पोस्ट्स

सीमाप्रश्नावरून भाजपचे कर-नाटक!! लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सीमाप्रश्नावरून भाजपचे कर-नाटक! बोम्मई आणि फडणवीस भिडले

इमेज
  म हाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांतील भाजप सरकारचे नाटक सुरू आहे .  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाव्याची खिल्ली उडवली. मात्र , त्यावर परत ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत बोम्मई यांनी थेट सोलापूर , अक्कलकोट कर्नाटकात घेण्याची भाषा केली आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याची भाषा केल्याने हा वाद चिघळला आहे. बोम्मई आता काय म्हणाले ? देवेद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याचा भूभाग , जलसंपदा आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांचा भाग सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर , अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे अशी आमची मागणी आहे , असे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले. 2004 पासून महाराष्ट्राने सीमाप...