पहिल्यांदा खासदार थेट केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांना लागली लॉटरी
June 09, 2024
0
पुणे : पुण्यातून खासदारकीची निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री पदाची देखील लॉटरी लागली आहे. त्यामुले पुणेकरांनी जल्लोष केला आहे.
रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या मोदी यांच्या सरकारमध्ये मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना अधिकृत फोन आला. मोहोळ यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू असताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी मोहोळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून भाजपचे अवघे 9 खासदार विजयी झाले आहेत. भाजपची महाराष्ट्रात मोठी पडझड झाली. मात्र, पुण्याची जागा भाजप जिंकणार, याचा आत्मविश्वास आधीच पासूनच पुणे भाजपला होता. त्यात मुरलीधर मोहोळ यांनी 1 लाख 23 हजार येवढे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे पुण्यातील खासदार आता केंद्रात मंत्री झाला आहे.