पोस्ट्स

मराठी पत्रकार परिषद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड

इमेज
 हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड     लोणी काळभोर दि.१७            मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचेशी संलग्न असलेल्या हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव अरुण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.       हवेली पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड बुधवारी हॉटेल एसफोरजी येथे पार पडली. यावेळी रमेश निकाळजे यांची अध्यक्षपदी, तर स्वप्नील कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच बरोबर इतरही निवडी जाहीर करण्यात आल्या.कार्याध्यक्षपदी विकास काळभोर, कोषाध्यक्षपदी अक्षय दोमाले, पत्रकार हल्ला कृती समितीपदी दिगंबर जोगदंड यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीत जैनजागडे, रुपालीताई काळभोर,मंगल बोरावके,मिलन दाभाडे,सुवर्णा हिरवे यांची निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा संघाचे ...

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा

इमेज
 मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर पुरस्कारार्थींमध्ये धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांचा समावेश मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा "दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज मुंबईत केली.. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली.. बैठकीत २०२२ चे पुरस्कार नक्की करण्यात आले.. त्यानुसार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत आदि वरिष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार दिला गेला आहे... प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.. पत्रकार शशिकांत सांडभोर या...

कर्जत येथे होणारा आदर्श तालुका जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा

इमेज
 ‘सामना’चे संपादक खा. संजय राऊत प्रमुख पाहुणे व स्वागताध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे होणारा आदर्श तालुका जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा मराठी पत्रकार परिषदेसाठी मैलाचा दगड ठरेल- एस.एम.देशमुख अहमदनगर : दि.३ मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा कर्जत (जि. अहमदनगर) येथे येत्या ७ एप्रिलला होत आहे. या मेळाव्यासाठी खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे प्रमुख पाहुणे तर स्वागताध्यक्ष रोहित पवार हे आहेत. मेळाव्याची तयारी जोरदार सुरू असून मेळावा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सर्वच पत्रकार खूपच परिश्रम घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी देखील त्यांना आवश्यक तेथे मदत करीत आहेत. मात्र, हा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची आहे. त्यानुसार सर्वांनी निदान दररोज एक तास तरी मेळाव्याच्या तयारीसाठी द्यावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्...

कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

इमेज
 कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्नसरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांचे उपस्थितीचे आवाहन कर्जत (अहमदनगर)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका, जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा अहमद नगर जिल्ह्यातील कर्जत येथे ७ एप्रिल २०२३ रोजी होत आहे.. या मेळाव्याच्या दिवशीच म्हणजे ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मराठी पत्रकार परिषदेची बैठक होणार आहे.. बैठकीस अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, सर्व संघटक, विभागीय सचिव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, राज्य प्रसिध्दीप्रमूख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.. कृपया नोंद घेऊन नियोजन करावे. या बैठकीस मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व विभागीय सचिवांनी परिषदेच्या सभासद नोंदणी व वर्गणीसह आपल्या भागातील जिल्ह्यांचा आढावा सादर करणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय ...

बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठीमुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण

इमेज
  बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठीमुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण   मुंबई- आद्य पत्रकार, विचारवंत, "दर्पणकार" बाळशास्त्री जांभेकर यांची सिंधुदुर्ग ही जन्मभूमी.. या भूमीत बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक व्हावं अशी राज्यातील पत्रकारांची जुनी इच्छा होती.. युती सरकारच्या काळात पत्रकारांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास सुरूवात झाली.. मा. श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्मारकासाठी पाच कोटी रूपये राज्य सरकारने मंजूर केले.. या निधीतून बाळशास्त्री जांभेकर यांचं भव्य स्मारक उभं राहिलं आहे.. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले.. त्याचं स्मरण म्हणून राज्यात स्मारकाचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उदघाटन व्हावं अशी राज्यातील पत्रकारांची इच्छा आणि तशी विनंती आहे. स्मारकाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे यासाठी आज मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळा खडपकर, ...

पिंपरी चिंचवड येथी होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित रहा : भरत निगडे.

इमेज
 पिंपरी चिंचवड येथी होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित रहा : भरत निगडे.  पुरंदर  :          दि. १९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी - चिंचवड, पुणे येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनास पुणे जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले आहे.            या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चासत्र, परीसंवाद पत्रकारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  मराठी सिनेअभिनेता खा. अमोल कोल्हे यांच्या प्रकट मुलाखतीसह भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे. मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत), अश्विन बापट ( एबीपी माझा),...

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन.

इमेज
 रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन.           रायगड दि.९          रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी मार्गाने या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई - गोवा महामार्गावरील कोलाड येथे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.         रायगड जिल्ह्यातील पत्रकार चौपदरीकरणच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले असून यावेळी रास्ता वाहतुकीला कोणताही स्वरूपाचा अडथळा निर्माण न करता हे आंदोलन करण्यात आले. मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन १२ वर्षे झाली, मात्र अद्याप हे काम रखडलेले आहे. ते काम कधी पुर्ण होईल याचा पत्ताच नाही.    या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून परिणामी होणाऱ्या अपघातांमुळे शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले...

मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी

इमेज
 मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी  पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे..  मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती - जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणारया पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे.. "मी अँकर" हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.. पिंपरी चिंचवड येथील शंकरराव गावडे कामगार भवनात होणारया या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, अरूण नाना कांबळे, बाळासाहेब...

मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी

इमेज
 मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी  उपमुख्यमंञी फडणवीस खा.सुप्रियाताई सुळे यांना निमंत्रण :  तर मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा       मुंबई-- मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19, व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या ची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाची निमंत्रण दिले पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांनाही समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यां मध्ये आल्या आहेत राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे...

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नेमणुका जाहीर

इमेज
  मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नेमणुका जाहीर मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज परिषदेच्या नऊ विभागीय सचिवांच्या नावांची घोषणा केली आहे... नव्या विभागीय सचिवांची मुदत दोन वर्षांची असेल.. नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे 1) *दीपक कैतके*    (मुंबई विभाग ) 2) *जे. डी. पराडकर संगमेश्वर* (कोकण विभाग,-- ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड) 3) *किशोर महाजन, मालवण* (कोल्हापूर विभाग :- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्हा) 4) *अरूण नाना कांबळे, पिंपरी-चिंचवड* (पुणे विभाग : पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा) 5) *रोहिदास हाके,धुळे*  ( नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव अहमदनगर जिल्हे) 6) *बालाजी सूर्यवंशी, औरंगाबाद* : ( संभाजीनगर विभाग, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्हे) 7) *सचिन शिवशेट्टे, उदगीर* : (लातूर विभाग,:- लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्हे) 8) *अमर राऊत, मेहकर* (अमरावती विभाग,:- अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम) 9) *संजय देशमुख, नागपूर*:- ( नागपूर विभाग, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,) विभागीय संघटक, म...