मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि... VIDEO
मुंबई , 01 डिसेंबर : जगभरातील व्यक्तींना भारतीय संस्कृतीबद्दल कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. त्यामुळे जगभरातून लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. भारतीय लोक त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे आदरातिथ्यही करतात . मात्र , काही समाजकंटक आणि वाईट प्रवृत्तीचे लोक पर्यटकांशी गैरवर्तन करतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील रस्त्यावर एका दक्षिण कोरियातील युट्यूबर मुलीची छेड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नेटिझन्सनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनीही या मागणीला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर एका दक्षिण कोरियन युट्यूबर मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती युट्यूब लाइव्ह करत असताना एका तरुणानं तिचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साधारण एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी विरोध करत असतानाही एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला गाडीवरून लिफ्ट देतो असं म्हणत असल्याचं दिसत आहे. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे संबंधित...