एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न

एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न कमी पाण्यावर उत्पादन घेत तरुणाची दमदार कामगिरी नीरा दि.११ - राहुल शिंदे कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे या दोघ बंधूंनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत कर्नलवाडी येथील शेतात स्वीटकॉर्न मक्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. तिनं महिन्याच्या या पिका मध्ये त्यांना 1 लाख 16 हजाराचे उत्पादन मिळाले आहे. तर 98 हजाराचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे. कर्नलवाडी म्हणजे कायम पाणी टंचाई असणार गाव. अनेक वर्ष या गावातील लोकांनी दुष्काळ पहिला आहे.गावात शेती करण्या पेक्षा पुण्या मुंबईला जाऊन कोणतीतरी नोकरी करावी आणि आपले कुटुंब चालावाव हा शिरिस्ता अनेक वर्ष पासून या गावात सुरू होता. पण आता शहरातही नोकऱ्या मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील.शिकलेला तरुण आता आपल्याच शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.कर्नलवाडी येथील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे हे सुद्धा आपली शेतात वेगवेगळे प्रयोग नेहमीच करीत असतात.या पूर्वी त्यांनी...