठी मी वचनबध्द आहे.” *अनुराधा पौडवाल यांच्याविषयी* श्रीमती अनुराधा पौडवाल यांची गेल्या ५० वर्षांची उल्लेखनी कारकीर्द आहे, या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना भारतीय संगीत आणि अध्यात्मातील त्यांच्या योगदाना बद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी १५ भाषांतील १० हजारांहून अधिक गाणी गायली असून आजपर्यंत त्यांचे १५०० हून अधिक भजन अल्बम्स प्रकाशित झाले आहेत. सनातन धर्माचा प्रसार हा त्यांनी जीवनभर इतरांचे उत्थान आणि त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलेल्या प्रोत्साहपर कार्याची पुढची पायरी आहे. त्यांनी नेहमीच संस्कृती आणि अध्यात्मिकतेचा दीप प्रकाशमान ठेवला असून जगभरातील लोकांना आधुनिक विचारांबरोबर परंपरागत ज्ञान कसे जगावे हे शिक्षण त्यांच्याकडून मिळत आहे. त्यांनी सनातन धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करण्यास वाहून घेतले असून जगाला शांतता, सौहार्द आणि अध्यात्मिक वाढीच्या वैश्विक तत्वांनी जवळ आणण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.

आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक वरुणराजाचे आगमन; ढोलताशांच्या दणदणाटात फटाक्यांची आतषबाजी

आळंदी : येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणा-या बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास हौश्या - बाजी आणि माऊली - वजीर या दोन्ही बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे महाद्वार चौक अशी भव्य मिरवणूक हरिनाम जयघोषात वाजतगाजत झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ढोलताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. बैलजोडीचे आळंदी देवस्थानने देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरा समोरील महाद्वार ऐवजी महाद्वार रस्त्यावरील हॉटेल समोर केले. पहिल्यांदाच माऊली मंदिरा समोर श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीस नियोजना अभावी पूजा करण्यास नेण्यात आले नाही. मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने दोन्ही बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथजी योगी, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, बैल समितीचे प्रमुख बबनराव कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पा., वस्ताद सहादु कुऱ्हाडे, योगेश कुऱ्हाडे, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड, माऊली गुळुंजकर, भैरवनाथ ग्रामदेवता उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, पै. शिवाजीराव रानवडे, माऊली उर्फ डी.डी.घुंडरे पा., अजित मधवें आदीसह आळंदीतील नागरिक, विविध आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. श्रींचा वैभवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात होत असतो. तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थ देखील श्रींचा पालखी रथ ओढणारी मनाची बैलजोडीची भव्य मिरवणूक काढत असतात. यावेळी मिरवणूक वरुणराजाचे आगमनात झाली. युवक तरुणांच्या तरुणाईचे जल्लोषात मिरवणूक झाली. कुऱ्हाडे यांनी भव्य भारदस्त बैल जोडी लाखो रुपये देऊन विकत आणली आहे. या शिवाय एक पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवत दक्षता घेतली आहे. या लक्षवेधी बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत, हरिनाम जयघोषात झाली. यावेळी भाविक, नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरु झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये गांधी परीवारांतर्फे स्वागत करण्यात आली. कुऱ्हाडे परिवारातील गृहिणींनी मिरवणुकीचे सांगतेत दोन्ही बैलजोडीची पूजा करून औक्षण केले. माऊली मंदिराचे महाद्वारा समोर यावर्षी बैलजोडी घेऊन येण्यासाठी आवश्यक असताना या बाबतचे नियोजनाचा अभाव यावर्षी राहिला. अनेक दशक वर्षातून यावर्षी प्रथमच अशी घटना घडली. बैलजोडीचे आगमन स्वागताचे कार्यक्रमात बैलजोडीस पायघड्या टाकण्याचे नियोजनास देवस्थानला विसर पडला. यावर आळंदी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मिरवणुकी दरम्यान काही वेळ आळंदीत वाहतूक कोंडी झालं. मात्र वाहतूक पोलीस विभागाने सुरळीत वाहतूक करण्यास परिश्रम घेत प्रदक्षिणा मार्गावर सुरक्षित वाहतूक करण्यास पाऊस असताना विशेष काळजी घेत यशस्वी नियोजन केले. मिरवणुकी साठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.

थोरल्या पादुका मंदिराची पालखी सोहळा प्रमुखा कडून पाहणी

आळंदी : वडमुखवाडी पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराची पालखी सोहळ्या निमित्त पालखी सोहळा प्रमुख व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी पाहणी केली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, साहेबराव काशीद, शिवाजी तळेकर, पांडुरंग काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन मंदिरात करण्यात आला. माऊली मंदिरातुन पालखीचे प्रस्थान आणि पहिला मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर ३० जून रोजी श्रींचा वैभवी पालखी सोहाळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्त होतो. यावेळी श्रींचे पालखी सोहळ्याचा पहिला सकाळचा विसावा थोरल्या पादुका मंदिरात होत असतो. त्यावेळी माऊलींचे पादुकांची पूजा आणि आरती परंपरे प्रमाणे अनेक वर्षांपासून येथे होत असते. पहिल्या विसाव्याचे तयारीचा आढावा घेण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी आणि त्यांचे सहकारी यांनी भेट दिली. यावेळी मंदिराची पाहणी करीत, चर्चा करून काही सूचना करीत संवाद साधला. यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. मंदिरात पालखी पादुकांची पूजा दरम्यान श्रींचे पादुकांचे संरक्षण करण्यासह गर्दीवर नियंत्रण आणि यासाठी दक्षता घेण्यास सांगितले. पहिल्या विसाव्यातील श्रींचे पादुका पूजा, आरती प्रसंगी मंदिरात पासधारकांनाच सोडण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी करु नये असे आवाहन भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.

Saturday, June 22, 2024

शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ॲड. मंगेश ससाणे यांचे उपोषण मागे

पुणे : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपोषणकर्ते ॲड. मंगेश ससाणे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांबाबत २१ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. बैठकीत विविध मागण्यासंदर्भात सविस्तर सकारात्मक चर्चा होऊन, काही मागण्यांबाबात निर्णय घेण्यात आले आहेत तर काही मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार सुरू आहे. महाजन म्हणाले, येत्या काळात होणाऱ्या अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, कुणावरही अन्याय होणार नाही. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती महाजन यांनी केली. शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. ॲड. ससाणे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार योगेश टिळेकर,  उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले आदी  उपस्थित होते.

विवाहितेचे अपहरण करून दिली भूल, गाडीत ठेवले डांबून, स्वतःची सुटका करत गाठले पोलीस स्टेशन

पुणे : घरगुती वादातून पती पासून दूर राहत असलेल्या ,पीडित महिलेचे १९ जून रोजी दुपारी तिच्या कामाच्या ठिकाणाहून तिचा पती, सासू आणि गाडीवरील चालक यांनी अपहरण केल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणात आता वाकडं पोलिसनी गुन्हा दाखल केला आहे. वाकडं पोलिसात पती सुमित शहाणे, सासू आणि चालक विक्रांत यांच्या विरोधात मानसिक छळ केल्या प्रकरणी भा. द.वी. कलम ३६५, ३२८, ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली होती की, 19जूनला मला मी काम करत असलेल्या ठिकाणाहून माझा पती, सासरा आणि चालक यांनी फरफटत नेऊन माझे अपहरण केले होते. त्यानंतर मला तिघांनी गाडीतच डांबून ठेवत मला भुलीचे इंजक्सन दिले होते. पोलिसानी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसनी दिलेली माहिती अशी की, विवाहित महिलेचे 2023 मध्ये मंचर मध्ये सुमित सोबत लग्न झाले आहे. लग्नाच्या आठवड्याभरानंतर पती सुमित हा विवाहितेकडे नको त्या मागण्या सुरु केल्या. मात्र पत्नीने त्या पूर्ण करण्यास नकार दिला. त्यानंतर ती सुमितपासुन वेगळी राहू लागली. त्यानंतर तिने पिंपरी चिंचवड येथे नोकरीसाठी आली. याची माहिती सुमितला मिळाली. त्यानंतर सुमितने तीला ऑफिसपासून गाडीपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर सुमितने तीला भुलीचे इंनजेक्सन दिले. तीला घरी न नेता गाडीतच डांबून ठेवले. त्या दरम्यान तो तीला वारंवार भूलदेत होता. त्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेत थेट वाकडं पोलिसात आपली तक्रार नोंदवली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोणावळा: विकेंड असल्याने पर्यंटनासाठी लोणावळ्याकडे येणाऱ्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेंनवर ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जातं आहेत. शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या आल्याने अनेक पर्यटक पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत. सकाळच्या सुमारास अनेक वाहने लोणावळ्याकडे निघाले असताना ही वाटून कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याने मावळ तालुक्यातील पर्यटन खुलू लागले आहे. त्यामुळे पुणे मुंबई सह राज्यभरातून मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने अवजड वाहने देखील वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासंतास वाट पहावी लागत आहे. मुंबईहून पुण्याकडे अनेक नागरिक ये जा करत असतात. त्यात शनिवार रविवार सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराच्या बाहेर पडले आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या वाहतूक कोंडीमुळे सकाळपासूनच महामार्ग जाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये मुंबईच्या नागरिकांचा समावेश अधिक आहे. महामार्ग पोलीस ठिकठिकाणी उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे लांब पल्ल्याच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Wednesday, June 19, 2024

निंबुत येथील तरुणांनी नोकरी सोडून सात एकर माळरानावर फुलविली अंजीर बाग

 तरुणांनी शेती नाही केली तर देश शेतीप्रधान कसा राहील ? 


निंबुत येथील तरुणांनी नोकरी सोडून  सात एकर माळरानावर फुलविली अंजीर बाग



  सोमेश्वरनगर  


  बारामती तालुका हा नेहमीच ऊस बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. उसाचे उत्पादन घेत असताना पाणीटंचाई आणि ऊस वेळेवर तोडला न जाणे यामुळे या भागातील शेतकरी सुद्धा आता ऊसाला पर्याय शोधू लागला आहे. त्यातच आता बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील निंबुत  गावातील शेतकरी तरुणांनी आपल्या सात एकर माळरानावर अंजीर फळबागाचं नंदनवन फुलवलं आहे. या अंजीराच्या माध्यमातून वर्षातील  सतत दहा महिने उत्पादन घेण्याचा विक्रम देखील या दोन तरुणांनी केला आहे. 



    दीपक जगताप आणि गणेश जगताप या दोघा भावांनी  निंबुत येथील  पठारवस्तीवर आपल्या सात एकर माळरानावर अंजिराची लागवड केली आहे. दीपक जगताप यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. मुळातच घरात सर्वांना शेतीची आवड असल्याने दीपक यांनी सुद्धा शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपल्या सात एकर जमिनीमध्ये डाळिंब, मोसंबी, संत्रा या फळबागांची लागवड केली. मात्र यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. संत्रा, मोसंबीसाठी येथील वातावरण अनुकूल नव्हते, तर डाळिंबाला आलेल्या तेल्या रोगामुळे त्यांना डाळिंबाची बाग सुद्धा काढावी लागली. मात्र त्यांनी २००७ मध्ये प्रथम एक एकर अंजिराची लागवड केली. सुरुवातीला चार वर्ष त्यांना यश आले नाही. मात्र यानंतर त्यांनी अंजीर पिकाबाबत चांगली माहिती घेतली. पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादक अनेक शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला त्यांचेकडून माहिती घेतली. तर बारामती येथील कृषी विभाग आणि केवीके यांचे देखील मार्गदर्शन घेतले.यानंतर जगताप यांना अंजीर उत्पादनात मोठे यश आले. पुरंदर तालुक्याच्या अगदी जवळ त्यांची शेती असल्याने पुरंदर तालुक्यातील वातावरण आणि त्याच्या शेतातील वातावरणात साम्य आहे याचा  त्यांना फायदा झाला.




त्यांच्याकडे आता सात एकर क्षेत्रामध्ये अंजिराची बाग आहे. यामध्ये ते अलटून-पालटून  खट्टा, मिठा बहर घेतात. 

 जगताप यांनी अनुभवातून अंजीर फळबागांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. त्यामधून त्यांनी अंजीर उत्पादनामध्ये चांगले कौशल्य प्राप्त केले आहे. जगताप यांनी सुरुवातीला पंधरा बाय पंधरा फुटावर अंजिराची लागवड केली होती. यानंतर त्यांनी त्यामध्ये बदल केले. प्रामुख्याने त्यांनी बेड पद्धतीचा वापर केला. अंजिराच्या दोन ओळींमध्ये मोठं अंतर ठेवलं त्याचबरोबर अंजीर छाटणीसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. त्यामुळे त्यांना अंजिरापासून मिळणाऱ्या उत्पादनात मोठी वाढ झाली. पाण्याची कमतरता असल्यामुळे ठिबक सिंचनचा वापर त्यांनी सिंचनासाठी केला. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या काळात पाचटाचा वापर करून आच्छादन केले. यामुळे त्यांना उन्हाळ्यात पाणी कमी लागते. त्याचबरोबर जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढून झाडांची वाढ देखील चांगली होते.   त्यामुळे त्यांचा दुहेरी फायदा झाला. 

     दीपक जगताप त्यांच्या अंजिराच्या शेतात  रेड पूना , दिनकर, जंबो जातीच्या आंजिराची लागवड केली आहे.यातून ते वर्षातून दहा महिने उत्पादन घेतात.त्यांना दररोज सरासरी ५०० किलो उत्पादन मिळते.तर सरासरी ४० ते ५० रुपये दर मिळतो. ते नीरा,सांगली कोल्हापूर येथील बाजारात आपला उत्पादित माल विकतात. पुणे बाजारात ते अंजीर विक्रीसाठी  पाठवत नाहीत .कारण पुण्यात  पुरंदर मधीलअंजीर  मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असते. वर्षातील १० महिने अंजीर मिळत असल्याने अनेक व्यापारी दररोज त्यांच्याकडून अंजीर खरेदी करतात.



  राज्यात व राज्या बाहेरील शेतकऱ्यांना.


दीपक जगताप यांना आता अंजीर उत्पादनातील जवळपास १५  वर्षा पेक्षा  जास्त वर्षाचा अनुभव आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रयोग करून चांगल्या प्रकारचे अंजिराचे उत्पादन घेतले आहे अंजिराला येणारे रोग त्यांना द्यावे लागणारे खाद्य औषध यांचे त्यांना चांगली माहिती झाली आहे कोणत्या झाडाचा कोणत्या काळात भर घ्यावा याबाबत देखील त्यांचा अनुभव आता दांडगा आहे त्यामुळे राज्यातील आणि राज्याबाहेरील शेतकरी सुद्धा त्यांचा सल्ला घेत असतात त्याचबरोबर अनेक वेळा क्षेत्रभेटीवर जाऊन त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत असतात. 


अंजिराच्या रोप विक्रीतूनही मिळवले पैसे 


जगताप यांनी उत्पादित केलेल्या या अंजिराची प्रत अत्यंत चांगले असल्यामुळे याच अंजिरापासून बियाणे मिळावे अशी अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा असते यातूनच मागील दोन वर्षापासून त्यांनी अंतर रोपांचे उत्पादन देखील घ्यायला सुरुवात केली आहे गेल्या वर्षी ७००० अंजीर रोपांचे उत्पादन घेतले होते. तर यावर्षी २५ हजार रोपांची मागणी त्यांच्याकडे आहे आणि त्याच देखील ते उत्पादन घेत आहेत.  यासाठी ते झाडावरच गुटी कलम करतात. फांद्यांना मुळ्या फुटल्यानंतर त्याची पिसवी मध्ये लागवड केली जाते. त्यामुळे त्याच्यात मर होत नाही . शेतकऱ्यांना खात्रीशीर रोप मिळत असल्याने कर्नाटक आंद्र प्रदेश आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातून रोपांची मागणी त्यांच्याकडे होत आहे.



  शेती  करण्यासाठी  सोडली नोकरी  अनेकांना दिला रोजगार


दीपक जगताप  यांचे बंधू गणेश जगताप हे पुण्यामध्ये नोकरी करीत  होते आठ वर्षा पूर्वी  महिना ३२ हजार पागर मिळणारी नोकरी त्यांनी सोडली आणि  शेतामध्ये भावाला मदत करायला  सुुवात केली.आता त्यांच्याकडे दररोज २५ मजूर काम करतात. जगताप हे आत नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे झाले आहेत.



 " भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.मात्र या देशातील शेतकरी आता आपल्या मुलांना नोकरी करण्याचा सल्ला देतो.अगदी लहान पणापासून तसे संस्कार त्याच्यावर केले जातात.शाळेतून दिले जाणारे  शिक्षणही शेती पूरक नाही .त्यामुळे येत्या काळात शाळेच्या अभ्यासक्रमात शेती विषयक अभ्यासक्रमाचा सहभाग करायला हवा. तसं झालं नाही तर आपला देश शेती प्रधान देश राहणार" 


दीपक जगताप ( शेतकरी )

प्रवीण जोशी लिखित गल्हाटा काव्यसंग्रहाचे २३ जून रोजी नीरा येथे होणार प्रकाशन

 गल्हाटा काव्यसंग्रहाचे २३ जून रोजी नीरा येथे होणार प्रकाशन



ता.

   प्रसिद्ध ग्रामीण लेखक, कवी प्रविण जोशी यांच्या आगामी गल्हाटा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार ता.२३ जून रोजी सकाळी १० वा. ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.

     गल्हाटा हे बहुचर्चित पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार असून डॉ. सबनीस यांना ऐकण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

    राजकारण, शिक्षण, समाजव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था यातील सावळा गोंधळ व अव्यवस्था यांवर सडकून टीका करणारे पुस्तक वाचकांना दिशा देणारे ठरेल असा विश्वास आहे. आदिवासी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तसेच प्रसिद्ध लेखिका, कवयित्री व गोंडी भाषेच्या अभ्यासिका, संशोधिका उषाकिरण अत्राम यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. तर ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होत असल्याने दोन दिगग्ज व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचा कौल मिळालेले हे पुस्तक दिशादर्शक ठरेल असा विश्वास प्रविण जोशी यांनी व्यक्त केला. 

     प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिनकर गायकवाड, डॉ. प्रदीप पाटील तसेच डॉ. महादेव रोकडे, डॉ. विश्वास शेवते, डॉ. वैजनाथ राख हे पुण्यातील महाविद्यालयांचे मराठी विभागांचे प्रमुख कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. कुंडलिक पारधी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संशोधक व लेखक संदीप तापकीर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

    लेखक व कवी अनिल कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. येथील नीरा- शिवतक्रारच्या ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून रसिक वाचकांनी पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावावी असे आवाहन आयोजक आदित्य कोंडे, दादा काशीद, अमोल निगडे यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी पुण्यात एकाची आत्महत्या

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा म्हणून ओळख झालेले मनोज जरंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. त्यात दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसला आहे. हे आंदोलने सुरु असतानाच आता पुण्यातील मराठा समाजाच्या तरुणाने चिठठी लिहून आत्महत्या केली आहे. शंभू प्रसाद देठे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने लाईव्ह आणि चिठठी लिहून आत्महत्या केली आहे. हा तरुण मूळचा बार्शी येथील राहणारा असून तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. तिथेच एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठत म्हटले आहे की, जयोस्तु मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा. तुमचाच प्रसाद अशी चिठठी लिहून त्यांनी आपले जीवन सनोवले आहे. माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख प्रसाद देठे याने केला आहे. देठे याच्यामागे पत्नी, 2 मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबंचा आधार गेला असल्याची भावना त्यांच्या निकटवरतीययांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात कंपनीची भिंत कोसळली..! एका कामगाराचा मृत्यू, तीन कामगार जखमी, वाहनांचे मोठे नुकसान

पुणे : शिरूर रालुक्यातील कोरेगाव भिमा येथील डिंग्रजवाडी असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंगभिंत कोसळल्याने एकाचा जागेवर मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यात चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. राजीव कुमार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंजित कुमार गंभीर जखमी असून बेशुद्ध आहे तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे अशी जखमी झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुकायत डिंग्रजवाडी येथे असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळ आज सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाच्या सुमारास कंपनीची भिंत कोसळली. कंपनीची भिंत पडल्याने कामासाठी कामगार दबले गेले आहेत. यात एका कामगारांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत ०९ दुचाकी गाड्या तर दोन सायकली व दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा पोलिसनाकडून केला जात आहे. या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला असून त्यात भिंत कोसळल्याचे पहायला मिळत आहे. यात मृत झालेला कामगार आणि जखमी झालेले कामगार पर प्रांतीय असल्याची माहिती समोर येत आहे.

Tuesday, June 18, 2024

अंकलीतून माऊलींच्या आश्वाचे आळंदीकडे प्रस्थान

पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आता सुरु होताना पहायला मिळत आहे. राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहे. त्यातच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला ज्या आश्वाना मान असतो ती माऊलींची आश्वाचे अंकलीहून आळंदीकडे आज प्रस्थान झाले आहे. अंकली येथील राजवाड्यात अश्वाचे पूजन करण्यात आले. श्रीमंत सरदार शितोळे अंकलीकर यांच्या राजवाड्यात श्री देवी अंबाबाईचे दर्शन घेऊन श्रीमंत शितोळे सरदार यांनी ध्वजपूजन करून माऊलींच्या अश्वांनी प्रस्थान करण्यात आले आहे, अशी माहिती अश्व चालक तुकाराम कोळी यांनी दिली आहे. यावेळी अश्वाची टाळ मृत्युंदूंगाच्या गजरात यावेळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्ञानोबा माउलींच्या जयघोषत यावेळी मिरवणूक काढण्यात आली. माऊलींच्या अश्वांचे नाव हिरा आणि मोती असे असून त्यांचे आळंदी कडे प्रस्थान झाले आहे.
आळंदीत येण्यासाठी राज्यभरातून शेतकरी भाविक आपली शेतीतील कामे आवरून माउलींच्या भेटीची आस मनात ठेवून आळंदीकडे निघाले आहेत. राज्यभरतून वारकरी देहू आणि आळंदीत दाखल होत आहेत. यंदाच्या वर्षी 10 ते 15 लाखापर्यंत वारकरी पालखी सोहळ्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देखील तेवढी तयाऱी केली जात आहे. यंदाच्या वर्षीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून सर्व पालखी मार्गांवर योग्य उपाय योजनाची सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाचा पालखी सोहल्यासाठी वारकरी आळंदीत दाखल होत आहेत.

सासवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा, आमदार संजय जगताप यांना निवेदन

सासवड : सासवड येथील कार्यालयात वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत आज आमदार संजय जगताप यांना तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. पुढील आठवडय़ात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुरंदर तालुक्यामध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने गांभीर्याने विचार करून तालुक्यातील तसेच सासवड शहरातील वीज वितरणा संदर्भातील अपूर्ण कामे ४/५ दिवसांमध्ये पुर्ण न केल्यास पुरंदर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पुरंदर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन महाजन सासवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तुषार जगताप यांनी निवेदन दिले. यावेळी सासवड शहर काँग्रेस पक्षाचे खजिनदार नितिन भोंगळे, सा. कार्यकर्ते मुन्ना शिंदे, सासवड शहर असंघटित कामगार सेलचे उपाध्यक्ष सागर जगताप, बेलसर गण युवक अध्यक्ष अतिश जगताप,विद्यार्थी कॉंग्रेस उपाध्यक्ष कुलदीप कोंडे, शुभम खेंगरे, सुनिल रिठे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, June 17, 2024

नवनियुक्त पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करावे : एस. एम. देशमुख पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ.

 नवनियुक्त पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करावे : एस. एम. देशमुख 


पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ. 



पुणे : 

      ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढील काळात कार्यरत होणार आहे. स्थानिकांकडून पत्रकारांना त्रास दिला जातो. या पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा संघाच्या कार्यकारणी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करावे. नवनियुक्त पदाधिकार्यांनी प्रत्येक महिन्याला एका तालुक्यातील सदस्यांसोबत बैठक घेऊन मराठी पत्रकार परिषद आपल्या पाठीशी खंबीर असल्याचा विश्वास देणे गरजेचे आहे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले. 


       मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी (दि.१७) मधुबन लॉन्स, कवडीपाठ ता. हवेली, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हर्चुएल) पद्धतीने लंडन येथून मार्गदर्शन करत नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी , परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, मुंबई विभाग अध्यक्ष राजा आदाटे, श्रीराम कुमठेकर आदी उपस्थित होते. 


      पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल लोणकर, परिषद प्रतिनिधी पदी ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, जिल्हा संघटक पदी अनिल वडघुले (जबाबदारी - शिरुर, हवेली, खेड, आंबेगाव जुन्नर, मावळ), जिल्हा संघटक पदी चिराग फुलसुंदर (पिंपरी चिंचवड + पुणे शहर परिसर), जिल्हा संघटक पदी सुर्यकांत किंद्रे (जबाबदारी - भाेर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड ), उपाध्यक्ष पदी सचिन कांकरीया (जुन्नर-आंबेगाव), हनुमंत देवकर - (चाकण - मावळ), मदन काळे (शिरूर, दौंड, खेड), चिंतामणी क्षिरसागर (बारामती - इंदापूर), रमेश निकाळजे (हवेली - पुरंदर), संतोष म्हस्के (भोर, वेल्हा, मुळशी), सरचिटणीस पदी सतिश सांगळे, सहचिटणीस पदी किरण दिघे, कोषाध्यक्ष पदी प्रा. संतोष काळे, सहकोषाध्यक्ष पदी संजय शेटे, कार्यालयीन चिटणीस पदी जीवन शेंडकर, जिल्हा समन्वयक पदी मारुती बाणेवार, रविंद्र वाळके, प्रवक्ता म्हणून सावता झोडगे (आंबेगाव), जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन मेदनकर, सहप्रसिध्दी प्रमुखपदी रोहित नलावडे, वरीष्ठ जिल्हा सल्लागार म्हणून नितिन बारवकर, संतोष वळसे, रमेश वत्रे, ज्ञानेश्वर रायते, संजय इंगुळकर, दत्तानाना भोंगळे, श्रीराम कुमठेकर, नाथाभाऊ उंद्रे, पुणे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रकपदी बी. एम. काळे, पुणे जिल्हा तंटामुक्ती समिती प्रतिनिधी पदी सुनिल भांडवलकर, जिल्हा निवडणुक निरीक्षकपदी सुनील वाळुंज, सारंग शेटे, दत्ता भालेराव, रविंद्र पाटील, जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी किरण भदे (भोर), ए.टी. माने (पुरंदर), अमर गायकवाड (चाकण),  सुनील जाधव (बारामती), रोहित वाघमोडे (इंदापूर), सुनील शिरसाट (हवेली ), सुरेश भुजबळ (जुन्नर), विश्वास दामगुडे (वेल्हा), दत्ता बांदल, बापु पाटील (मावळ), राजेश नागरे (आळंदी), सुनिल पवार (प्राधिकरण), महिला जिल्हाध्यक्षपदी श्रावणी कामत, समन्वयकपदी रेखा भेगडे, सचिवपदी छाया नानगूडे, कोषाध्यक्ष पदी सुजाता गुरव, कार्यकारणी सदस्य म्हणून वर्षा चव्हाण, पुणे शहर अध्यक्षपदी बाबा तारे, शहर उपाध्यक्षपदी मंगेश कुमार हिरे, शहर सरचिटणीसपदी प्रमोद गव्हाणे, शहर कोषाध्यक्षपदी धनराज खंडाळे यांना व्यासपीठावरिल मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व तुळशीरोप देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान हवेली तालुका अध्यक्षपदी स्वप्नील सुभाष कदम यांची नियुक्ती करण्यात आली. 


      पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन हवेली तालुका मराठी पत्रकार संघाचा वतीने करण्यात आले होते. हवेली तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक होते. तर मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील तेरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर तालुका अध्यक्ष संजय बारहाते, खेड तालुका अध्यक्ष सुनील थिगळे यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार व परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी केले. नवनियुक्त पदाधिकार्यांना मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, मुंबई विभाग अध्यक्ष राजा आदाटे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले तर आभार पुणे जिल्हा सोशल मीडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी मानले. 






भामचंद्र डोंगरावर वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्याकडून मारहाण...! अश्लील चाळे करण्यापासून रोखल्याचे कारण

पुणे : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड ) वारकरीपंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारकरी विद्यार्थ्यांनी या डोंगरावर आलेल्या मुल आणि मुलींना अश्लील चाले करण्यापासून हटकल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून अभ्यास करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आजही जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येथे आहेत. मात्र रविवारी एक तरुण मुलगा आणि मुलगी या ठिकाणी आले होते. त्यानंतर त्या दोघांचे या ठिकाणी अश्लीश चाळे सुरू होते. त्यामुळे तिथे अभ्यास करण्यासाठी आलेल्या कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांना हटकले. त्यावर या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून त्याला अधिक मारहाण केली. या घटनेत साधक विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्यांलादेखील जखमी केले आहे. या साधकावर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला आहे. या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भामचंद्र डोंगर येथे नेहमी तळीराम आणि प्रेमी युगुल वावरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु आता मारहाण झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. येथे अभ्यास करणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास म्हाळुंगे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश नवले करत आहेत.

AI तंत्रज्ञानाचा वापर करून 70 वर्षीय रुग्णाचा कर्करोग केला बरा...! राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : दिवसेंदिवस जगात नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यातच AI हे तंत्रज्ञान वापरून अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या जात आहेत. असेच AI तंत्रज्ञान वापरून चक्क कर्करोग बरा करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कर्करोग बरा करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून कर्करोगी रुग्णाचा रेडिओलॉजिस्टच्या मदतीने कर्करोग बरा करण्यात आला आहे. राज्यातले हे पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मावळ येथील एका एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुफुसाचा कॅन्सर झाला होता. त्यांची घरची परिस्थिती फारच हालाखीची होती. त्याने मावळच्या तळेगाव दाभाडे येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये या रुग्णाने उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रथमदर्शनी या रुग्णाला फुफुसाचा कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाला रेडिएशनच्या मार्फत कॅन्सरची गाठ काढण्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी फुफ्फुसातील या रुग्णाची कॅन्सरची गाठ एआय टेक्नॉलॉजी च्या मार्फत काढली. या प्रक्रियेला साधारणतः एक ते दोन महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर मात्र आता हा सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक रुग्ण ठणठणीत बरा असल्याचे पाहायला मिळत आहे. AI टेक्नॉलॉजी मुळे नोकऱ्या धोक्यात येतील असा एक समज लोकांमध्ये होता. मात्र आता याच एआय टेक्नॉलॉजी मार्फत मेडिकलमध्ये खास करून कॅन्सर रुग्णांसाठी ही एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्यात यश आल्याने या पद्धतीचा वापर आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात केला जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होइलच. मात्र हे ऑपरेशन यशस्वी झाल्याने कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. कारण ही एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. कर्करोगावर प्रभावी उपचार पद्धती करून या आजारातून बरं करण्याचं कार्य येथील डॉक्टरांच्या टीमला जात असल्यानं ही उपचार पद्धती आजारी व्यक्तीला वरदान ठरत असून त्याचा फायदा नक्कीच कर्करोग्याला मिळताना दिसून येणार आहे.

दौंड तालुक्यात विजेचा धक्का लागून आईवडिलांसह मुलाचा मृत्यू

पुणे : दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात त्यांची मुलगी वाचली आहे. सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदीका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते मूळचे सोलापूर येथील राहणारे असून दापोडी येथे राहत आहेत. याबाबत अधिक माहिती आधी की, भालेराव कुटुंबं हे दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या होत्या. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवन्यात येत आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास सुरेन्द्र आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारखेला धक्का बसला. त्यांच्या आवाजाने तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ मुलगा प्रसाद याने धाव घेतली. त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील तत्काळ त्या ठिकाणी आली होती. त्यांना देखील धक्का बसला. चार जणांच्या या कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमावा लागला. कुटुंबप्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेंद्र हे परिसरात बांधकामाची कामे करत होते. मुलगा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. पत्नी गावातील शेतात मजुरीचे काम करत आहे. हे कुटुंब या परिसरात गेल्या पाच वर्षापासून राहत आहे. या हृदय द्रावक घटनेने दौंड तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे. भालेकरांच्या कुटुंबातील एकमेव मुलगी वैष्णवी (वय १७) कोचिंग क्लासला सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे तिचा जीव वाचला आहे.

पुण्यात महिलेला अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलाचा पराक्रम

पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघाताचे प्रकरणानंतर खेड तालुजातील आळंदीजवळ असणाऱ्या वडगाव घेनंद या गावात एका अल्पवयीन मुलाने जुन्या भांडणाचा राग मानत धरून भरधाव वेगात कार चालवून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी जवळ असलेल्या वडगाव घेणंद येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या कार चालकाने सुरुवातीला कार रिवहर्स घेऊन मग गाडी पुन्हा वेगाने चालवून महिलेला जोरात धडक दिली. त्यानंतर घाटनास्थलावरून तो जोरात निघून गेला. अंगावर शहाहारे आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर यानंतर या गाडी चालकाने गाडीच्या टपावर बसून शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलानी गाडी चालवून अपघात करणाऱ्याच्या घटना समोर आली आहे. त्यामुले पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे आणि परिसरात बड्या व्यक्तींच्या अल्पवयीन मुलाना गाड्या देणे नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यावर पोलिसांकडून कारवाई होण्याची गरज असल्याचे नागरिकांडून सांगण्यात आले आहे. आज घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबल उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने या भागात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Sunday, June 16, 2024

मुख्यमंत्र्यानी दुष्काळ परिस्थिती उपाययोजनाबाबत बैठक घ्यावी : शरद पवार यांची मागणी

विशेष प्रतिनिधी नीरा : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी १२ आणि १३ जून रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र दौऱ्यावेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे शरद पवार यांना दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील शरद पवार यांच्याकडून सुचवण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती की, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे. उक्त बैठकीस संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी तसेच कायस्वरूपी उपाययोजने संदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

पुरंदर विमानतळाचे भूसंपादन लवकरच : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

नीरा : पुरंदर विमानतळाला डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन), एएआय (एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया) यांची मान्यता मिळाली आहे. त्यासोबत एमएडीसीकडूनदेखील एनओसी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, यासंदर्भात तिघांची एकत्रिक बैठक घेऊन येथील जागेची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून लवकरच भूसंपादन प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावरील विविध प्रश्नांसंदर्भात रविवारी (दि.16) पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी या वेळी येथे उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचीदेखील पाहणी केली. आढावा बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व प्रशासनातील अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Thursday, June 13, 2024

पक्षातील नवीन नेते त्यांना डावलू पाहतायेत, जयंत पाटील यांच्याबाबत सुनील शेळके यांचे विधान...

पुणे : जयंत पाटील साहेबांसारखे जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये आहे याचे आम्हला समाधान आहे. पण काही नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे. पक्षामध्ये त्यांना सारख सारख डावलल जाणं त्यांना पक्षातून बाजूला ठेवणं हे पक्षातील काही नवीन नेते करू पहात आहेत. जयंत पाटील साहेबाना हेच सांगणे आहे. राज्याचे अभ्यासू नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अशी प्रतिक्रिया मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. तळेगाव दाभाडे येथे सुनील शेळके यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुनील शेळके म्हणाले कि, सुनेत्रा पवार यांची खासदार. पदी निवड होणे ही सर्व वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना आलेले यश आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्री पदाबाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्यावर मी अधिक बोलणार नसल्याचे शेळके यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ययुवक अध्यक्ष पदासाठी दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना युवक अध्यक्ष करण्यासाठी आग्रही होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे असलेले मेहबूब शेख यांची नेमणूक कायम ठेवल्याने आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. त्यातच जयंत पाटील यांनी आपण काही दिवसांसाठीच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधकांनी म्हणजे अजित पवार गटातील नेत्यानी आपल्याकडे येण्याची विनंती केली आहे. जयंत पाटील यांच्याकडून आम्हाला खुप अपेक्षा असल्याचे शेळके म्हणालेत.

पिंपरी चिंचवमध्ये पुन्हा हिट अँड रन...!भरधाव चारचाकीने महिलेला उडवले

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हिट अँड रन च्या घटनामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. भोसरी परिसरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव चार चाकीने महिलेला उडवले आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसानी अखेर 24 तासानंतर गुन्हा दाखल केला आहे. चालक हा पोलीस हवालदारचा मुलगा आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर एका भरधाव कारने एका महिलेला उडवले आहे. महिलेला उडवल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेला. या अपघाताच्या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे. ती कार एवढ्या भरधाव होती की ती महिला हवेत उडाली होती.  भोसरी येथे बुधवारी दुपारच्या सुमारस ही घटना घडली आहे. एक महिला मुलींसोबत रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात भरधाव कारने त्या रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. ती धडक इतकी भीषण होती कि, धडक बदल्यानंतर ती महिला जवळपास 8 ते 9 फूट उंचावर उडाली आणि खाली पडली. यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात हिट अँड रन ची प्रकरणाने मोठ्या प्रमाणात वाढली असून हिंजवडीतील घटनेनंतर पिंपरी चिंचवड येथे देखील अशा घतनमध्ये वाढ़ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावरून कसे चालावे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Wednesday, June 12, 2024

भरधाव कारची धडक महिलेला उडाली हवेत, थोडक्यात बचावली, नियंत्रण सुटल्याने कार गेली दुकानात, कार चालकावर गुन्हा

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा भरधाव कारने महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सिसिटीव्ही आता समोर आला असून या अपघातातील महिला थोडक्यात बचवाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघातात 23 मे रोजी घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात २३ मे २०२४ रोजी ही महिला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने त्या महिला पाठीमागून जोरात धडक दिली. तयामुळे महिला जोरात उडून पडली. कारवरील चालकाचा ताबा सुटलेली कार ही पुन्हा एका दुकानात शिरली. त्यानंतर या अपघाताचे सिसिटीव्ही व्हायरला झाला आणि हा प्रकार समोर आला आहे. या. घटनेतनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना संपर्क केला. मात्र, आपली कोणतीही तक्रार नसल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. तसेच, संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचे सिसिटीव्ही समोर आल्यानंतर पुण्यातील पोर्शे अपघाताची आठवण ताजी झाली. या घटनेची पॉलिसीकडून कोणतीही दाखल तातडीने घेण्यात आली नासक्याचस आरोप नागरिकांडून करण्यात आला. या घेटनेनंतर संबंधित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याने गुन्हा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रनेला जाग आली असून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळशेज घाटात रिक्षावर कोसळली दरड, चुलता पुतण्याचा जागेवर मृत्यू, आई वडिलांनी डोळ्यादेखात गेले प्राण

जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात पावसाळा सुरुवात झाली आहे. त्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई येथे राहात असलेले कुटुंबं आपल्या मुलगावी म्हणजे संगमनेर येथे रिक्षाने जात असताना माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळून काका आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. आई वडिलांच्या डोळ्यादेखत आपल्या मुलाचा आणि नातवाचा मृत्यू पहिल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा यातून बालबाल बचावला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली आहे. राहुल भालेराव ( वय 37) आणि स्वयंम भालेराव ( वय 6) या काका पुतण्याचा जागेवरच मृत्यू झाला असून आई वडील आणि थोरला भाऊ यातून बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील भालेराव कुटुंब आपल्या रिक्षा मधून एम.एच. ०३ डी. एस. ३२११ चंदनापुरी येथे मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी जातं होते. मात्र, माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षामध्ये बसलेल्या चुलता पुतण्याच्या अंगावर अचानक भला मोठा दगड कोसळला आणि मोठा अनर्थ झाला. यात सोयंम भालेराव, राहुल भालेराव या दोघांचा जागीचा मृत्यू झाला. तर त्यांच्या बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (५८),वडील बबन भालेराव वय (६२) व भाऊ सचिन भालेराव (४०) सर्व रा. घाटीपाडा नं २ वाळकाबाई चाळ बिहार रोड योगीहील मुलुंड प. मुंबई नं ८० हे थोडक्यात बचावले आहेत. बराच वेळ हा अपघातात झाल्याचे लक्षातच आले नाही. कारण रिक्षाला काहीच झाले नाही. फक्त वरच्या कापडं फाटले आणि दगड थेट दोघांच्या डोक्यात पडला. मात्र आई आणि वडिलांनी स्वतःच्या डोळ्यादेखात आपल्या मुलाचा आणि नातवाचा मृत्यू पहिल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसंकडून पुढील कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

मुख्यमंत्र्याना संयुक्त बैठक घ्यायला भाग पाडू : शरद पवार यांची पुरंदरवासियांना ग्वाही

वाल्हे : प्रश्न सोडवायचा असेल तर काही लहान थोर प्रकल्प गेल्या काही दिवसापासून प्रलंबित राहिले आहेत. आपण पुरंदर उपसा योजनेचे काम काही प्रमाणात केले. त्याच्यातही काही प्रमाणात कमतरता आहे. त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे, याकरिता राज्य सरकारने काही गुंतवणूक करायला हवी. तसेच गुंजवणीच्या प्रश्नाबाबत अनेकांची भाषणे झाली. त्याची मान्यता माझ्या सहीने झाली. त्याचे भूमिपूजन माझ्या उपस्थितीत झाले. पण आपल्याला जे हवंय त्याची पूर्तता आज होत नाही. ज्यावेळी अशा प्रकल्पांना विलंब लागतो त्यावेळी त्याला फाटे फार फुटतात. त्यासाठी अधिकाधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी ही योजना आहे अशा पद्धतीचा आग्रह झाला पाहिजे ते करण्यासाठी राज्य सरकारला आम्ही भाग पाडू. याकरिता सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत एक संयुक्त बैठक घ्यायला पार पाडू अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार आज पुरंदर तालुक्यातील दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले कि, गेले काही दिवस पावसाची स्थिती बघितल्यानंतर मला असं वाटलं की दुष्काळाला तोंड द्यावे लागेल, अशी स्थिती दिसते. म्हणून त्या भागात मला जावे वाटले. सरकारला जागे करावे जेवढी व्यवस्था करता येईल ते करायाला सरकाराला भाग पाडायाला हवे. आज थोडा फार पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात एक वैशिष्ट्य आहे मी जिथे जातो तिथे पाऊस पडतो. आताच्या पावसाची जी स्थिती आहे त्याने प्रश्न सुटत नाही चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा आहे. पुरंदरचा निकाल मतांची आघाडी देण्यात यशस्वी झाला. जेवणा निवडून दिलं त्यांची इथे येण्याची इच्छा होती. मात्र त्यांना आजच परदेशात जावं लागलं. त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आहे. आज त्यांचा पदवी प्रदान समारंभ आहे. आपल्या मुलाच्या पदवी प्रदान समारंभाला हजर राहावं असं मी त्यांना सुचवलं. त्यामुळे इच्छा असूनही सुप्रियाताई आज इथे येऊ शकल्या नाहीत. आज पुन्हा त्यांच्या हातात सत्ता गेली आहे. पण दहा वर्षाची सत्ता आणि आजची सत्ता यात फार मोठा फरक आहे. दहा वर्ष त्यांच्या हातात स्पष्ट बहुमत होतं आणि समाजातील सर्व धर्माच्या जातीच्या लोकांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता होती. परंतु त्यांची निर्णय घेण्याची पद्धत काही लोकांबद्दल मनात आतुष्ट असावा अशी होती. त्यांची काही भाषण झाले की देशाच्या एकजुटीला तळा देणारी झाली. मोदींच्या भाषणाबाबत... राज्याच्या प्रमुखाची सर्वांच्या हिताची गोष्ट करणे ही जबाबदारी असते. प्रधानमंत्री यांनी काही ठिकाणच्या भाषणात गोष्टी सांगितल्या. धर्माचा उल्लेख न करता लोकांना समजवण्याचा महत्त्वाचा निकाल त्यांनी दिला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो. त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या बहिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून जाईल. असं म्हणण्याचं काहीही कारण नव्हतं. पक्ष भिन्नता असूनही देशाचा विचार सोडला नाही.... मला राज्याच्या विधानसभेत विधानपरिषदेत लोकसभेत राज्यसभेत जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष झाली. 1967 सालापासून एकही दिवसाचे खड न घेता सलग निवडून आलेला या देशात दुसरा कोणी नाही. या 56 वर्षात अनेक मंत्री पाहिले अनेकांसोबत काम केले. पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कधी सोडला नाही. मारुतीने पहिला आमदार माझ्या घरी दिला... अटल बिहारी वाजपेयी यांचा आणि आमचा पक्ष वेगळा होता पण देशाच्या बाबतीत त्यांनी कधी चुकीची भूमिका घेतली नाही. त्यांच्याकडे विचारता राहू दे आता त्यांच्यानंतर ही वेगळी विचारधारा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काही लोक होती काही आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आमदार होतो. तेव्हा माझ्या घरी कोण आमदार नव्हतं पण मारुतीने पहिले आमदारकी माझ्या घरी दिली.

Tuesday, June 11, 2024

पुरंदरच्या दोन शेतकऱ्यांना कोथिंबिरीने केले लखपती, बांधवरच मिळाले लाख रुपये, वीर येथील शेतकऱ्यांचा कष्टाचे झाले चीज

राहुल शिंदे नीरा : रोजच्या स्वयंपाकात कोथंबिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भाजीत थोडी तरी कोथंबीर टाकलीच जाते. मात्र कोथिंबिरीने सध्या चांगला भावा खाल्ला आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला झाला आहे. या कोथिंबिरीने शेतकऱ्याला लखपती केले आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावातील दोन शेतकऱ्यांना कोथिंबिरीने लखपती केले आहे. त्यांची चर्चा आता पंचक्रीशीत होऊ लागली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर येथील शेतकरी राजेंद्र धुमाळ आणि प्रतापराव धुमाळ यांना कोथंबरीने लखपती बनवले आहे. राजेंद्र धुमाळ यांनी दोन एकर शेतात कोथंबिर लावली होती. त्यांना यातून साडे तील लाख रुपये मिळाले आहेत. तर दुसरे शेतकरी प्रतापराव धुमाळ यांना दहा पांड कोथंबरीचे एक लाख रुपये मिळाले आहेत .विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावर ही खरेदी केली आहे. त्याच बरोबर स्वतः मजूर लावून ती उपटून मार्केट मध्ये नेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या काढणी व वाहतूक खर्चातही बचत झाली आहे. 

  


   पुणे जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई आहे. त्यातच प्रचंड उष्णतेमुळे अनेकांनी लावलेली कोथंबीर जागेवरच जळून गेली. त्यामुळे बाजारात कोथंबिरीचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे मागणी वाढून कोथंबीरीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात कोथंबिरीच्या एका पेंडीला ५० ते ७० रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थीत कोथंबरीचे उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे. याबाबत बोलताना शेतकरी प्रतापराव धुमाळ म्हणाले कि, मागील पाच वर्षापासून मी कोथंबीरीच उत्पादन घेतो. यावर्षी पाणी कमी असल्याने केवळ १२ पांड क्षेत्रात कोथंबीर लावली. पण उष्णतेमुळे यातील दोन पांड जळून गेली. मात्र यातील राहिलेल्या कोथंबरीला तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी दिले. दिवसातून तीन ते चार वेळा पाणी दिले. ४० दिवसात ती काढणीस आली.पुण्यातील व्यापाऱ्याने जागेवरच खरेदी केली. यासाठी त्यांनी एक लाख रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.



दोन एकरात कोथिंबीरीचे उत्पादन घेताना राजेंद्र धुमाळ यांना मशागतीसाठी १० हजार, बियाण्यांसाठी १६ हजार,रासायनिक खतांसाठी ७ हजार तर खुरपणीसाठी १० हजार रुपये खर्च आला असा एकूण सुमारे ४३ हजार रुपये खर्च आला.खर्च वजा जाता त्यांना तीन लाख सात हजाराचा फायदा झाला तर प्रतापराव धुमाळ यांना १३ हजार रुपये खर्च आला. त्यांना ८७ हजाराचा निव्वळ नफा झाला.

Monday, June 10, 2024

पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा : मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

पुणे : पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत आहे. यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथून व्हर्च्युअल पद्धतीने पुणे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॅाटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर सूचना दिल्या. शिवाय याबाबत कृती आराखडा तयार करुन तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत? याचीही विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरात पूरपरिस्थितीनिर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांची कामे प्रस्तावित असून याला कामांना तातडीने स्थायी समितीची मान्यता द्यावी आणि लगेच ‘वर्क ॲार्डर’ देण्यासंदर्भातही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामांसाठी १४७ कोटी रुपयांची आवश्यकता असून सदर निधी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर प्राप्त करुन देण्यासाठी मी स्वतः पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. विशेष बाब म्हणजे, राज्य सरकारकडून पूर नियंत्रणासाठी आपण २०० कोटींचा विशेष निधी पुणे शहरासाठी आणला असून त्याबाबतच्या कामांच्या नियोजनाचा आढावाही यावेळी घेतला. शिवाय पुण्यात पुन्हा पहिल्या पावसासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठीच्या स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपात्कालीन व्यवस्थापनाचे फोन लागत नसणे आणि उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबतही तातडीने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीस महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पृथ्वीराज व्ही.पी., विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल, सांडपाणी व्यवस्थापनचे संतोष तांदळे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. गणेश सोनुने यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉक्टरचा पत्नीला पैसे आणण्यासाठी त्रास, अखेर संपवली जीवनयात्रा

सोलापूर : व्यवसायासाठी एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणून डॉक्टर पत्नीला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.ऋचा असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर याला अटक केली आहे. या प्रकरणी ऋषिकेश संजय पाटील (रा. पद्मावती प्लाझा मार्ग, पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैद्यकीय व्यवसायाकरिता एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी पत्नी ऋचा हिच्या नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी सतत डॉ.पत्नी कडे कागद पत्रावर सहया कर, नाहीतर तुझे माहेरहून रक्कम आणुन दे म्हणत त्रास सुरु केला. घडलेला प्रकार आई आणि भावाला सांगितला. त्यानंतर त्यांनी दोन तीन दिवसांमध्ये सांगोल्याला येतो असे माहेरच्यानी सांगीतले देखील होते. मात्र, 6 जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी इन्सीडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचा (आयआरएस) प्रभावी उपयोग करावा. सोहळ्यातील संबंधित विभागविषयक निश्चित कामकाजासाठी संपर्क अधिकारी नेमून त्याला पालखी सोहळ्यासंबंधित जबाबदारी द्यावी जेणेकरुन समन्वय साधताना गोंधळ होणार नाही. पाऊस पडत असल्याचे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे स्रोत तपासून ते निर्जंतूक करुन घ्यावेत. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकता असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करता येतील. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ करण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. पुढील गावी शौचालयांच्या वाहतुकीसाठी योग्य वाहतूक आराखडा (ट्रान्झिट प्लॅन) तयार करा. आपल्या घरातील शौचालये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यास पालखी मार्गावरील इच्छुक नागरिकांच्या घरांना वेगळे मार्किंग करा. वारी पुढे गेल्यानंतर मागील गावातील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, असेही ते म्हणाले. पालखी मार्गावरील दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. सुरक्षेच्यादृष्टीने मार्गावरील, नगरपालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलकांची (होर्डिंग्ज) तपासणी करावी. अवैध आणि असुरक्षित सर्व जाहिरात फलक काढून टाकावेत. पालखीला अडथळा येऊ नये आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी महामार्गावरील कामे पूर्ण करण्यासह अडथळे काढावेत. एनएचएआयने पोलीस, उपविभागीय अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करुन त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आदींबाबत माहिती सादरीकरणाद्वारे दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १ हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार आणि संत सोपान महाराज पालखीसाठी पालखीमुक्कामी, विसाव्याच्या ठिकाणी २०० शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही पालख्यांसाठी मिळून १२ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पाण्याचे स्रोत, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, फिरते आरोग्य पथक, औषधे, रुग्णवाहिका यांची आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. स्तनदा माता आणि बालकांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले. पालखीसाठी तसेच पोलीसांसाठी तालुकास्तरावर देण्यात आलेले तात्पुरते तंबू (टेन्ट्स) देण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक श्री. देशमुख यांनी पालखी बंदोबस्त, वाहतूक आराखडा, पालखी महामार्गावर एनएचएआयकडून सुरू असलेल्या कामांच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या उपाययोजना आदींच्या अनुषंगाने माहिती दिली आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

पुण्यात सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार, पाच जणांवर गुन्हा, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

आंबेगाव, पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात दोन सख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चौघानी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी धक्कादायक म्हणजे त्यांनी त्या घटनेचा विडिओ तयार करून दुसऱ्याला पाठवला.त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. या प्रकरणी आता चौघाविरोधात पारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरस, कुणाल कैलास बोराडे, दोन अल्पवयीन मुले, सर्व रा. धामणी ता. आंबेगाव यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून दोघीं अल्पवयीन बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो दुसऱ्याला दिला होता. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ पीडित अल्पवयीन मुलींपैकी एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघी मावस बहिणी शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या .काही दिवसापूर्वीच त्या सुट्टीला गावी आल्यानंतर त्यांच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस करत आहे.

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याबाबत दक्षता घ्या : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

मुंबई : राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा. तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव श्री. चांदवले आदी उपस्थित होते. तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मनियार, नाशिक विभागाच्या उपायुक्त राणी ताटे, कोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे, कृषी सहसंचालक रावसाहेब भाबडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणे, अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणे आदींबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचा, वेळेवर मदत व पुनर्वसनाचे सर्व उपाय योजण्याचा प्रयत्न करावा. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्तांनी आपआपल्या विभागातील पाऊस, धरणातील जलसाठा, खरीप हंगामाचे नियोजन, तर पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी यासोबतच आषाढी वारीच्या नियोजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी

पुणे : संपूर्ण देशांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार यांचा यांचा पराभव केला. देशात सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनिता पवार यांची राज्यसभेवर निवड करावी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचविसावा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त पुण्यात पक्ष कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते व दीपक मानकर व राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ठराव मांडण्यात आला या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनिता पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल अशी मागणी करण्यात आली आहे.

Sunday, June 9, 2024

शेषनाग आणि डाळिंबांची 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आकर्षक आरास

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. सोमवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी ४ ते ६ यावेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग, दुपारी १ ते ३ सहस्त्रावर्तने आणि रात्री ९ ते ११ गणेशजागर देखील पार पडला. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले. श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यात १० टक्के पाणी कपात लागू

मुंबई : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही, ०५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्यांदा खासदार थेट केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांना लागली लॉटरी

पुणे : पुण्यातून खासदारकीची निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री पदाची देखील लॉटरी लागली आहे. त्यामुले पुणेकरांनी जल्लोष केला आहे. रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या मोदी यांच्या सरकारमध्ये मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना अधिकृत फोन आला. मोहोळ यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू असताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी मोहोळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून भाजपचे अवघे 9 खासदार विजयी झाले आहेत. भाजपची महाराष्ट्रात मोठी पडझड झाली. मात्र, पुण्याची जागा भाजप जिंकणार, याचा आत्मविश्वास आधीच पासूनच पुणे भाजपला होता. त्यात मुरलीधर मोहोळ यांनी 1 लाख 23 हजार येवढे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे पुण्यातील खासदार आता केंद्रात मंत्री झाला आहे.

Featured Post

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...