वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे
अ भिनेते सयाजी शिंदे यांची फसवणूक करून त्यांचीच बदनामी केल्याप्रकरणी वाई येथील सचिन बाबूराव ससाणे (रा. फुलेनगर- वाई) याच्याविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सचिन ससाणे याने फसवणूक केली असून धमकी देणे , अर्थिक नुकसान व बदनामी केलेबाबतचा तक्रार अर्ज सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आल्याची माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या वतीने देण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे की , सचिन ससाणे यांनी गिन्नाड या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला होता. या बदल्यात त्यांनी 25 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. पाच लाख रुपये त्यांनी दिल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये मी तीन दिवस त्या चित्रपटासाठीचे काम केले. कामादरम्यान श्री. ससाणे यांना चित्रपट दिग्दर्शनाचे पुरेसे ज्ञान नसल्याचे तसेच त्यांचे आर्थिक नियोजन बरोबर नसल्याचे समोर आले. यामुळे चित्रपटाच्या निर्मितीच्या कामकाजात वेळोवळी अनेक अडचणी आल्या. यानंतर मी त्यांना आवश्यक ते बदल करण्याचे तसेच ते झाल्यानंतर पुढील चित्रीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र , त्यांच्याकडून कोणत...