दमदाटी संपेनाच! पीएमपीएमएल चालकाची अन् तरुणाची तुंबळ हाणामारी..

P une PMPML : पीएमपीएल बस चालक ( PMPML ) आणि दुचाकी चालकामध्ये ( Pune ) तुंबळ हाणामारी झाली आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये झाला वाद आणि या वादाचे रुपांतर झाले हाणामारीत झालं. पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात काल ( 13 नोव्हेंबर) ही घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात दुचाकी चालकाने पीएमपीएमएलच्या चालकाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर वाहकाने हा प्रकार पाहिला आणि वाहक देखील बसच्या खाली उतरला. त्याने देखील मारहाण करायला सुरुवात केली. त्या वाहकाला देखील दुसऱ्या तरुणाने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी शेजारचे लोक त्याठिकाणी बचावासाठी आले , मात्र दोघेही थांबायला तयार नसल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. हाणारामारीमुळे काही वेळ वाहतूक कोंडी पुण्यातील पुणे स्टेशनच्या परिसरात कायम मोठी रहदारी असते. याच रस्त्यावर पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अनेक लोक हा...