Posts

Showing posts with the label शिवसेना

पिंगोरी येथे विविध विकास कामांचे माजीमंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते शुभारंभ

Image
 पिंगोरी येथे विविध विकास कामांचे माजीमंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते शुभारंभ     नीरा  दि. २२         पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे 3 कोटी 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. अशोकराव टेकवडे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर तालुक्यात आता विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरवात केलीय...   पिंगोरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 94 लक्ष रुपयांची नळ पाणी पुरवठा येजना,60 लक्ष रुपयांचा आदर्श नगर येथील साकव पुल ,50 लक्ष रुपयांचा हरणी - पिंगोरी रस्ता, 20 लक्ष रुपयाचा आदर्श नगर ते पिंगोरी गावठाण रस्ता, त्याच बरोबर शहीद रमेश शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या 10 लक्ष रुपयांच्या रस्त्याचे भूमी पूजन यावेळी करण्यात करण्यात आले         यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार , दिलीप यादव , भाजपचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन लंबाते,भाजप तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे ,आरपिआरचे तालुका अध्यक्ष पंकज धीवार, पुरंदर पंचाय...

महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह

Image
 महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह  सासवड दि.२०      पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये अजूनही एकमत होत नसल्याने उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीतून बाहेर पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.   पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुरंदर तालुक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत. यातून एक जागा उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एक तास उरला असताना देखील याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने स्वतंत्र लढण्याचा विचार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने सकाळीच दहा उमेदवार जाहीर केले तर काँ...

आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

Image
 आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट  बाजार समितीतील अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस    नीरा दि.२०               पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 142 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघारी घेणार नसल्याचं भाजपच्यावतीने सांगण्यात येतं आहे . तर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेनं ही सहभाग घेतला आहे.त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र विजयी मतदान आघाडीच्या बाजूला आहे.त्यामुळे इतर पक्ष ऐनवेळी माघारी घेतात की, निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावे लागेल.दुपारी तीन नंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल .      नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील काळात बिनविरोध किंवा का...

राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?

Image
  राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?  नवीदिल्ली दि.१५ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. अशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मु...

अखेस संजय राऊत यांना पदावरून हटवले

Image
 संजय राऊत यांना पदावरून हटवले  नवी दिल्ली दि. २३     शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आले आहे.तर त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचं अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे.  शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी संजय राऊत होते. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालं होतं. त्यानंतर संजय राऊत यांची मुख्य गटनेते पदावरुन हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती.  दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं असून यामध्ये असं म्हटलं की, "२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली या बैठकीत एकमतानं ठराव करण्यात आला की, संजय राऊत हे यापुढं संसदेतील मुख्य नेते नसतील तर गजानन किर्तीकर असतील. आता आमची संख्या जास्त असल्...

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

Image
 फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल     मुंबई दि १८ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप- शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त ४८ जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार...अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बे-बनाव येतोय, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त ४८ जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला...

धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगात सुनावणी संपली, निर्णय...

Image
  नवी दिल्ली , 12 डिसेंबर :   धनुष्यबाण कुणाला मिळणार ? या वादावर आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून कागदपत्र दाखल केली आहे. आज दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या पक्षचिन्हाच्या हक्कावर आज आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगात सुनावणी झाली. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी या सुनावणीच्या वेळेस निवडणूक आयोगात उपस्थित होते. सोबतच वकिलांची फौज देखील आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार आहे , पहिल्या आठवड्यात यावर चर्चा होणार आहे , कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी माहिती दिली , किती कागदपत्र सादर केली , याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. अशी माहिती अनिल देसाई यांनी ...

शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाला कोर्टातील पहिला विजय : आता दसरा मोळवा कोणार शिवाजी पार्कवर

Image
   शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाला कोर्टातील पहिला विजय :       आता दसरा मोळवा कोणार शिवाजी पार्कवर मुंबई दि.२३ राज्यात स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेने अनेक वेळा कोर्टाच्या दरवाजे ठोठावले मात्र थांबा आणि वाट पहा या पलीकडे शिवसेनेच्या वाट्याला काहीच आले नव्हते. मात्र आज शिवसेनेला कोर्टामधून पहिल्यांदा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या दृष्टीने हा पहिला विजय म्हणायला हरकत नाही.      शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेला दसरा मेळावा अडचणीत आला होता. शिवतीर्थावर परवानगी मिळत नसल्याने किंवा ती द्यायला वेळ लावत असल्याने सेनेन कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. हा निर्णय सुद्धा लंबवला जातोय काय? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता कोर्टाने शिवसेना ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब आहे.

शिवसेनेचा एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा ; कॉंग्रेस नाराज

Image
    शिवसेनेचा एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा ; कॉंग्रेस नाराज     शिवसेना पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. पक्षात अजूनही गळती सुरुच असून शिंदे गटाकडे इनकमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने काल एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे. दरम्यान , मुर्मू यांना पाठींबा दिल्याने काँग्रेस नाराज झाली आहे.          आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगत मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्या नंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.          एकनाथ शिंदे यांच्या बांधावे शरद पवार यांची प्रतिक्रिया   लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे...