पोस्ट्स

मुकादमाच्या निर्दयीपणामुळं तीन दिवसाच्या बाळाला मृत्यूनं कवटाळलं;; लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धक्कादायक! मुकादमाच्या निर्दयीपणामुळं तीन दिवसाच्या बाळाला मृत्यूनं कवटाळलं; आईनं बाळाला पाहून हंबरडा फोडला

इमेज
  उ साचा गोडवा जेवढा त्याहीपेक्षा वेदनादायी आयुष्य ऊसतोड कामगारांचं असतं. ऊस तोडीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर परिसरात आलेल्या दाम्पत्याला तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला दवाखान्यात जाण्यासाठी मुकादमानं सुट्टी दिली नाही. अन् त्या गोंडस बाळाला उपचाराअभावी मृत्यूनं कवटाळलं. निर्दयीपणे ' तुझ्या मुलाच काही झालं तरी चालेल ; पण ऊस तोडीचं काम केलंच पाहिजे , असं धमकावलं , अशी तक्रार मयत बाळाचे वडील सुनील पवार यांनी केली. ऊस तोडीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून आलेल्या महिलेला सोमवारी सकाळी प्रसूती वेदना होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना रस्त्यातच मीरा पवार यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. यामुळे मुकादमानं महिलेची प्रसूती रस्त्यात झाल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये कशाला नेता , असे म्हणत पुन्हा कामाच्या ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर दोनच दिवसांनी नवजात बाळ दूध पित नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी सुट्टी मागितली. मात्र मुकादमानं दवाखान्यात जायचं नाही. ऊस तोड महत्त्वाची आहे , असं सुनावलं. पण बाळाची तब्येत जास्त खराब झाल्याने सुनील प...