Type Here to Get Search Results !

नात्याला काळीमा! डॉक्टरने पत्नीला संपवलं; रुग्णालयात लपवलं अन् 321 किमी दूर नेऊन जाळलं


 त्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीत नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका डॉक्टरने स्वत:च्या पत्नीची हत्या केली.

यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह बॉक्समध्ये ठेवून आपल्याच रुग्णालयात नेला. धक्कादायक बाब म्हणजे तेथून रुग्णवाहिकेमार्फत मृतदेह गडमुक्तेश्वरला नेऊन तो जाळल्याची भयंकर घटना घडली. यानंतर आरोपी डॉक्टरने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदवली. मृत डॉक्टरचे वडील गोंडामध्ये ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हे सत्य समोर आलं आहे.

हत्येमध्ये आरोपी डॉक्टरला त्याच्या वडिलांनीदेखील साथ दिली. लखीमपूर खिरी पोलिसांनी आरोपी वडील आणि मुलाला अटक केली आहे. ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रायपूरचे रहिवासी शिवराज शुक्ला डीए गोंडाचे ओएसडी आहेत. त्यांची मुलगा वंदनाचा विवाह 2014 मध्ये लखीमपूर शहरातील बहादूरनगरचा रहिवासी असलेल्या अभिषेक दीक्षित यांच्याशी झाला. वंदना यांनी बीएएमएस केलं होतं. त्यांचे पती अभिषेकदेखील बीएएमएस डॉक्टर आहेत.सीतापूर रोड परिसरात गौरी नावाने रुग्णालय सुरू केलं. त्यात दोघे प्रॅक्टिस करायचे. हळूहळू दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वंदना यांनी चहमलपूरच्या लक्ष्मी नारायण रुग्णालयात प्रॅक्टिस सुरू केली. अभिषेक वंदनाला मारहाण करायचा. 26 नोव्हेंबरला अभिषेक आणि त्याचे वडील गौरी शंकर अवस्थी यांनी वंदना यांना घरात काठीने मारहाण केली. मारहाणीत वंदना यांचा मृत्यू झाला. दोघांनी वंदना यांचा मृतदेह खोक्यात बंद केला. रात्री उशिरा रेल्वे स्थानकातून एक पिकअप भाड्याने घेतली. त्यात वंदना यांचा मृतदेह ठेऊन स्वत:चं गौरी रुग्णालय गाठलं. रात्रभर मृतदेह रुग्णालयात ठेवला. सकाळी एक रुग्णवाहिका भाड्याने घेतली.

रुग्णवाहिकेने 321 किलोमीटर अंतर कापून गडमुक्तेश्वर गाठलं. तिथे 1300 रुपयांची पावती फाडून अंत्यसंस्कार केले. आरोपीने 27 नोव्हेंबरला वंदना यांच्या वडिलांना तुमची मुलगी कुठेतरी निघून गेली असं सांगितलं. वडील लखीमपूरला आले आणि त्यांनी त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies