Type Here to Get Search Results !

पगार तोच, पण आठवड्यात कामाचे दिवस फक्त 4; 100 कंपन्यांचा निर्णय

 


लंडन : पगारात काेणतीही कपात न करता जवळपास १०० कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी ४ दिवसांचा कामकाजी आठवडा केला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील ४ दिवसच काम करावे लागेल, उरलेले ३ दिवस सुटी मिळेल.

या कंपन्यांतील २,६०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. हा निर्णय झाला आहे ब्रिटनमध्ये. आपल्या निर्णयामुळे देशात मोठा बदल होईल तसेच उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे कंपन्यांना वाटते.

४ दिवस कामाचा नियम करणाऱ्या १०० कंपन्यांत ॲटम बँक आणि ॲव्हिन या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. ॲटम बँक ही ब्रिटनमधील मान्यताप्राप्त बँक असून ॲव्हिन ही जागतिक मार्केटिंग कंपनी आहे. या कंपन्यांत प्रत्येकी ४५० कर्मचारी आहेत.

मायक्रोसॉफ्टला झाला होता लाभ
n
मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्येच जपानमध्ये ४ दिवस काम व ३ दिवस सुटी देणे सुरू केले होते.
n
यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढली तसेच कर्मचाऱ्यांचे सुट्या घेण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले.
२३%
विजेचा वापर घटला.
९२%
कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

फ्रान्समधील काही कंपन्यांनीही या मॉडेलचा स्वीकार केला होता. न्यूृझीलंडची कंपनी परपेच्युअल गार्डियननेही ४ दिवस काम स्वीकारले आहे.

सहा महिन्यांपासून सुरू हाेत्या चाचण्या
n
ब्रिटनमध्ये ६ महिन्यांपूर्वी ४ दिवस कामाच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यात सुमारे ७० कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
n
चाचणी काळात कर्मचाऱ्यांनी ४ दिवसच काम केले. मात्र, त्यांना वेतन पूर्ण देण्यात आले.
n
कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे या चाचणीचा उद्देश होता.
n
या प्रयोगात ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ज्ञांसह अमेरिकेतील बोस्टन कॉलेजातील थिंक टँक सहभागी होते.

ही चाचणी ऐतिहासिक स्वरूपाची राहिली. जुन्या कार्यपद्धतीला चिकटून राहण्यात काहीच अर्थ नाही. ८०% वेळातही १००% उत्पादकता साध्य केली जाऊ शकते. आरोग्य सेवेसारख्या क्षेत्रात मात्र ही कार्यपद्धती योग्य नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies