पोस्ट्स

बारामती:सध्या एका फ्लेक्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'हे' उमेदवार मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची चर्चा

इमेज
    बारामती ( Baramati ): तालुक्यात सध्या एका फ्लेक्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. समाजकंटक , भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराला अभय देणारे उमेदवार मत मागण्यासाठी आल्यास अपमान करण्यात येईल , अशा आशयाचा बोर्ड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडीमध्ये सुरेश यादव यांच्या घराबाहेर अशा आशयाचा फ्लेक्स लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. यादव यांच्या घराबाहेरील हा बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बारामती तालुक्यात वाघळवाडी सोमेश्वर ग्रामपंचायतीसह 13 ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी वाघळवाडी गावातून सरपंचपदासाठी 13 तर सदस्यपदासाठी 60 जणांनी फॉर्म भरलेले आहेत. वाघळवाडी सोमेश्वर नगर गावातील सुरेश किसनराव यादव यांनी आपल्या घरावर एक बॅनर लावला असून तो बॅनर सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सुरेश यादव हे सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार होते , परंतु त्याचं मतदार यादीतून नाव उडवण्यात आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म...