Posts

Showing posts with the label पण आठवड्यात कामाचे दिवस फक्त 4;

पगार तोच, पण आठवड्यात कामाचे दिवस फक्त 4; 100 कंपन्यांचा निर्णय

Image
  लं डन : पगारात काेणतीही कपात न करता जवळपास १०० कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी ४ दिवसांचा कामकाजी आठवडा केला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील ४ दिवसच काम करावे लागेल , उरलेले ३ दिवस सुटी मिळेल. या कंपन्यांतील २ , ६०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. हा निर्णय झाला आहे ब्रिटनमध्ये. आपल्या निर्णयामुळे देशात मोठा बदल होईल तसेच उत्पादकता वाढण्यास मदत होईल , असे कंपन्यांना वाटते. ४ दिवस कामाचा नियम करणाऱ्या १०० कंपन्यांत ॲटम बँक आणि ॲव्हिन या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. ॲटम बँक ही ब्रिटनमधील मान्यताप्राप्त बँक असून ॲव्हिन ही जागतिक मार्केटिंग कंपनी आहे. या कंपन्यांत प्रत्येकी ४५० कर्मचारी आहेत. मायक्रोसॉफ्टला झाला होता लाभ n मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्येच जपानमध्ये ४ दिवस काम व ३ दिवस सुटी देणे सुरू केले होते. n यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढली तसेच कर्मचाऱ्यांचे सुट्या घेण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले. २३% विजेचा वापर घटला. ९२% कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. फ्रान्समधील काही कंपन्यांनीही या मॉडेलचा स्वीकार केला होता. न...