Posts

Showing posts with the label न जाळलं.

नात्याला काळीमा! डॉक्टरने पत्नीला संपवलं; रुग्णालयात लपवलं अन् 321 किमी दूर नेऊन जाळलं

Image
  उ त्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीत नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका डॉक्टरने स्वत:च्या पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह बॉक्समध्ये ठेवून आपल्याच रुग्णालयात नेला. धक्कादायक बाब म्हणजे तेथून रुग्णवाहिकेमार्फत मृतदेह गडमुक्तेश्वरला नेऊन तो जाळल्याची भयंकर घटना घडली. यानंतर आरोपी डॉक्टरने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदवली. मृत डॉक्टरचे वडील गोंडामध्ये ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हे सत्य समोर आलं आहे. हत्येमध्ये आरोपी डॉक्टरला त्याच्या वडिलांनीदेखील साथ दिली. लखीमपूर खिरी पोलिसांनी आरोपी वडील आणि मुलाला अटक केली आहे. ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रायपूरचे रहिवासी शिवराज शुक्ला डीए गोंडाचे ओएसडी आहेत. त्यांची मुलगा वंदनाचा विवाह 2014 मध्ये लखीमपूर शहरातील बहादूरनगरचा रहिवासी असलेल्या अभिषेक दीक्षित यांच्याशी झाला. वंदना यांनी बीएएमएस केलं होतं. त्यांचे पती अभिषेकदेखील बीएएमएस डॉक्टर आहेत.सीतापूर रोड परिसरात गौरी नावाने रुग्णालय सुरू केलं. त्यात दोघे प्रॅक्टिस करायचे. हळूहळू दोघांमध्ये वाद...