नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती अग्नितांडव, कोट्यवधींची लाल मिरची जळून खाक
नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान , काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. मोठा आर्थिक फटका मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही लागली होती. आग भीषण असल्यामुळं काही वेळातच एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसला आहे. दरम्यान , घटनेची माहती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र , नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली होती. यामध्ये व्यापाऱ्यांनी ठेवलेली लाल मिरची जळून खाक झाली. सध्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आह...