पोस्ट्स

उत्तमशेती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न

इमेज
 एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न कमी पाण्यावर उत्पादन घेत तरुणाची दमदार कामगिरी     नीरा दि.११ - राहुल शिंदे    कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे या दोघ बंधूंनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत कर्नलवाडी येथील शेतात स्वीटकॉर्न मक्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. तिनं महिन्याच्या या पिका मध्ये त्यांना 1 लाख 16 हजाराचे उत्पादन मिळाले आहे. तर 98 हजाराचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.     कर्नलवाडी म्हणजे कायम पाणी टंचाई असणार गाव. अनेक वर्ष या गावातील लोकांनी दुष्काळ पहिला आहे.गावात शेती करण्या पेक्षा पुण्या मुंबईला जाऊन कोणतीतरी नोकरी करावी आणि आपले कुटुंब चालावाव हा शिरिस्ता अनेक वर्ष पासून या गावात सुरू होता. पण आता शहरातही नोकऱ्या मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील.शिकलेला तरुण आता आपल्याच शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.कर्नलवाडी येथील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे हे सुद्धा आपली शेतात वेगवेगळे प्रयोग नेहमीच करीत असतात.या पूर्वी त्यांनी...

१९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार

इमेज
 १९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार पुरंदर तालुक्यातील गोपाळ कदम यांची सक्सेस स्टोरी.... शासनाची मिळाली मदत, झाला शेतीत फायदा पुणे:   शेतकरी जर उच्च शिक्षित असेल आणि त्याला शासनाच्या योजनांची साथ मिळाली तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील शेतकरी  गोपाळ गजानन कदम. यांनी पुरंदर तालुक्यातील सटलवाडी  या आपल्या गावी खडकाळ माळ रानावर शेतीचा  यशस्वी प्रयोग करत  पिकांचे.शिवार फुलवले आहे. त्यांनी खडकाळ  माळ रानावर डाळींब, सीताफळ यांच्या उत्पन्न तर घेतलेच पण  ते सोबतच तरकारी मालामध्ये कारले, घेवडा कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील घेतले. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आहे.  पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या लहानशा गावातील शेतकरी गोपाळराव कदम हे वारकरी कुटुंबातील. 1986 सालचे पदवीधर असलेल्या गोपाळरावांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली. त्या काळात शासकीय नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत्या. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्या काळी शिक्षकाला दीड ते दोन ह...