जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका
जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका सासवड दि.१४ तालुक्यातील पुढाऱ्यांची लाथाळी आमच्यावर अन्याय करतायत अस म्हणत नुकतेच भाजपमध्ये गेलेले भानुकाका जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली आहे.सासवड येथे ते आज माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भानुकाक जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला आहे. बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.त्यांच्या या प्रवेशाने बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला फारसा फरक पडणार नसला तरी राष्ट्रवादीत फुटीचे आणि बंडाचे बीज त्यांनीं पेरले आहे.आणि भाजपला तालुक्यात हातपाय पसरायला संधी मिळाली आहे.त्यांच्या सोबत आमदार संजय जगताप यांचे कट्टर आणि मागील निवडणुकीत ज्यांनी संजय जगताप यांची बाजू नेटाने मंडळी ते प्रदीप जगताप ही भाजप मध्ये गेले आहेत.त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.यामुळे आ.संजय जगताप यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे. ...