सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप. आदानी आणि मोदींचा रिस्ता काय ? काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी सासवड दि.२४ पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दुपारी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या निर्णयाचा निषेध या आंदोलनातून करण्यातआला. केंद्र सरकार जाणून-बुजून राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मोदी आणि आदानी यांचा संबंध काय ? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सरकार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप प...