पुष्पाची हवा आता विदेशातही ! 'या' कारणामुळे होणार रशियात स्क्रिनिंग
मुं बई - १ ते ६ डिसेंबर दरम्यान , भारतीय चित्रपट महोत्सवाचा पाचवा वर्धापन दिन रशियातील शहरांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट कंपनी इंडियन फिल्म्सद्वारा केले जाणार आहे. मॉस्को , सेंट पीटर्सबर्ग , सोची अशा अनेक शहरांमध्ये स्क्रीनिंगचे आयोजन केले जाईल. या महोत्सवाची सुरुवात ‘ पुष्पा ’ या जबरदस्त चित्रपटाच्या स्क्रिनींगने होणार आहे. या कार्यक्रमात करण जोहरच्या ड्रामासह भारतीय चित्रपटसृष्टीतील हिट चित्रपटांचा समावेश असून , यामध्ये रशियात सर्वात जास्त आवडला जाणारा म्यूजिकल मेलोड्रामा चित्रपट ‘ डिस्को डान्सर ’ चा देखील समावेश आहे. भारतीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ डिसेंबर रोजी मॉस्को येथील “ ओशनिया ” शॉपिंग सेंटर येथे होईल. तसेच , डिसेंबर रोजी ‘ पुष्पा: द राइज ’ चे सर्व कलाकार आणि क्रू सदस्य सेंट पीटर्सबर्ग येथील “ गॅलेरिया ” शॉपिंग सेंटर येथे चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. पुष्पा व्यतिरिक्त या ठिकाणी करण जोहर दिग्दर्शित ‘ माय नेम इज खान ’, बब्बर सुभाष दिग्दर्शित ‘ डिस्को डान्सर ’, एसएस राजामौलीचा ‘ आरआरआर: राइज रोअर रिवोल्ट ’, संजय लीला भन्साल...