पोस्ट्स

पुणे : एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग

  पु णे : एकतर्फी प्रेमातून तरुणीकडे जबरदस्तीने लग्नाचा आग्रह धरून स्वत: जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. याबाबत 22 वर्षांच्या तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून , पोलिसांनी तरुणावर () विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 25 नोव्हेंबर रोजी मंगळवार पेठ परिसरात घडली होती. त्यावेळी दोघांच्या घरच्यांनी एकमेकांबाबतीत पुन्हा असे न करण्याची हमी दिल्याने त्यावेळी तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र , तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केली. () पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी तरुण आणि तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच ते एकाच कॉलेजमध्ये शिकले असून , त्यांच्यात मैत्री होती. फिर्यादी तरुणी ही खासगी नोकरी करत असून , 25 नोव्हेंबर रोजी ती दुचाकीवरून ऑफिसला जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिला आडवले आणि जबरदस्तीने तिच्या दुचाकीवर बसून तिला कानिफनाथ मंदिर , बोपदेव घाटात घेऊन गेला. फिर्यादी तरुणीची लग्न करण्याची इच्छा नसतानादेखील आरोपीने जबरदस्तीने लग्न...