सासवड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.
गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्य वाहतूक प्रकरणी केली कारवाई
सासवड दि १६
गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले मद्य महाराष्ट्रात विक्री साठी आणल्या प्रकरणी
सासवड उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई भोर तालुक्यातील सारोळा येथे करण्यात आली आहे.
याबाबत सासवड येथी उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की,दिनांक १५ जुलै रोजी
राज्य् उत्पादन शुल्क, पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार सारोळा गावचे हद्दीत, बँगलोर-पुणे महामार्ग क्र. ४ वर, हॉटेल नानाचीवाडी समोर, रोडवर सापळा लावुन संशयित वाहनांची तपासणी करीत असता, संशयित ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मदयसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळुन आला. त्यावरुन ट्रक चालक नामे सुरेश चंद्रा कलाल वय ३६ वर्षे रा. सियाल मांग्री घाटी, पो. लसाणी, ता. देवगड जि. राजसंबंद व किसनलाल प्यारचंद खटीक वय २८ वर्षे रा. धानेन, ता. कोमलगढ, जि. राजसंबंद यांना जागीच अटक करुन ताब्यात घेण्यात आले. वाहतुकीसाठी वापरलेला टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक क्र. आरजे ३२ जीए ५९५६ या ट्रकमध्ये ताब्यात घेण्यात आला त्यामध्ये १. गोवा राज्यात विक्रीस असलेले टयुवर्ग स्ट्राँग बिअरचे ५०० मिली क्षमतेचे ५० वॉक्स, २. इंम्पेरीयल ब्ल्यू व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे १५० बॉक्स, ३, मॅकडॉल व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे २५० बॉक्स ४. रॉयल चॅलेंजर्स व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे ५० बॉक्स् ५. जारव्हीस व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे ५० बॉक्स मिळुन आले सदरचा विदेशी मदयसाठा व बिअर अ.किं.रु. ३९१८०००/- इतक्या किंमतीचा मदयसाठा तसेच कुजलेली लोकर अं किं. रू. २०००/-, तीन मोबाईल फोन रु. ५,०००/- व गोवा राज्यात विक्रीस असलेले मदय वाहतुकीकामी वापरलेले वाहन किंमत रु. १०,००,०००/- असा एकुण ४९२५०००/- किंमतीचा प्रो. गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. आयुक्त् कांतीलाल उमाप व संचालक (अं.व.द.) श्री. सुनिल चव्हाण. यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त श अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग, पुणे या पथकाने केली. या कारवाईत निरीक्षक पी.सी. शेलार, दुय्यम निरीक्षक राजेंद्र झोळ, आर. एम. सुपेकर, स. दु. नि. संदिप मांडवेकर, जवान अक्षय म्हेत्रे, भागवत राठोड, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनिल कुदळे, दत्ता पिलावरे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, पुणे या कार्यालयामार्फत चालु आहे.