१९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार

१९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार पुरंदर तालुक्यातील गोपाळ कदम यांची सक्सेस स्टोरी.... शासनाची मिळाली मदत, झाला शेतीत फायदा पुणे: शेतकरी जर उच्च शिक्षित असेल आणि त्याला शासनाच्या योजनांची साथ मिळाली तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील शेतकरी गोपाळ गजानन कदम. यांनी पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या आपल्या गावी खडकाळ माळ रानावर शेतीचा यशस्वी प्रयोग करत पिकांचे.शिवार फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळ रानावर डाळींब, सीताफळ यांच्या उत्पन्न तर घेतलेच पण ते सोबतच तरकारी मालामध्ये कारले, घेवडा कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील घेतले. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आहे. पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या लहानशा गावातील शेतकरी गोपाळराव कदम हे वारकरी कुटुंबातील. 1986 सालचे पदवीधर असलेल्या गोपाळरावांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली. त्या काळात शासकीय नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत्या. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्या काळी शिक्षकाला दीड ते दोन ह...