हुल्लडबाजी करणारांना पोलिसांचा चाप : मिळणार पोलिसांचा प्रसाद
· हुल्लडबाजी करणारांना पोलिसांचा चाप : मिळणार पोलिसांचा प्रसाद · पुणे दि.१३ · सध्या पावसाळा सुरू झाला आहे .त्यामुळे अनेक तरुण पर्यटनासाठी बाहेत पडत आहेत. त्यात अनेक पर्यटक राज्यभरातून दाखल होतात. बाहेर फिरण्यासाठी आल्यावर पर्यटक कुठलेही नियम पाळताना ते दिसत नाहीत. अशा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यावेळी पोलिसांनी तरूणांचा डिजे व गाड्या जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. · भीमा शंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या आवाजात डीजे लावून अनेक प्रवासी गाड्या चालवत असल्याचे. तसेच अनेक जण गाड्या थांबवून डीजे लावून रस्त्यावरच डान्स करत हुल्लडबाजी करत होते. या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई ...