शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाला कोर्टातील पहिला विजय : आता दसरा मोळवा कोणार शिवाजी पार्कवर

   शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाला कोर्टातील पहिला विजय :

      आता दसरा मोळवा कोणार शिवाजी पार्कवर



मुंबई दि.२३

राज्यात स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेने अनेक वेळा कोर्टाच्या दरवाजे ठोठावले मात्र थांबा आणि वाट पहा या पलीकडे शिवसेनेच्या वाट्याला काहीच आले नव्हते. मात्र आज शिवसेनेला कोर्टामधून पहिल्यांदा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या दृष्टीने हा पहिला विजय म्हणायला हरकत नाही.


     शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेला दसरा मेळावा अडचणीत आला होता. शिवतीर्थावर परवानगी मिळत नसल्याने किंवा ती द्यायला वेळ लावत असल्याने सेनेन कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. हा निर्णय सुद्धा लंबवला जातोय काय? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता कोर्टाने शिवसेना ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.