हुल्लडबाजी करणारांना पोलिसांचा चाप : मिळणार पोलिसांचा प्रसाद

 

·         हुल्लडबाजी करणारांना पोलिसांचा चाप : मिळणार पोलिसांचा प्रसाद


·          


         पुणे दि.१३ 


·            सध्या पावसाळा सुरू झाला आहे .त्यामुळे अनेक तरुण पर्यटनासाठी बाहेत पडत आहेत. त्यात अनेक पर्यटक राज्यभरातून दाखल होतात. बाहेर फिरण्यासाठी आल्यावर पर्यटक  कुठलेही नियम पाळताना ते दिसत नाहीत. अशा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यावेळी पोलिसांनी तरूणांचा डिजे व गाड्या जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

·         भीमा शंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या आवाजात डीजे लावून अनेक प्रवासी गाड्या चालवत असल्याचे. तसेच अनेक जण गाड्या थांबवून डीजे लावून रस्त्यावरच डान्स करत हुल्लडबाजी करत होते.या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.


श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी  डीजे मोठ्या आवाजात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांमुळे  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होत होता. या ठिकाणी  पोलिसांनी अचानक धाड टाकत या हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करून  त्यांना ताब्यात घेतले. आणि चांगला चोप ही दिला.
हे सर्व तरुण मंचर आणि अवसरी येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडील वाहने जप्त करून त्यांची नावे लिहून घेण्यात आली आहेत. या संदर्भात संबंधित तरुणांच्या घरी देखील कळवण्यात येणार असून पुन्हा अशी चूक करू नये यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
x

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..