एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग

 पुणे :एकतर्फी प्रेमातून तरुणीकडे जबरदस्तीने लग्नाचा आग्रह धरून स्वत: जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.

याबाबत 22 वर्षांच्या तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून, पोलिसांनी तरुणावर () विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 25 नोव्हेंबर रोजी मंगळवार पेठ परिसरात घडली होती. त्यावेळी दोघांच्या घरच्यांनी एकमेकांबाबतीत पुन्हा असे न करण्याची हमी दिल्याने त्यावेळी तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केली. ()

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच ते एकाच कॉलेजमध्ये शिकले असून, त्यांच्यात मैत्री होती. फिर्यादी तरुणी ही खासगी नोकरी करत असून, 25 नोव्हेंबर रोजी ती दुचाकीवरून ऑफिसला जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिला आडवले आणि जबरदस्तीने तिच्या दुचाकीवर बसून तिला कानिफनाथ मंदिर, बोपदेव घाटात घेऊन गेला.

फिर्यादी तरुणीची लग्न करण्याची इच्छा नसतानादेखील आरोपीने जबरदस्तीने लग्न करण्याचा आग्रह धरला.
त्यावेळी तरुणीने लग्नाला नकार दिला असता आरोपीने स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली.
हा प्रकार दोघांच्या घरच्यांना समजल्यावर तरुणाने फिर्यादी यांना सोडून दिले.
दरम्यान, तरुणीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..