Posts

Showing posts with the label राहुल गांधी

राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?

Image
  राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?  नवीदिल्ली दि.१५ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. अशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मु...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

Image
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द नवी दिल्ली दि.२४ देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यां...

सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

Image
 सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप. आदानी आणि मोदींचा रिस्ता काय ?  काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी     सासवड दि.२४             पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दुपारी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या निर्णयाचा निषेध या आंदोलनातून करण्यातआला.             केंद्र सरकार जाणून-बुजून राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मोदी आणि आदानी यांचा संबंध काय ? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सरकार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप प...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा

Image
 काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा  सुरत येथील न्यायालयानं सुनावली शिक्षा  मुंबई दि.१३     2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी केलेल वक्तव्य राहुल.गांधी यांच्या एका वक्तव्याने ते चांगलेच आदचानित आले आहेत.मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? राहुल गांधीयांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून आता त्यांना दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे        सन 2019 साली राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातचे त्यावेळचे मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगि...